गोदरेज अँड बॉयसचे मुंबईच्या भूमिगत मेट्रोमध्ये योगदान
गोदरेज अँड बॉयसचे मुंबईच्या भूमिगत मेट्रोमध्ये योगदान
या प्रकल्पामुळे शहरातील गर्दी १५% ने कमी होईल, तसेच भारताच्या २०७० च्या नेट झीरोच्या उद्दिष्टात योगदान मिळेल, अशी अपेक्षा आहे.
भारतातील शहरी पायाभूत सुविधा वाढविण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत, गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपचा भाग असलेल्या आणि गोदरेज अँड बॉइस इलेक्ट्रिकल्स आणि इलेक्ट्रॉनिक्सने मुंबईच्या भूमिगत मेट्रो प्रकल्पांपैकी एकाचे इलेक्ट्रिकल काम पूर्ण केले आहे. गोदरेज आणि बॉयसने तीन स्टेशनांवर अत्याधुनिक विद्युत प्रणाली अखंडितपणे एकत्र करून अधिक कनेक्टेड, कार्यक्षम आणि टिकाऊ मेगासिटीचा पाया घातला आहे. या प्रकल्पाची ऑर्डर व्हॅल्यू 67 कोटी आहे.
राघवेंद्रमिरजी, कार्यकारीउपाध्यक्षआणिबिझनेसहेड, गोदरेजएंटरप्रायझेसग्रुपचाएकभाग, गोदरेजअँडबॉइसअंतर्गतइलेक्ट्रिकल्सआणिइलेक्ट्रॉनिक्सम्हणाले, “गोदरेज अँड बॉइसमध्ये आमचा मत आहे कि मजबूत सार्वजनिक वाहतूक सुविधा ही शाश्वत शहरी विकासाचा कणा आहे. एखादा खासगी समूह देशाच्या पायाभूत सुविधा विकासाच्या उद्दिष्टांना प्रभावीपणे कसे समर्थन देऊ शकतो, हे आम्ही मुंबई मेट्रो लाइन 3 प्रकल्पातील आमच्या सहभागाने दाखविले आहे. आमचे अभियांत्रिकी कौशल्य, नावीन्यपूर्ण उपाय आणि ‘मेक इन इंडिया‘ची वचनबद्धता एकत्र आणून, आम्ही केवळ मेट्रो लाइनचे विद्युतीकरण करत नाही, तर आम्ही शहरी गतिशीलतेचे भविष्य घडवत आहोत. हे प्रोजेक्ट, जटिल पायाभूत सुविधा प्रकल्प राबविण्याच्या भारताच्या वाढत्या क्षमतेचा दाखला आहे. अशा गंभीर उपक्रमांमध्ये नवनवीन शोध आणि योगदान देत राहिल्यामुळे, जागतिक दर्जाच्या सार्वजनिक वाहतूक व शाश्वत शहरी विकासाचे भारताचे स्वप्न साकार करण्यात आमची भूमिका बजावण्यात आम्हाला अभिमान वाटतो.”
भूमिगत मेट्रो कामांच्या प्रकल्पात कंपनीच्या सहभागाची व्याप्ती देशाच्या प्रगतीसाठी महत्त्वाच्या असलेल्या जटिल पायाभूत सुविधा कार्यान्वित करण्यात कंपनीचे योगदान दर्शविते. विद्युत सेवांचा पुरवठा, स्थापना, चाचणी आणि ते कार्यान्वित करण्याची जबाबदारी या कंपनीवर होती. या सर्वसमावेशक उपक्रमामध्ये अत्याधुनिक वीज वितरण उपाय, प्रगत प्रकाश व्यवस्था आणि अत्याधुनिक वायुवीजन पायाभूत सुविधांची अंमलबजावणी करणे याचा समावेश आहे. ऊर्जा-कार्यक्षम उपायांमुळे मेट्रोच्या परिचालन खर्चात, तसेच मानवी व्यवहारांचा पर्यावरणावर होणाऱ्या परिणामात लक्षणीय घट होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे भारताच्या 2070च्या निव्वळ-शून्य उद्दिष्टात योगदान मिळेल, शिवाय जबाबदारीने आणि भविष्याकडे लक्ष देऊन पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी गोदरेज अँड बॉयसची बांधिलकी असून, या प्रकल्पामुळे शहरातील गर्दी 15% कमी होईल, असा अंदाज आहे.
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3SHI9y3
शेअर ट्रेडींगची १८ प्रभावी सूत्रे – 18 Rules of Share Trading (Marathi Edition) Kindle Edition – https://amzn.to/3ul6ZvT
18 Effective Rules of Stock Trading Kindle Edition – Click on link to Read Free on Amazon Kindle or buy – https://amzn.to/3HXqUUw – English
- ‘खवणे कयाक्स’ ठरला ‘मोस्ट पॉप्युलर ब्रँड’
- ‘ईशा टूर्स’ ठरला ‘मोस्ट इनोव्हेटिव्ह ब्रँड’
- मराठी माणूस जोखीम घेऊन मोठा व्यवसाय करू शकतो – डॉ. अविनाश फडके
- राजगुरू टूर्सचा ‘बेस्ट कस्टमर सर्व्हिस ब्रँड’ पुरस्काराने सन्मान
- उद्योग व्यवसायात येण्यासाठी मराठी माणसांची मानसिकता बदलणे गरजेचे