गोदरेज अँड बॉईसचे त्यांच्या व्यावसायिक विमानचालन व्यवसायामध्ये ३५ टक्के वाढ करण्याचे लक्ष्य I
गोदरेज अॅण्ड बॉईसचे त्यांच्या व्यावसायिक विमानचालन व्यवसायामध्ये ३५ टक्के वाढ करण्याचे लक्ष्य
~ सुधारित पायाभूत सुविधा व शासनाच्या विश्वासासह प्रवासामध्ये झालेल्या वाढीमुळे ऐरोस्पेस कम्पोनण्ट्स व पार्ट्ससाठी मागणी वाढली आहे
~ गोदरेज ऐरोस्पेसचे ३ वर्षांमध्ये तिप्पट विकास करण्याचे लक्ष्य
मुंबई, २२ जुलै २०२२: गोदरेज अॅण्ड बॉईस या गोदरेज ग्रुपच्या आघाडीच्या कंपनीने सांगितले आहे की, त्यांचा व्यवसाय गोदरेज एरोस्पेसने नागरी विमानचालन व्यवसायात ३५ टक्के वाढ करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. ओईएम आणि इंजिन उत्पादकांसह जागतिक प्रमुख कंपन्यांकडून या विभागातील मागणीत ५० टक्के वाढ झाल्यामुळे हे शक्य झाले आहे. देशांतर्गत प्रवास जागतिक स्तरावर पुन्हा सुरळीत सुरू झाल्याने आणि आंतरराष्ट्रीय प्रवास २०२५ पर्यंत कोविड-पूर्व पातळ्यांपर्यंत पोहोचण्याचे नियोजित असल्याने नागरी विमान वाहतुकीची मागणी झपाट्याने वाढत आहे. ट्रॅव्हल ट्रेंडमध्ये वाढ होण्यासोबत एरोस्पेस कम्पोनण्ट्स आणि पार्ट्सच्या वाढत्या मागणीमुळे व्यवसायाचे आर्थिक वर्ष २०२५ पर्यंत तिपटीने वाढ करण्यावर लक्ष केंद्रित आहे.
व्यवसायाने जाहीर केले की, वाढत्या जागतिक उपस्थितीसह तंत्रज्ञानाचा विस्तार या वाढीला चालना देईल. भारतातील उत्सुकतेने पुढाकार घेणारे प्रमुख इंजिन उत्पादक आणि जागतिक ओईएमनी या प्रस्तावित वाढीला चालना दिली आहे. सध्याच्या मागणीची पूर्तता करणा-या गोदरेज एरोस्पेसकडे एक दशकाहून अधिक काळापासून विमान उद्योगात असलेल्या एकात्मिक उत्पादन सुविधेमुळे आणि कंपनीच्या क्षमता व मान्यतांमुळे एक पसंतीचे भागीदार म्हणून पाहिले जाते. गोदरेज ऐरोस्पेस प्रमुख जागतिक भागीदारांसाठी एअरक्राफ्ट अॅप्लीकेशन्ससाठी जटिल एअरवर्थी सिस्टिम्ससोबत क्रिटिकल शीट मेटल ब्रॅकेट्स, जटिल फॅब्रिेकशन्स, हायड्रॉलिक अॅग्रीगेट्स, हेलिकॉप्टर्ससाठी क्रॅश-प्रूफ फ्यूएल टँक्स, स्ट्रक्चरल असेम्ब्लीज आणि इतर अनेक उत्पादनांची निर्मिती व पुरवठा करत आली आहे. व्यवसाय रसायन प्रक्रिया, वेल्डिंग, हिट ट्रीटमेंट अॅण्ड ब्रेझिंग, एनडीटी, कम्पोझिट्स, इलास्टोमर सील्स, मापन व निरीक्षण आणि अपरंपरागत मशिनिंगसाठी एएस९१०० प्रमाणित व एनएडीसीएपी मान्यताकृत आहे. पीएसएलव्ही व जीएसएलव्ही रॉकेटसाठी लिक्विड प्रोपल्शन इंजिन, उपग्रहांसाठी थ्रस्टर्स आणि अँटेना सिस्टीम यांसारख्या जटिल सिस्टिम्स तयार करण्यासाठी गोदरेज एरोस्पेसचा ३० वर्षांहून अधिक काळापासून इस्रोसोबत सहयोग आहे.
गोदरेज ऐरोस्पेसचे एव्हीपी व व्यवसाय प्रमुख मानेक बेहरामकामदिन म्हणाले, ”गंभीर आर्थिक संकटातून बाहेर पडण्याच्या दिशेने काम करत असलेले विमानचालन क्षेत्र आता आत्मविश्वासाचे संकेत देत आहे. जागतिक ओईएम भारतीय उत्पादकांसोबत भागीदारी करण्याचे मार्ग मोकळे करत आहेत. महामारीच्या प्रादुर्भावानंतर होत असलेली आर्थिक रिकव्हरी पाहता आम्ही नागरी विमानचालन क्षेत्रात पुढील तीन वर्षांत तिप्पट वाढीचा अंदाज करत आहोत आणि आम्हाला यामध्ये अधिक सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.”
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo