मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात दिव्यांग व्यक्तींना रोजगार देण्यासाठी देशातील पहिला टूलकिट
वैविध्य, सर्वसमावेशकता आणि समानतेसाठी वचनबद्ध असलेली भारतातील आघाडीची कंपनी गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडने (जीसीपीएल) दिव्यांग लोकांसाठी देशातील सर्वात मोठे उपजीविका व्यासपीठ असलेल्या अॅटिपिकल अॅडव्हान्टेजसह एम्प्लॉयअॅबिलिटी इन मॅन्युफॅक्चरिंग समिट 2025चे मुंबईत यशस्वी आयोजन केले. या समिटने भारतातील मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात दिव्यांग व्यक्तींचा समावेश वाढवण्यासाठी उद्योग जगतातील नेते, धोरणकर्ते यांना एकत्र आणले.
मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात 3 कोटींहून अधिक कामगार आहेत, तरीही सर्वसमावेशकतेचा विचार केला तरी लक्षणीय तफावत दिसते. खासगी क्षेत्रातील कामगार म्हणून अपंग व्यक्तींच्या (PwD) सहभागाचे प्रमाण हे फक्त 36% आहे, तर अपंग नसलेल्यांसाठी हे प्रमाण सुमारे 60% आहे. यासाठीच या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. ‘सर्वसमावेशकता गरजेची का आहे’ ते ‘कंपन्या ही सर्वसमावेशकता व्यावहारिकरित्या कशी अंमलात आणू शकतील’ याचा विचार करणे हा याचा उद्देश होता.
या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे ‘वर्क दॅट इनक्लुड्स’ या भारतातील पहिल्याच एम्प्लॉयअॅबिलिटी टूलकिटचे लाँचिंग. मॅन्युफॅक्चरिंग युनिट्सना दिव्यांगांचा अर्थपूर्ण समावेश साध्य करण्यास मदत करण्यासाठी तयार केलेले एक व्यावहारिक, अंमलबजावणीसाठी तयार मार्गदर्शक आहे. दिव्यांगांना सर्वसमावेशकतेची वागणूक मिळावी यासाठी प्रयत्नशील असलेल्या राष्ट्रीय आयकॉन इरा सिंघल (IAS) यांच्या उपस्थितीत, उद्योगातील महत्त्वाच्या नेत्यांसमोर या टूलकिटचे उद्घाटन करण्यात आले. जॉब मॅपिंग, अॅक्सेसिबिलिटी चेकलिस्ट, वर्कफ्लो रीडिझाइन, इंडियन साइन लँग्वेज (ISL) शब्दकोश आणि वास्तविक-जगातील केस स्टडीज संदर्भात सविस्तर मार्गदर्शन करते. FMCG, ऑटोमोबाइल्स, सेमीकंडक्टर्स आणि इतर क्षेत्रांमधून गोळा केलेल्या माहितीच्या आधारे तसेच इंटिग्रेटिव्ह सोल्युशन्सद्वारे संशोधित असे हे टूलकिट आहे. कारखान्यातील कामकाजात दिव्यांगांना देखील समाविष्ट करण्यासाठी हे टूलकिट एक व्यापक मार्ग प्रदान करते.
“नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेयर्स (NIUA)च्या अहवालानुसार, अधिकृत अपंगत्वाचे 2.21% हे प्रमाण भारतातील दिव्यांगांची एकूण संख्या कमी दर्शवते. वास्तविक सर्वसमावेशकतेमुळे कामगिरीवर सकारात्मक परिणाम होतो. परंतु उत्पादकता आणि सुरक्षेबद्दलच्या जुन्या समजांमुळे दिव्यांग व्यक्तींना सामावून घेण्याचे मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राचे प्रमाण अत्यंत कमी आहे,“ असे अॅटिपिकल अॅडव्हांटेजचे संस्थापक विनीत सराईवाला म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “जीसीपीएल सारख्या कॉर्पोरेशन्स हे दाखवून देतात की, जेव्हा जाणीवपूर्वक काही गोष्टी केल्या जातात तेव्हा मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील सर्वसमावेशक भरती ही व्यावहारिक आणि फायद्याची देखील ठरते. अपंग व्यक्तींना भरती करणे हे ऑपरेशनल आणि सांस्कृतिक दोन्ही दृष्टीने यशस्वी व्हावे यासाठी जीसीपीएलने मोठी गुंतवणूक केली. योग्य यंत्रणा आणि मानसिकतेसह, सर्वसमावेशन शक्य होतेच. असा समावेश कंपन्या, समाज आणि देशासाठी खूप फायदेशीर ठरतो.”
अॅटिपिकल अॅडव्हान्टेजच्या प्रयत्नांमुळे गेल्या पाच वर्षांत जीसीपीएल, नेस्ले, मायक्रोन, टाटा मोटर्स, अरेबिल सोल्युशन्स आणि निव्हिआ सारख्या आघाडीच्या कंपन्यांमध्ये दिव्यांगांची भरती शक्य झाली आहे. यामुळे उत्पादकतेत वाढ होण्यासोबतच त्यांच्याबद्दलची मते बदलण्यात आणि नियम पालनात लक्षणीय वाढ दिसून आली आहे.
मध्य प्रदेशातील मालनपूर आणि तामिळनाडूतील चेंगलपट्टू येथील जीसीपीएलच्या मॅन्युफॅक्चरिंग युनिट्सनी सुलभ, सर्वसमावेशक आणि उच्च-कार्यक्षम वातावरणासाठी राष्ट्रीय स्तरावर स्वतःला सिद्ध करून त्या क्षेत्रात बेंचमार्क स्थापित केला आहे. जॉब मॅपिंग, पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा, भारतीय सांकेतिक भाषा (आयएसएल) साधने आणि तांत्रिक प्रशिक्षण यांचा समावेश करत दिव्यांगांचा समावेश कामाच्या ठिकाणची संस्कृती कशी मजबूत करू शकतो आणि त्याचबरोबर ऑपरेशनल उत्कृष्टतेतही कशी वाढ होते, हे जीसीपीएलने आपल्या उत्तम नियोजनाने दाखवून दिले आहे.
गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्सचे (जीसीपीएल) ग्लोबल हेड – एचआर वैभव राम म्हणाले, “अपंग व्यक्तींना रोजगार देण्याचे प्रमाण भारतात अत्यंत कमी आहे. पण त्यांच्यातील क्षमता पाहून जीसीपीएल यात अर्थपूर्ण बदल घडवून आणण्यासाठी वचनबद्ध आहे. आम्ही आमच्या कारखान्यांमध्ये अपंगत्व असलेल्या २० हून अधिक व्यक्तींना आधीच रोजगार दिला आहे. आणि आता वेगळे काम देऊन त्यांचे प्रमाण कसे वाढवता येईल, यासाठी प्रयत्नशील आहोत. दिव्यांगांचा समावेश हा केवळ एक पर्याय नाही तर ती एक गरज आहे हे ओळखणे महत्त्वाचे आहे. अॅटिपिकल अॅडव्हान्टेज आणि इंटिग्रेटिव्ह सोल्युशन्सच्या भागीदारीत लाँच केलेले ‘वर्क दॅट इनक्लुडस्‘ टूलकिट कंपन्यांना त्यांच्या सर्वसमावेशक प्रवासासाठी एक मजबूत सुरुवात करून देतो. आमच्यासारख्या संस्थांकडून शिकलेल्या गोष्टींचा योग्य पद्धतीने वापर करून आणि उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांना या संदर्भात अधिक विचार करत पुढचे पाऊल उचलण्यासाठी पोषक अशी परिस्थिती निर्माण करतात.”
जीसीपीएलच्या पीडब्ल्यूडी (पर्सन विथ डिसॅबिलिटी) समावेशन प्रवासाबद्दल वैभव राम म्हणाले, “आमचे कारखाने हे दाखवून देतात की, उत्पादकता आणि चांगल्या मनाने केलेली मदत एकत्र नांदू शकतात. यातूनच कामाची ठिकाणे अधिक कार्यक्षम होतात आणि कामगारांमध्ये आपलेपणाची भावना वाढीस लागते. आम्ही आमच्या शिक्षण व्यवस्थापन प्रणालीमध्ये (एलएमएस) अपंगत्व-जागरूकता आणि भारतीय सांकेतिक भाषा (आयएसएल) मॉड्यूल एकत्रित करून दीर्घकालीन क्षमता प्रणालींमध्ये अपंगत्व समावेशन अंतर्भूत करत आहोत. यामुळे सर्वसमावेशक संवाद आणि नेतृत्व आमच्या मुख्य प्रशिक्षणाचा अविभाज्य भाग ठरतो आहे.”
‘वर्क दॅट इन्क्लुड्स’ टूलकिट म्हणजे सीएसआर उपक्रम नाही तर तो एक धोरणात्मक व्यावसायिक फायदा आहे. भारताचे मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र जसजसे विस्तारत आहे तसतसे दिव्यांगांचा समावेश ही सामाजिक जबाबदारी तर ठरतेच पण ती आणि एक महत्त्वाची आर्थिक संधी म्हणून समोर येते आहे.
खालील लिंकवरून टूलकिट डाउनलोड करा:

- लोकप्रिय नव्हे, Right Career Choice – प्राजक्ताचा विश्वविक्रमी उपक्रम
- होळीमध्ये केसांचे आरोग्य जपण्यासाठी स्मार्ट टिप्स
- भारताला जागतिक डेटा सेंटर हब बनवण्यासाठी गोदरेज समूहाचा पुढाकार
- सर्जनशीलतेपासून जागतिक यशापर्यंतचा प्रवास – पंकज सुरेश पाटील
- लोकांच्या जीवनात आनंद निर्माण करणारा The Picnic Man सुनील आव्हाड

