गोदरेज लॉक्सतर्फे २०२४ मध्ये डिजिटल लॉक्स बाजारपेठेतील उत्पन्नात १० टक्क्यांनी वाढ करण्याचे उद्दिष्ट

गोदरेज लॉक्सतर्फे २०२४ मध्ये डिजिटल लॉक्स बाजारपेठेतील उत्पन्नात १० टक्क्यांनी वाढ करण्याचे उद्दिष्ट

डिजिटल पातळीवर सातत्याने विकसित होत असलेल्या जगात गोदरेज लॉक्स या गोदरेज समूहाची प्रमुख कंपनी गोदरेज अँड बॉइसच्या व्यवसाय विभागाने आर्थिक वर्ष २५ मध्ये डिजिटल लॉकिंग उत्पादनाच्या बाजारपेठेत मोठा हिस्सा मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या १२५+ वर्षांचा वारसा लाभलेल्या या ब्रँडला बाजारपेठेवर वर्चस्व मिळवण्याचा विश्वास वाटत असून त्यासाठी २५ नवी उत्पादने लाँच करण्याचा विचार आहे व त्याचा ५० टक्के वाटा जंम्प अँड लीप इनोव्हेशनमधून येणार आहे.

गोदरेज लॉक्सने नुकत्याच केलेल्या ‘लिव्ह सेफ, लिव्ह फ्री’ या अहवालानुसार त्यात सहभागी झालेल्या दोन तृतीयांश नागरिकांनी त्यांच्या घराच्या सुरक्षिततेसाठी यापूर्वीच स्मार्ट लॉक्स वापरायला सुरुवात केल्याचे सांगितले. हा अहवाल नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो डेटानुसार सुरक्षेला सर्वाधिक धोका असलेल्या मुंबई, दिल्ली, कोलकाता, भोपाळ आणि बेंगळुरू या पाच शहरांमध्ये करण्यात आला.

स्मार्ट होम तंत्रज्ञान आणि डिजिटल होम सेफ्टी उत्पादनांचा वापर वाढत असून ही उत्पादने सोयीस्कर तसेच अत्याधुनिक सुरक्षा वैशिष्ट्यांनी युक्त आहेत. गोदरेज लॉक्सने याच क्षेत्रात विकास करण्याचे ध्येय ठेवले आहे. सध्या डिजिटल लॉक्सचा उत्पन्नातील वाटा ४ टक्के आहे आणि पुढील तीन वर्षांत हा विकास २० टक्क्यांनी विकसित करण्याचे ध्येय आहे.

गोदरेज लॉक्स अँड आर्किटेक्चरल फिटिंग्ज अँड सिस्टीमचे व्यवसाय प्रमुख श्याम मोटवानी म्हणाले, ‘सुरक्षा उत्पादन क्षेत्रातील विश्वासार्ह नाव असलेल्या गोदरेज लॉक्सने नाविन्यपूर्ण डिजिटल होम सेफ्टी उत्पादन क्षेत्रात प्रवर्तकीय भूमिका बजावत सोयीस्करपणा आणि ब्रँडचा नाविन्यपूर्ण व स्मार्ट दृष्टीकोन यांची सांगड घातली. गृह सुरक्षेची अत्याधुनिक उत्पादने आधुनिक तंत्रज्ञानासह सादर करण्यावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. बाजारपेठेत २३ टक्के हिस्सा मिळवत आम्ही आमचे स्थान बळकट केले आहे. दरम्यान एकूण व्यवसायातील डिजिटल लॉक्सचे योगदान आम्ही वाढवत असून येत्या वर्षात त्यात १० टक्क्यांनी वाढ करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी ग्राहकांच्या गरजा आणि कलात्मकता यांची सांगड घातलेली नवी उत्पादने सादर केली जाणार आहेत. गृह सुरक्षा क्षेत्रात सातत्याने विकसित होत असलेल्या या डिजिटल युगात ग्राहकांना विश्वासार्ह आणि आधुनिक लॉकिंग सुविधा पुरवून त्यांचे घर सुरक्षित ठेवण्याचे आमचे ध्येय आहे.’

निवासी आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील भारतातील पहिले इंटरकनेक्टेड डिजिटल लॉक लाँच करत गोदरेज लॉक्सने भारतीय डिजिटल बाजारपेठेतील आपले स्थान बळकट केले आहे. ग्राहकांना वैशिष्ट्यपूर्ण आणि तंत्रज्ञानयुक्त डिजिटल लॉक्सच्या विस्तृत श्रेणीतून निवड करता येणार आहे. किल्लीशिवाय प्रवेश, रिमोट अक्सेस कंट्रोल, रियल टाइम मॉनिटरिंग अशी वैशिष्ट्ये ग्राहकांचा अनुभव उंचावतात. कंपनी नाविन्य आणि ग्राहकाभिमुखता यांवर जास्त भर देत डिजिटल लॉक्स व्यवसायाचा विस्तार करणार आहे.

Godrej COIT Hospitality Lock
Godrej COIT Hospitality Lock

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *