गोदरेज इंटेरिओची मेट्रो लाइन २ए साठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासह भागीदारी I
गोदरेज इंटेरिओची मेट्रो लाइन २ए साठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासह भागीदारी
~आर्थिक वर्ष २५ पर्यंत टर्नकी प्रकल्प व्यवसायात ४५% नी वाढ करण्याचा प्रयत्न~
मुंबई, जानेवारी २०, २०२३: गोदरेज समूहाची एक प्रमुख कंपनी गोदरेज आणि बॉयसने जाहीर केले की, घरगुती आणि संस्थात्मक विभागात भारतातील आघाडीच्या फर्निचर सोल्यूशन्स ब्रॅंड असलेल्या गोदरेज इंटेरिओने मुंबईतील नव्याने उद्घाटन झालेल्या मेट्रो लाइन २ए च्या दहिसर ते डी एन नगर दरम्यानच्या ९ मेट्रो स्थानकांचा बाह्य दर्शनी भाग पूर्ण केला. नवीन मेट्रो मार्गाचे उद्घाटन १९ जानेवारी २०२३ रोजी भारताचे माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.
गोदरेज इंटेरिओने फॅब्रिकेशन साठी अंदाजे १८०० टन स्टील, ४८० मेट्रिक टन प्लास्टर आणि अंदाजे ४ लाख चौरस फूट हून अधिक बाहेरून दिसणारे लुव्हर वापरुन मेट्रो स्थानकांच्या बाह्य दर्शनी भागाचे काम यशस्वी रीतीने पूर्ण केले. हा प्रकल्प कोविड महामारीच्या काळात सुरू झाला आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) ने दिलेल्या निर्धारित मुदतीपूर्वीच पूर्ण झाला.
गोदरेज इंटेरिओचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि व्यवसाय प्रमुख स्वप्नील नगरकर म्हणाले, “पायाभूत सुविधा क्षेत्र हे भारतीय अर्थव्यवस्थेचे एक महत्त्वपूर्ण चालक आहे. २०२५ पर्यंत ५ ट्रीलिअन डॉलर्स ची अर्थव्यवस्था करण्याचे भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास आवश्यक आहे. मेक इन इंडिया मिशनच्या अनुषंगाने गोदरेज इंटेरिओ नेहमीच राष्ट्राच्या उभारणीत योगदान देण्यात आघाडीवर आहे. आम्हाला आनंद आहे की, हा प्रकल्प दिलेल्या वेळेपूर्वी पूर्ण झाला कारण हा मेट्रो प्रकल्प २०३१ पर्यंत जवळपास १० लाख प्रवाशांना जलद आणि सोयीस्कर वाहतूक प्रदान करेल. टर्नकी सोल्यूशन्स वितरित करण्याच्या आमच्या विशेष कुशलतेचा फायदा घेऊन देशभरात एक मजबूत सार्वजनिक वाहतूक नेटवर्क तयार करण्याच्या भारताच्या ध्येयात योगदान देऊन आम्ही प्रवाश्यांना उत्तम प्रवासाचा अनुभव देण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि मेट्रो रेल कॉर्पोरेशन सोबत काम करीत आहोत. सध्या आमचा टर्नकी प्रकल्प व्यवसाय बी२बी विभागातील आमच्या उलाढालीत २२% योगदान देतो आणि आर्थिक वर्ष २५ पर्यंत तो २०% च्या चक्रवाढ वार्षिक वाढीच्या दराने (CAGR) वाढण्यास सज्ज आहे.”
गोदरेज इंटेरिओने या पूर्वी बंगळूर, कोची आणि कोलकाता यासह देशभरातील विविध मेट्रो रेल्वे प्रकल्पांमध्ये भागीदारी केली आहे. जगाच्या अनेक भागांतील मेट्रो स्थानके शहराची संस्कृती प्रतिबिंबित करतात. त्यामुळे ग्राहकांच्या विनंतीनुसार गोदरेज इंटेरिओने देखील शहरातील वेगवेगळ्या मेट्रो प्रकल्पांमध्ये कलाकृतींच्या माध्यमातून शहरातील सांस्कृतिक वैभव दाखविले आहे. त्यांनी २०२० पासून ५०० कोटीहून अधिक पायाभूत सुविधा पूर्ण करण्याचे प्रकल्प आधीच मिळविले आहेत.
पायाभूत सुविधा पूर्ण करण्याचे प्रकल्पांच्या कामाच्या विस्तृत व्याप्तीमध्ये इंटिरियर, आर्ट फॉर्म, आर्किटेक्चरल फिनिश, सिविल फिनिश, क्लॅडिंग, ब्लॉक वर्क आणि बाह्य ग्लेझिंग यांचा समावेश आहे. सुरुवातीच्या संकल्पनेपासून ते शेवटी काम पूर्ण होईपर्यंत सर्वसमावेशक एंड टू एंड सोल्यूशन्स देऊन व्यवसायाच्या पायाभूत सुविधांद्वारे बाजारपेठेतील स्थिती मजबूत करण्यासाठी गोदरेज इंटेरिओ वचनबद्ध आहे. टीममधील कुशल वास्तुविशारद, इंटिरियर डिझाईनर आणि प्रकल्प व्यवस्थापक प्रवाश्यांना अखंड उत्कृष्ट अनुभव देण्यासाठी कंत्राटी पक्षाबरोबर काम करीत आहेत. कंपनीच्या सेवांमध्ये जनरल कॉंट्रॅक्टिंग डिझाईन आणि इंटिरियर डिझाईनपासून ते एमइपी पर्यंत आणि सुरक्षा व देखरेखीपासून ते एव्ही सिस्टम पर्यंत सर्वांची अंमलबजावणी समाविष्ट आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- वुमन ऑफ इम्पॅक्ट – प्रभावशाली महिलांचा सन्मान
- Grand Success of Sydenham’s Management Conclave 2024
- गोदरेज अँड बॉयसचे मुंबईच्या भूमिगत मेट्रोमध्ये योगदान
- Sydenham College Management Conclave ’24
- आजचे मार्केट अपडेट – 23 ऑगस्ट 2024 – सेन्सेक्स 33 अंकांनी वाढला आणि 81,086 वर बंद झाला: निफ्टी देखील 11 अंकांनी वाढला|Share market news in marathi