गोदरेज अप्लायन्सेसला विक्रीपश्चात सेवेमध्ये पहिले रेटिंग I
गोदरेज अप्लायन्सेसला विक्रीपश्चात सेवेमध्ये पहिले रेटिंग I
गोदरेज अप्लायन्सेस, या गोदरेज अँड बॉइसच्या बिझनेस युनिटला घरगुती उपकरण क्षेत्रातील एका सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांनी ‘विक्रीपश्चात सेवा’ विभागात पहिल्या क्रमांकाचे रेटिंग दिले आहे. गोदरेज अप्लायन्सेसने सुरू केलेल्या आणि नेलसनआयक्यूद्वारे १२ शहरांत घेण्यात आलेल्या कस्टम स्टडीमध्ये हे रेटिंग देण्यात आले आहे.
या कस्टम स्टडीमध्ये ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्रातल्या ब्रँडतर्फे देण्यात येण्याऱ्या विक्रीपश्चात सेवेबाबत वाटणाऱ्या समाधानाचे विश्लेषण करण्यात आले. गोदरेज अप्लायन्सेसने विक्रीपश्चात सेवेमध्ये सर्वोच्च नेट प्रमोटर स्कोअर, सर्वोच्च रिलेशनशीप स्ट्रेंथ इंडेक्स आणि सर्वाधिक एकंदर समाधान मिळवले आहे. यात सहभागी झालेले सध्या विविध उपकरणे (फ्रीज, वॉशिंग मशिन, मायक्रोवेव ओव्हन, एयर कंडिशनर्स) वापरत असून त्यांनी विक्रीपश्चात सेवेचा लाभ घेतला आहे.
या कामगिरीविषयी गोदरेज अँड बॉयसचा भाग असलेल्या गोदरेज अप्लायन्सेसचे व्यवसाय प्रमुख आणि कार्यकारी उपाध्यक्ष कमल नंदी म्हणाले, ‘गोदरेजमध्ये आम्ही ग्राहक समाधानाला सर्वोच्च पसंती देतो. आमच्या उत्पादनांच्या दर्जाची कठोर चाचणी घेतली जाते आणि आम्ही ग्राहकांना सर्वोत्तम उपकरणे व विक्रीपश्चात सेवा देण्यासाठी बांधील आहोत. ‘पहिल्या क्रमांकाची विक्री पश्चात सेवा’ हे रेटिंग सलग तिसऱ्यांदा आम्हाला मिळाले असून ते ग्राहक समाधान आणि आनंदाचे प्रतीक आहे. आम्ही विक्री पश्चात सेवेत लक्षणीय गुंतवणूक केली असून आमच्या सर्व्हिस एक्सपर्ट्सना सखोल प्रशिक्षण देण्यावर कंपनीचा भर असतो. सेवा बळकट करण्यासाठी आम्ही ऑटोमेशनवरही मोठ्या प्रमाणावर लक्ष केंद्रित करतो.’
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3SHI9y3
शेअर ट्रेडींगची १८ प्रभावी सूत्रे – 18 Rules of Share Trading (Marathi Edition) Kindle Edition – https://amzn.to/3ul6ZvT
18 Effective Rules of Stock Trading Kindle Edition – Click on link to Read Free on Amazon Kindle or buy – https://amzn.to/3HXqUUw – English
- विचार ते अंमलबजावणी: डॉ. अमित बागवे घडवत आहेत महाराष्ट्र उद्योगजगतात क्रांती
- पितांबरीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांना मानद डॉक्टरेट
- महाराष्ट्राचे गेल्या ७५ वर्षांतील देशाच्या अर्थव्यवस्थेमधील योगदान
- सोन्याच्या दागिन्यांपेक्षा नाणी व बिस्किटे – अधिक चांगली गुंतवणूक
- श्री. हर्षल जोशी यांना ‘अंकशास्त्र व वास्तू’ या विषयात मानद डॉक्टरेट बहाल