गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुप तर्फे ‘असिस्टिव्ह टेक कॉन्फरन्स’ चे आयोजन

गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपने आपल्या पहिल्या असिस्टिव्ह टेक कॉन्फरन्स 2025 चे आयोजन केले. तंत्रज्ञानाच्या मदतीने कामाच्या ठिकाणी सुलभता आणि समावेशन कसे वाढवता येईल याची पुनर्कल्पना करण्यासाठी नवनिर्माते, कंपन्या, संशोधक, दिव्यांग-अधिकार क्षेत्रातील नेते आणि खेळाडू एकत्र आले होते.

आंतरराष्ट्रीय दिव्यांग व्यक्ती दिन साजरा करत ही परिषद भारतातील सर्वांसाठी समान संधी असलेले कार्यस्थळ घडवण्याच्या प्रवासाला गती देण्यासाठी एक सहकार्यात्मक मंच ठरली.

गोदरेज DEI लॅबचे प्रमुख आणि क्वेरीस्तान या पुस्तकाचे लेखक पर्मेश शाहानी म्हणाले, “ही परिषद एका साध्या सोप्या सत्याला पुन्हा पुष्टी देत आहे: जेव्हा आपण संवेदनशीलतेने डिझाइन करतो, हेतुपूर्णरीत्या सहकार्य करतो आणि समानतेच्या बांधिलकीने नाविन्यपूर्णता आणतो तेव्हा आपण जिथे प्रत्येकजण प्रगती करू शकतो अशी एक दुनिया घडवतो. ॲसिस्टिव्ह टेक्नॉलॉजी ही तंत्रसाधनांची मालिका असण्यापलीकडे स्वावलंबन, सन्मान आणि संधीचा मार्ग आहे. आज आम्ही जे सादर केले ती तर फक्त सुरुवात आहे. भारतातील सुलभ कार्यपद्धतीचे भविष्य खुलेपणा, कल्पनाशक्ती आणि आपण गृहित धरतो त्या प्रणालींचा धाडसाने पुनर्विचार करण्यावर अवलंबून आहे.”

या परिषदेत समावेशक तंत्रज्ञान क्षेत्रातील 12 स्टार्ट-अप्स सहभागी झाले. काहींनी दिवसभर चाललेल्या प्रदर्शनात Access for All, NCPEDP आणि AssisTech Foundation यांसारख्या संस्थांचे वैशिष्ट्यपूर्ण ॲसिस्टिव्ह तंत्रज्ञान सादर केले. गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड यांनी ThisAbleMe Echo हे त्यांचे स्वतःचे अ‍ॅप सादर केले. हे प्रारंभी कर्मचाऱ्यांसाठी इन-हाउस उपलब्ध असेल. ThisAbleMe Echo हे सांकेतिक भाषेतून संवाद साधण्यास आणि संभाषणांचे सारांश देण्यास सक्षम साधन आहे.

गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेडच्या CHRO मेघा गोयल म्हणाल्या, “सुलभता ही आपण निर्माण करत असलेल्या प्रत्येक जागेच्या आणि अनुभवाच्या मूलभूत तत्त्वांचा भाग असायला हवी. ThisAbleMe Echo, हे एक AI-आधारित सांकेतिक भाषा इंटरप्रीटर असून तांत्रिक अडथळे दूर करण्याच्या आणि अखंड संवाद सुलभ करण्याच्या आमच्या बांधिलकीचे प्रतीक आहे. सर्वसमावेशक प्रत्यक्षातील वातावरणापासून ते तंत्रज्ञान-आधारित उपायांपर्यंत आम्ही असे भविष्य घडवत आहोत जिथे दिव्यांग व्यक्ती केवळ सामावून घेतल्या जाणार नाहीत तर नेतृत्व करतील, योगदान देतील आणि प्रगती करतील. आमच्यासाठी सुलभता म्हणजे मानवी क्षमतांना मुक्त करणारी आणि सर्वसमावेशक समुदाय काय साध्य करू शकतात याची व्याख्या बदलणारी परिसंस्था उभारणे.”

याचबरोबर, गोदरेज च्या आयटी टीम, गोदरेज AI Lab, गोदरेज गुड अँड ग्रीन यांनी AI-सक्षम संवाद साधने, सर्वसमावेशक डिजिटल इंटरफेसेस आणि दृष्टिहीन विद्यार्थ्यांसाठी स्पर्श-अनुभवाधारित शिक्षणसाहित्य अशा इन-हाउस नवकल्पना सादर केल्या. यानंतर गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स आणि Atypical Advantage यांच्या वतीने कंपन्यांना त्यांचे कार्य अधिक सर्वसमावेशक बनवण्यासाठी मदत करेल अशा EmployAbility Toolkit चे अनावरण करण्यात आले. दुपारच्या EmployAbility in Manufacturing Summit मध्ये उत्पादन आणि FMCG क्षेत्रातील अग्रणींनी सर्वसमावेशक पायाभूत सुविधा, कौशल्यविकासाच्या नवीन दिशा आणि प्रगत नेतृत्वाद्वारे कारखाने अधिक सुलभ आणि संधीसमृद्ध जागांमध्ये कसे बदलत आहेत यावर विचारमंथन केले.

गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स (GCPL)चे मनुष्यबळ विकास विभागाचे ग्लोबल प्रमुख वैभव राम म्हणाले, “भारतामध्ये दिव्यांग रोजगार क्षमता अत्यंत कमी असताना, GCPL अर्थपूर्ण बदल घडवण्यास कटिबद्ध आहे. आमच्या कारखान्यांमध्ये आम्ही आधीच 20 पेक्षा जास्त दिव्यांग व्यक्तींना रोजगार दिला आहे आणि हे काम इतर ठिकाणी व भूमिकांमध्ये विस्तारण्याची आमची योजना आहे. दिव्यांग समावेशन हा पर्याय नसून आवश्यकताच आहे हे ओळखणे महत्त्वाचे आहे. ‘वर्क दॅट इन्क्लूड्स’ टूलकीट हे Atypical Advantage आणि Integrative Solutions यांच्या सहकार्याने सादर करण्यात आले असून कंपन्यांना त्यांच्या सर्वसमावेशकतेच्या प्रवासाची मजबूत सुरुवात करून देते. यात आमच्यासारख्या संस्थांचे अनुभव एकत्रित केले असून उद्योग क्षेत्रातील इतरांना पुढचे पाऊल टाकण्यासाठी मार्गदर्शन करत आहे.”

दिवसाचा समारोप ‘India’s Accessible Futures’ या चर्चासत्राने झाला. गोदरेज कॅपिटल आणि गोदरेज DEI Lab यांनी तो आयोजित केला होता. यात न्यूरोक्विअर मानववंशशास्त्रज्ञ पारस अरोरा, पॅरा-बॅडमिंटन विजेती मानसी जोशी, NCPEDP चे संचालक अरमान अली, AssisTech Foundation च्या चाहत दुबे आणि IIM Bangalore येथील प्राध्यापक मुक्ता कुलकर्णी सहभागी झाले. चर्चेत ॲसिस्टिव्ह टेक्नॉलॉजी, डिझाईन थिंकिंग आणि वापरकर्त्यांद्वारे चालवली जाणारी नवकल्पना यामुळे सुलभतेची व्याख्या कशी बदलत आहे आणि कार्यशक्तीतील सहभाग कसा वाढतो आहे यावर प्रकाश टाकण्यात आला. देशभरात ॲसिस्टिव्ह टेक्नॉलॉजीचे मुख्य प्रवाहात रूपांतर करण्यासाठी अधिक परवडणाऱ्या वाजवी किंमतीत सहकार्य आणि धोरणात्मक पाठबळाचीही गरज अधोरेखित करण्यात आली.

गोदरेज कॅपिटलच्या CHRO भाव्या मिश्रा म्हणाल्या, “आम्ही सुलभतेकडे केवळ एक पार पाडण्याची पायरी म्हणून नव्हे, तर नाविन्यपूर्णता आणि सर्वसमावेशनाला चालना देणारा घटक म्हणून पाहतो. सुयोग्य, विचारपूर्वक भौतिक संरचना, सुलभ हालचाल, प्रवेशसुलभता, लवचिक कार्यपद्धती आणि तंत्रज्ञानावर आधारित न्याय्य भरती—या सर्वांद्वारे आम्ही असे वातावरण तयार करीत आहोत जिथे प्रत्येकजण प्रगती करू शकतो. नेतृत्व आणि ग्राहक-संवादी भूमिकांमध्ये दिव्यांग व्यक्तींना सक्षम करून आम्ही कार्यबलामध्ये खऱ्या विविधतेचे प्रतिनिधित्व साधण्याचा प्रयत्न करत आहोत. ही बांधिलकी आमच्या उत्पादनांपर्यंतही विस्तारत असून सर्व ग्राहकांना—विशेषतः आजवर दुर्लक्षित राहिलेल्या ग्राहकवर्गालाही—सेवा देऊ शकतील हे सुनिश्चित करत आहे. आमच्यासाठी सुलभता म्हणजे माणसांची, बाजारपेठांची आणि संधींची क्षमता खुली करणे आहे.”

गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुप भारतीय कॉर्पोरेट क्षेत्रात सुलभता, नाविन्यपूर्णता, उत्पादकता आणि वाढ यांच्याशी अविभाज्य नाते असलेली अधिक सर्वसमावेशक कार्यशक्ती उभी करण्यासाठी कटिबद्ध आहे.

Godrej Industries Assistance Tech Conference
Godrej Industries Assistance Tech Conference

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *