भारताला जागतिक डेटा सेंटर हब बनवण्यासाठी गोदरेज समूहाचा पुढाकार

देशात झपाट्याने विकसित होणा-या डेटा सेंटर क्षेत्रात गोदरेज एन्टरप्रायजेस ग्रुपने आता कंपनीचा विस्तार करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. गोदरेज एन्टरप्रायझेस ग्रुपने पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर, बसडक्ट सोल्युशन्स आणि ग्रीन कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांसारख्या एकात्मिक सेवांद्वारे या क्षेत्रावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. या अत्याधुनिक आणि वैविध्यपूर्ण सेवांवर लक्ष केंद्रित करुन विविध आर्थिक टप्प्याचा विकास साधला जाईल. कंपनी एनर्जी सोल्यूशन्स या व्यवसायातून आगामी ३ वर्षांत आपल्या एकूण महसूलापैकी १० ते १५ टक्के महसूल डेटा सेंटर विभागातून मिळवण्याचे उद्दिष्ट बाळगत आहे. भारताला जागतिक डिजिटल पायाभूत सुविधा केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी केंद्र सरकारच्या धोरणात्मक प्रयत्नांशी सुसंगत ही नवी विस्तार योजना असल्याचे कंपनीच्यावतीने सांगण्यात आले. केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ सादरीकरणादरम्यानही या क्षेत्रावर विशेष भर देण्यात आला आहे.

गोदरेज एनर्जी सोल्युशन्सचे बिझनेस हेड राघवेंद्र मिर्जी यांनी कंपनीच्या नव्या विस्तार धोरणाबाबत आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, ‘‘भारतामधील डेटा सेंटर क्षेत्र सध्या झपाट्याने वाढीच्या टप्प्यात प्रवेश करत आहे. मजबूत सरकारी धोरणे आणि वाढती डिजिटल पायाभूत सुविधांची गरज यामुळे या क्षेत्राला मोठा आधार मिळत आहे. मात्र, आज उभारल्या जाणा-या प्रकल्पांमध्ये डेटा सेंटर ही अत्यंत जास्त वीज वापरणारी सुविधा असल्याने ऊर्जा व्यवस्थापन हे मोठे आव्हान ठरत आहे. त्यामुळे अखंड आणि विश्वासार्ह वीजपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी अत्याधुनिक व मजबूत वीज पायाभूत सुविधा उभारण्याची मोठी संधी आमच्या पॉवर इन्फ्रास्ट्रक्टर व्यवसायासाठी निर्माण झाली आहे.’’

‘‘आमच्या मॉड्युलर बसडक्ट प्रणालीला ग्रीन बिल्डींग क्षेत्रातील तज्त्रतेची जोड दिल्यास देशभरातील हायपरस्केलर्स आणि मोठ्या उद्योगसंस्थांना जलद गतीने विस्तार करण्यास मदत होईल. ऊर्जा वापर, खर्च आणि कार्बन उत्सर्जन लक्षणीयरित्या कमी होईल. पर्यावरणपूरक सल्लागार सेवांमधील आमचा अनुभव आणि मोठ्या स्तरावरील प्रकल्पांसाठी विद्युत उपाय पुरवण्याची क्षमता यामुळे या बदलत्या गरजांना समर्थपणे हाताळण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. उद्योगांना कार्यक्षम होण्यासाठी तसेच शाश्वत आणि भविष्यातील पायाभूत सुविधा उभारण्यात आमची भूमिका महत्त्वपूर्ण ठरु शकते’’, असेही त्यांनी नमूद केले.

देशाची डिजिटल अर्थव्यवस्था झपाट्याने विस्तारत असताना डेटा सेंटर्स ही सर्वाधिक ऊर्जा वापरणारी पायाभूत सुविधा म्हणून उदयास येत आहे. देशातील डिजिटल प्रगतीत या सुविधांचे धोरणात्मक महत्त्व लक्षात घेता केंद्र सरकारने डेटा सेंटर आणि क्लाऊड पायाभूत सुविधांसाठी दीर्घकालीन सवलत जाहीर केली आहे. यासह विविध धोरणात्मक पाठबळही दिले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर ऊर्जा-कार्यक्षम प्रणाली उभारणा-या आणि अपारंपरिक ऊर्जेचा समावेश करु शकणा-या एकात्मिक उपाय पुरवठादारांसाठी मोठी संधी निर्माण होणार आहे. मुळात डेटा सेंटर्सस ही ऊर्जा केंद्रित असल्याने विश्वासार्ह आणि अखंड वीजपुरवठा उपलब्ध करुन देण्याची गरज आहे. त्याकरिता स्वतंत्र आणि सक्षण विद्युत पायाभूत सुविधा उभारायला हव्यात. यामध्ये कार्यक्षमता, सुरक्षितता आणि विश्वासार्हता वाढवण्यासाठी इलेक्ट्रिकल बसडक्ट प्रणाली तसेच नेट-झिरो उद्दिष्टे साध्य करण्यासाठी हरित सल्लागार उपायांची आवश्यकता अधिक महत्त्वाची ठरत आहे.

