नाविन्यपूर्ण उत्पादनांच्या मदतीने स्वयंपाकघर करा सुशोभित I
भारतीयांचा वर्षातला सर्वात आवडता- सणासुदीचा काळ सुरू होतोय. या काळात बहुतेक नागरिक आपले कुटुंब आणि परिवारासाठी घरी खास जेवण बनवतात. पाहुणे येतात त्याआधी रंग आणि नवे फर्निशिंग केले जाते. घराचे नूतनीकरण करताना त्यातला सर्वात महत्त्वाचा भाग किंबहुना घराचे हृदय असते ते स्वयंपाकघर. म्हणूनच स्वयंपाकघार खास आणि वापरण्यास सोपे असणे आवश्यक आहे. यामुळे उत्पादनक्षमता वाढते, शिवाय सणांच्या निमित्ताने कराव्या लागणाऱ्या स्टोअरेजसाठी जागा तयार होते.
सणांच्या पार्श्वभूमीवर स्वयंपाकघराचा मेकओव्हर करायचा असेल, तर लगेच सुरुवात करायला हवी. गृहिणी, नोकरदार, तरुण अशा सर्वांना मॉड्युलर किचन आणि स्टोअरेजच्या नाविन्यपूर्ण पद्धती आवडतात, कारण त्यामुळे दैनंदिन जीवन सोपे होते. जागेच्या मर्यादा लक्षात घेत ते आपल्या जीवनशैलीवर जास्त भर देतात. गोदरेज लॉक्सने स्किडो ही नाविन्यपूर्ण उत्पादनश्रेणी लाँच केली आहे, ज्यामुळे आगामी सणांसाठी किचन सज्ज करणे शक्य होणार आहे.
स्वयंपाकघर स्वच्छ करा –
सणांच्या काळात वार्षिक स्वच्छता केली जाते. घरी पाहुणे येणार असल्यामुळे स्वच्छ आणि नीटनेटके स्वयंपाकघर निश्चितच आकर्षक, आवश्यक वस्तूंची योग्य रचना केलेले असल्यास जेवण बनवणे, त्याची तयारी करणे या सर्व गोष्टी सोप्या होतात. नंतरची स्वच्छताही पटकन होते आणि पाहुण्यांबरोबर जास्त वेळ घालवता येतो. ड्रॉवरमध्ये कटलरी आणि प्लेट्स सहज हलवता येणाऱ्या पार्टिशनच्या मदतीने लावून ठेवल्यास गोंधळ होत नाही.
स्वयंपाकघरातील पसारा आवरा
खूपदा आपण अतिरिक्त ग्लासवेयर्स आणि मोठी भांडी बॉक्समध्ये भरतो व त्यामुळे विनाकारण पसारा तयार होतो. तुमची स्टाइल किंवा उपयुक्तता या निकषांवर न उतरणाऱ्या सर्व गोष्टी स्वयंपाकघरातून काढून टाका. स्वयंपाकघराचं स्वरूप बदलण्याची हीच योग्य वेळ आहे, मग ते तुमचे डिश टॉवेल्स असो किंवा न वापरली जाणारी उपकरणे. पसारा कमी झाल्यानंतर कॅबिनेट्समधे नवी जागा तयार होईल. तिथे मेझानाइन लेवल ट्रेज ठेवून जास्त स्टोअरेज मिळवता येईल आणि मुख्य म्हणजे, त्यात नीटनेटकेपणा येईल. स्वयंपाकघरातील उभ्या ड्रॉवर्सची उपयुक्तता वाढवण्यासाठी ही स्मार्ट पद्धत आहे.
स्टोअरेजच्या प्रत्येक कोपऱ्याचा वापर करा
मर्यादित जागा असलेले स्वयंपाकघर लावताना जागेचा प्रत्येक इंच वापरणं अतिशय महत्त्वाचे आहे. सणांच्या काळात मिठाई, इतर खाद्यपदार्थ पेयं ठेवण्यासाठी जास्त जागा लागते. म्हणूनच स्वयंपाकघर नीटनेटके असल्यास हे स्टोअरेज सोपे होते. खाद्यपदार्थ वगैरे वरच्या आणि खालच्या ड्रॉवर्स स्लाइड आउटमध्ये ठेवल्यास वस्तूंचा एका नजरेत आढावा घेता येतो आणि त्या वापरणेही सोपे होते.
प्रत्येक गरजेसाठी नाविन्यपूर्ण उपाय
भारतीय जेवणतील गुंतागुंतीमुळे स्वयंपाकघरात वेगवेगळ्या प्रकारची भांडी, तवे, मसाल्याचे डबे, ताटल्या, थाळ्या आणि इतर गोष्टी लागतात. बाहेरच्या देशात बनवली जाणारी बास्केट्स किंवा अक्सेसरीज या सर्व गोष्टींसाठी अपुऱ्या पडतात. चांगलं स्वयंपाकघर आकर्षक दिसतं, मात्र नाविन्यपूर्ण सुविधा असलेलं वापरण्यास सोपं स्वयंपाकघर जास्त महत्त्वाचं असतं. स्वयंपाकघर अशा गरजा पुरवण्यासाठी गोदरेज किचन फिटिंगने नाविन्यपूर्ण सुविधा लाँच केल्या आहेत. स्किडो (स्मार्ट किचन ड्रॉवर्स अँड ऑर्गनायझर्स) असे नाव असलेल्या या श्रेणीत वेगवेगळ्या प्रकारचे ड्रॉवर्स, ऑर्गनायझर्स, कॉर्नर सोल्यूशन्स व धान्य साठवण्यासाठी उपयुक्त स्टोअरेजचा समावेश आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- वुमन ऑफ इम्पॅक्ट – प्रभावशाली महिलांचा सन्मान
- Grand Success of Sydenham’s Management Conclave 2024
- गोदरेज अँड बॉयसचे मुंबईच्या भूमिगत मेट्रोमध्ये योगदान
- Sydenham College Management Conclave ’24
- आजचे मार्केट अपडेट – 23 ऑगस्ट 2024 – सेन्सेक्स 33 अंकांनी वाढला आणि 81,086 वर बंद झाला: निफ्टी देखील 11 अंकांनी वाढला|Share market news in marathi