गोदरेज लॉक्सच्या प्रीमियम दर्जाच्या डिजिटल लॉक्सने जपा सुरक्षितता I
गोदरेज लॉक्सच्या प्रीमियम दर्जाच्या डिजिटल लॉक्सने जपा सुरक्षितता I
~ गोदरेज लॉक्स आणि आर्किटेक्चरल फिटिंग्ज डिजिटल लॉक्सना CII पुरस्काराने करण्यात आले सन्मानित ~
गोदरेज अँड बॉयसची व्यवसाय शाखा असलेली गोदरेज लॉक्स अँड आर्किटेक्चरल फिटिंग्ज (GLAFS) कंपनी उत्कृष्टतेच्या अथक प्रयत्नाने कुलूप उद्योगात नवीन मापदंड प्रस्थापित करत आहे. या ब्रँडला नुकतेच त्याच्या भविष्यकालीन दृष्टिकोनासाठी आणि गुणवत्तेसाठीच्या अतूट बांधिलकीसाठी प्रतिष्ठेच्या कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII) स्पर्धेत नावाजण्यात आले. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री ही जी गुणवत्ता वाढीच्या उपक्रमांना चालना देण्यासाठीचे महत्वपूर्ण मंडळ असलेली गुणवत्ता संवर्धन संस्था आहे. ब्रँडने त्यांच्या उत्पादनांसाठी प्रतिष्ठेचे गोल्ड आणि प्लॅटिनम पुरस्कार जिंकलेले आहेत. बहुमोल सहाय्य प्रणाली आणि साधनांसह, संस्था आजच्या स्पर्धात्मक परिक्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी संस्थांना सक्षम करते.
या यशावर भाष्य करताना गोदरेज लॉक्स अँड आर्किटेक्चरल फिटिंग्ज अँड सिस्टिम्सचे व्यवसाय प्रमुख श्री. श्याम मोटवानी म्हणाले, “सीआयआयकडून मिळालेल्या मान्यतेबद्दल आम्ही खरोखरच कृतज्ञ आहोत. हा प्रतिष्ठेचा सन्मान मिळाल्यामुळे उच्च-गुणवत्तेची भविष्यकालीन उत्पादने घडविण्याप्रती असलेली आमची अतूट बांधिलकी ठळकपणे दिसून येते. आमची उत्पादने सातत्याने उच्च गुणवत्तेच्या मानकांची पूर्तता करतात हे सुनिश्चित करत कामाच्या प्रत्येक पैलूमध्ये आम्ही घेत असलेले काटेकोर प्रयत्न यातून अधोरेखित होतात. अशा आदरणीय उद्योग संस्थेकडून मिळालेली मान्यता अत्यंत काळजी आणि अचूकतेसह अतुलनीय उत्पादने बनविण्याचा आमचा निर्धार वाढवते. GLAFS मध्ये, आमच्या ग्राहकांसाठी केवळ केवळ संबंधित नाही तर सुरक्षिततेच्या सर्वोच्च मानकांना प्राधान्य देणारी सुविधा देत असल्याचे सुनिश्चित करत आम्ही भविष्यकालीन तंत्रज्ञानात गुंतवणूक करण्यासाठी आणि उत्पादन नियोजनाकरता धोरणात्मक दृष्टीकोनाच्या अंमलबजावणीसाठी वचनबद्ध आहोत.”
एकूण उत्पादक देखभाल (TPM) आणि दर्जेदार सर्वोत्तम पद्धतींच्या अंमलबजावणीद्वारे कामकाजीय उत्कृष्टता आणि उच्च उत्पादन मानके सुनिश्चित करण्यासाठी GLAFS परिश्रमपूर्वक कार्य करत आहे. सर्व कर्मचाऱ्यांना सक्रिय आणि प्रतिबंधात्मक देखभाल कार्यात सहभागी करून घेत TPM क्रियांनी डाउनटाइम लक्षणीयरीत्या कमी केला असून उत्पादकता वाढवली आहे. कठोर प्रक्रियेतील तपासणी, कायझेन सारखे सातत्यपूर्ण सुधारणा उपक्रम आणि पुरवठादारांशी जवळचे सहकार्य यातून GLAFS गुणवत्तेप्रती असलेली आपली बांधिलकी प्रदर्शित करत आहे. परिणामी असाधारण विश्वासार्हता, कार्यक्षमता आणि उत्पादन गुणवत्ता दिसून येते. इतर उद्योगांसमोर मापदंड असणारे आव्हानात्मक लक्ष्य उभारून GLAFS सातत्याने ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करणारी उत्कृष्ट उत्पादने सादर करत आहे.
नुकत्याच झालेल्या CIl स्पर्धेच्या गुणवत्ता गट स्पर्धेत १०८ कंपन्यांपैकी GLAFS अग्रणी राहिली. त्यांच्या दोन संघांनी प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळवले. जोडीला जिथे ५४ सहभागींनी मान्यता मिळवण्यासाठी स्पर्धा केली अशा जिसू होजेन (JH) मंडळ स्पर्धेत ब्रँडने देखील त्यांच्या स्वायत्त देखभाल पद्धतींच्या अंमलबजावणीचे प्रदर्शन केले आणि उपकरणांची विश्वासार्हता, सुरक्षितता आणि एकूण कामकाज कार्यक्षमतेमध्ये केलेल्या सुधारणांचे प्रदर्शन केले आणि त्यामुळे स्पर्धा जिंकली.
बाजारातील प्रवाह ओळखून आणि ग्राहकांच्या सतत बदलत्या मागण्या पूर्ण करत भविष्यकालीन दृष्टिकोन असलेली उत्पादने आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानामध्ये सतत गुंतवणूक करून कंपनी नाविन्यपूर्णतेत आघाडीवर राहिली आहे. कंपनीला आपल्या उत्पादनांसाठी टियर-2, 3, 4 गावे आणि शहरांमध्ये प्रचंड संधी दिसत असल्यामुळे कंपनीने सध्याच्या ३०% वरून ५०% बाजारपेठीय हिस्सा मिळवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. GLAFS हे उल्लेखनीय यश साजरे करत असताना ग्राहकांच्या अपेक्षा ओलांडणारी सर्वोत्तम उत्पादने वितरीत करण्याच्या बांधिलकीबाबत ठाम असून नाविन्यपूर्णता आणि गुणवत्तेच्या सीमा ओलांडून उद्योगक्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणायला चालना देत आहे.
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3SHI9y3
शेअर ट्रेडींगची १८ प्रभावी सूत्रे – 18 Rules of Share Trading (Marathi Edition) Kindle Edition – https://amzn.to/3ul6ZvT
18 Effective Rules of Stock Trading Kindle Edition – Click on link to Read Free on Amazon Kindle or buy – https://amzn.to/3HXqUUw – English
- वुमन ऑफ इम्पॅक्ट – प्रभावशाली महिलांचा सन्मान
- Grand Success of Sydenham’s Management Conclave 2024
- गोदरेज अँड बॉयसचे मुंबईच्या भूमिगत मेट्रोमध्ये योगदान
- Sydenham College Management Conclave ’24
- आजचे मार्केट अपडेट – 23 ऑगस्ट 2024 – सेन्सेक्स 33 अंकांनी वाढला आणि 81,086 वर बंद झाला: निफ्टी देखील 11 अंकांनी वाढला|Share market news in marathi