गोदरेज कंपनीने आजवर अनेक हायपरस्केल आणि कोलोकेशन डेटा सेंटर प्रकल्पांची यशस्वी अंमलबदावणी करुन या क्षेत्रातील आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. हे सर्व प्रकल्प ग्रीनफिल्ड आणि कोलोकेशन या धर्तीवर विकसित करण्यात आले असून, त्यांचे आरेखन पर्यावरणपूरक अशा आयजीबीसी किंवा लीड मानांकनानुसार करण्यात आले आहे. शाश्वतता आणि उच्च कार्यक्षमता यांचा मेळ साधत, गोदरेज आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने या क्षेत्रातील आपली विश्वासार्हता अधिक बळकट केली आहे.

कंपनीने आजतागायत अनेक प्रमुख डेटासेंटर कंपन्यांसोबत यशस्वीरित्या काम केले आहे. देशातीत अग्रगण्य डेटा कंपन्यांना गोदरेजकडून उच्च दर्ज्याचा सेवा मिळाल्या आहेत. या अनुभवाच्या आधारे कंपनी आपली ऑर्डर बँक अधिक मजूत करण्याच्या उद्देशाने देशातील प्रमुख डेटा सेंटर विकासकांसोबत सहकार्य वाढवत आहे. विशेषतः उच्च क्षमतेच्या वीज उपकेंद्रांची उभारणीबसडक्ट प्रणालीची स्थापना व पुरवठा तसेच पर्यावरणपूरक ऊर्जा कार्यक्षण इमारतींसाठी ग्रीन बिल्डींग कन्सल्टन्सी सेवा देण्यावरही कंपनी भर देत आहे. या सर्व उपाययोजनांमुळे डेटा सेंटर प्रकल्प अधिक सुरक्षितकार्यक्षणविश्वासार्ह आणि शाश्वत पद्धतीने उभारले जावेत, हा कंपनीचा मुख्य उद्देश आहे. यातून डिजिटल पायाभूत सुविधांच्या विकासात महत्त्वाचे योगदान देण्यासाठी कंपनी प्रयत्नशील आहे.

उद्योग क्षेत्रातील अंदाजानुसार, देशात डेटा सेंटर क्षमता आता मोठ्या प्रमाणात विस्तारिकरणाच्या मार्गावर आहे. येत्या काळात ही डेटा सेंटर क्षमता सुमारे १.७ गिगावॅटपर्यंत झेपावण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. डिजिटल तंत्रज्ञानाच्या वाढता वापर, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित कामकाज, देशातच डेटा साठवण्याचे धोरण आणि जलगगतीने विस्तारत असलेली क्लाउड पायाभूत सुविधा या घटकांमुळे येत्या काही वर्षांतही सातत्याने नवीन क्षमता विकसित होत राहील. हा विकास लक्षात घेता गोदरेज एन्टरप्राजझेस ग्रुप या क्षेत्राला आपल्या दीर्घकालीन प्रगतीसाठी एक धोरणात्मक संधी मानत आहे. कंपनीने या क्षेत्रात विकास साधण्यासाठी ऊर्जा-कार्यक्षम आणि सक्षम डिजीटल पायाभूत सुविधा उभारण्यात महत्त्वाची भूमिका साकारण्याचे ध्येय बाळगले आहे. भारताला जागतिक स्तरावरील डेटा आणि तंत्रज्ञान केंद्र बनवण्याचे उद्दिष्ट बाळगत कंपनीने आपली भविष्यातील नियोजन आखले आहे. या महत्त्वकांक्षेला बळ देण्यासाठी कंपनी कटिबद्ध राहील.

WhatsApp courses 50 offer
WhatsApp courses 50 offer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *