गोदरेज इंटेरिओमध्ये प्रीमियम फर्निचर खरेदीचा कल वाढता I

गोदरेज इंटेरिओमध्ये प्रीमियम फर्निचर खरेदीचा कल वाढता

यंदाच्या सणासुदीच्या हंगामात एकूण वार्षिक विक्रीच्या 40 टक्के विक्री साध्य करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट

· संपूर्ण भारतात सणासुदीच्या निमित्ताने ग्राहकांना विविध कंपनीतर्फे आकर्षक ऑफर्स

· गेल्या वर्षीच्या तुलनेत विक्रीत 20 टक्के वाढ झाल्याचे निरीक्षण

मुंबई, 28 सप्टेंबर 2022 : भारतात सणासुदीचे दिवस आलेले असताना तयारीत असताना, भारतातील आघाडीच्या फर्निचर सोल्यूशन्स ब्रँड असलेल्या ‘गोदरेज इंटेरिओ’ने आपल्या वार्षिक विक्रीमध्ये 40 टक्के वाढ साध्य करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. आतापर्यंत देशातील 2000 पिनकोड क्षेत्रांमध्ये डिलिव्हरी पॉइंट्स असलेल्या ‘गोदरेज इंटेरिओ’ने ही डिलिव्हरी पॉइंट्स ची संख्या आता 5 हजारांपर्यंत वाढवली आहे. गोदरेज समुहाची प्रमुख कंपनी असलेल्या ‘गोदरेज अँड बॉयस’ने याबाबतची घोषणा केली.

या ब्रॅंडची डिलिव्हरी पॉइंट्स 100 हून अधिक शहरांमध्ये वाढवून, या सणासुदीच्या हंगामात ई-कॉमर्स विक्रीद्वारे महसूल दुप्पट करण्याचे ‘गोदरेज इंटेरिओ’ने लक्ष्य बाळगले आहे. एप्रिल ते सप्टेंबर 2022 या काळात ‘गोदरेज इंटेरिओ’ने संपूर्ण भारतात टियर 1, 2 आणि 3 शहरांमध्ये 45 स्टोअर्स सुरू केलेली आहेत. विस्तृत भूप्रदेशातील ग्राहकांना अधिक सुलभता मिळावी, हा त्यामागचा हेतू आहे. एकंदरीत, फर्निचर खरेदीचा उत्कृष्ट अनुभव ग्राहकांना मिळवून देण्यासाठी ‘गोदरेज इंटेरिओ’ डिजिटल टूल्स आणि तंत्रज्ञानाचा वापर करीत आहे. त्यांच्याकडे ‘थ्री-डी रूम प्लॅनर’ आणि ‘व्हिज्युअलायझर्स’सारखे एकात्मिक तंत्रज्ञान आहे, जे त्यांच्या ग्राहकांना खरेदी प्रक्रियेत गुंतवून अधिक माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत करेल.

‘ग्रेट इंडियन फर्निचर फेस्ट’ या सणासुदीच्या ऑफरचा एक भाग म्हणून, कंपनीतर्फे ग्राहकांना बेडरूम, लिव्हिंग रूम, डायनिंग रूम आणि मॅट्रेसेस यांचा समावेश असलेल्या होम फर्निचर सेगमेंटमध्ये 30 टक्क्यांपर्यंतचा मेगा डिस्काउंट आणि 50 हजारांपर्यंतची कॅशबॅक मिळेल. ही ऑफर ऑनलाइन स्वरुपात आणि जवळच्या स्टोअरमध्ये प्रत्यक्ष खरेदीवर, अशा दोन्ही ठिकाणी मिळू शकते. ही ऑफर 17 सप्टेंबर 2022 ते 11 डिसेंबर 2022 पर्यंत वैध आहे. या ब्रँडने अलीकडेच आपल्या लोकप्रिय किचन्स सेगमेंटवर एक मोहीम सुरू केली आहे. यामध्ये भारतीय कुटुंबांच्या गरजांनुसार ऑफर तयार करण्यात कंपनीने आपले डिझाइन कौशल्य प्रदर्शित केले आहे.

‘गोदरेज इंटेरिओ’चे वरिष्ठ उपाध्यक्ष (बी-2-सी) सुबोध मेहता म्हणाले, “भारतात सणासुदीचे दिवस आले असल्याने आम्ही नाविन्यपूर्ण उत्पादनांचे सादरीकरण, मार्केटिंगच्या मोहिमा आणि शानदार ऑफर्सच्या संयोजन आयोजित करीत आहोत. आमचे विस्तीर्ण नेटवर्क आम्हाला देशभरातील ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास मदत करते. सणासुदीच्या काळातील आमची विक्री ही वार्षिक विक्रीच्या 35 ते 40 टक्के इतकी असते. या वर्षी, कोविडविषयक निर्बंध पूर्णपणे उठवण्यात आले असल्याने सण साजरे करण्याच्या आणि खरेदी करण्याच्या ग्राहकांच्या भावना उंचावल्या आहेत,. त्यासोबतच दुसऱ्या तिमाहीत आर्थिक पातळीवर सकारात्मक संकेत दिसत आहेत, गेल्या वर्षीच्या तुलनेत मागणीत यंदा 15-20 टक्के वाढ होण्याची आम्हाला अपेक्षा आहे. घरगुती फर्निचर, स्टोरेज, किचन आणि गाद्या या आमच्या श्रेणींमध्ये मागणी वाढली आहे आणि नवनवीन उत्पादने सतत सादर होत आहेत.”

मेहता पुढे म्हणाले, “आम्ही आमच्या ग्राहकांना भरीव सवलती आणि मोफत फर्निचर कार्ड यांसारख्या इतर सवलती देण्याच्या योजना आखत आहोत. त्यामुळे ग्राहकांना वाढीव मूल्य देता येईल आणि बाजारपेठेत आम्हाला खूप स्पर्धात्मक बनता येईल.”

Godrej Interio Sept 2022
Godrej Interio Sept 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *