कॉन्व्हेंट्री विद्यापीठ ग्रुप आणि गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी एण्ज मॅनेजमेंटमध्ये शैक्षणिक करार

भारत – इंग्लंड येथील प्रसिद्ध कॉव्हेंन्ट्री विद्यापीठ ग्रुप आणि गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी एण्ड मॅनेजमेंट (गिटम) यांनी एकमेकांमध्ये शैक्षणिक सहकार्य वाढवण्यासाठी तसेच संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी भागीदारी करारावर स्वाक्षरी केला आहे. या स्वाक्षरी करारामुळे भारत आणि युकेमधील विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील शिक्षणा-या संधी उपलब्ध करुन देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या करारामुळे दोन्ही नामांकित संस्थांमधील संबंध दृढ झाल्याने या संस्थांमध्ये शिकणा-या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या आदानप्रदान करता येणे शक्य होईल. दोन्ही संस्थांसाठी हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

शैक्षणिक कराराच्या माध्यमातून दोन्ही संस्था दुहेरी पीएचडी कार्यक्रम तयार करतील. गिटम आणि कॉव्हेंन्ट्री विद्यापीठातून पीएचडीचे शिक्षण घेणारे विद्यार्थी आपापल्या विषयातील संशोधनाताकरिता एकत्रित काम करतील. हे सर्व विद्यार्थी जागतिक स्तरावरच्या संशोधन कार्याशी जोडले जातील. या डॉक्टरेट विद्यार्थ्यांना दोन्ही संस्थांमधील प्राध्यापकांकडून मार्गदर्शन केले जाईल. शिवाय दोन्ही देशांमधील जागतिक दर्ज्याच्या संशोधन सुविधा, औद्योगिक सहकार्य लाभेल. या विद्यार्थ्यांच्या संशोधनात कोणताही कमतरता राहू नये म्हणून आर्थिक पाठबळही पुरवले जाईल. हा उपक्रम विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर उच्च शिक्षण आणि संशोधनाची संधी उपलब्ध करुन देईल.

आपल्या विद्यार्थ्यांच्या उज्ज्व भविष्यासाठी गिटम या संस्थेने पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित संस्थेशी अशी आगळीवेगळी भागीदारी केली आहे. या भागीदारातीतूनच दुहेरी पीएचडीचा कार्यक्रम आखला आहे. इंग्लंड येथील कॉन्व्हेंट्री विद्यापीठानेही भारतात पहिल्यांदाच दुहेरी पीएचडी पदवी कार्यक्रमासाठी भागीदारी केली आहे. दोन्ही विद्यापीठांमध्ये हा शैक्षणिक करार व्हावा याकरिता गेल्या वर्षभरापासून प्रयत्न सुरु होते. गेले १४ महिने कॉव्हेंन्ट्री विद्यापीठ आणि गिटम संस्थेचे अधिकारी एकमेकांच्या संपर्कात होते. कॉव्हेंन्ट्री विद्यापीठाचे प्रमुख प्रोफेसर कार्ल पेरीन आणि गिटमचे प्र-कुलगुरु आणि प्रोफेसर के.एन.एस. आचार्य यांनी या शैक्षणिक कराराकरिता आवश्यक तपशीलांवर काम केले. तपशीलांमध्ये कोणतीही कमतरता राहू नये म्हणून दोन्ही शिक्षणतज्ज्ञांच्या नेतृत्वाअंतर्गत प्राध्यापकांची टीम तयार करण्यात आली होती. दोन्ही विद्यापीठातील या टीमने आपापल्या संस्थांच्या गरजा आणि क्षमतांचा विचार करुन कोणत्या शैक्षणिक क्षेत्रांमध्ये एकत्रित काम करता येईल, त्याकरिता आवश्यक कार्यपद्धती आदींबाबत चर्चा केली. या टीमच्या अथक परिश्रमांमुळेच या कराराची यशस्वी पायाउभारणी झाली.

या शैक्षणिक करारामुळे ब्रिटन आणि भारतातील विद्यार्थी आणि प्राध्यापक दोघांनाही अनेक बाबतीत फायदा होईल.

० समृद्ध शिक्षणाचा अनुभव – दोन्ही देशांमधील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षणाचा अनुभव घेता येईल. हा अनुभव त्यांच्या शैक्षणिक जीवनात भरभराहट देईल. विद्यार्थी जागतिक स्तरावरील संशोधन प्रकल्पात सहभागी होतील. पदवी अभ्यास पूर्ण केल्यानंतर कॉन्व्हेंट्री विद्यापीठ आणि गिटम संस्थेकडूनही मान्यताप्राप्त पदवी मिळेल.

० व्यापार-उद्योगावर आधारलेले संशोधन करण्याची संधी – या दुहेरी पीएचडी कार्यक्रमात डॉक्टरेट विद्यार्थी केवळ लिखाणावरच अवबंलून नसतील. त्यांच्यातील संशोधक वृत्तीला वाव मिळावा म्हणून व्यापार-उद्योग क्षेत्रातील संशोधन करण्याची दुर्मिळ संधी या पीएचडी कार्यक्रमातून दिली जाईल. जगासमोर आ वासून उभे असलेल्या आव्हानांवर संशोधन करण्यासाठी विद्यार्थ्यांना सर्व आवश्यक स्त्रोत उपलब्ध करुन दिले जातील. जागतिक तापमानवाढ, आरोग्य क्षेत्रातील समस्या, स्वच्छ उर्जा आणि पायाभूत सुविधांमधील कमतरता या विषयांवर विद्यार्थ्यांना सखोल संशोधन करता येईल.

० जागतिक स्तरावरील करिअरच्या संधी – विद्यार्थी या संशोधनादरम्यान विविध संस्कृतीशीही जोडले जातील. व्यापक आणि अफाट संशोधनाचे व्यासपीठ उपलब्ध होत असल्याने त्यांना जागतिक स्तरावरच्या करिअरच्या संधी उपलब्ध होतील.

० प्राध्यापकांचाही विकास – या करारामुळे प्राध्यापकांनाही व्यावसायिक विकासाच्या अनेक संधी उपलब्ध होतील. दोन्ही संस्थांमधील प्राध्यापक एकमेकांच्या संस्थेतील विदयार्थ्यांना मार्गदर्शन करतील, त्यांना शिकवतील. प्राध्यापक एकत्रितपणे संशोधन लेख प्रकाशित करु शकतील. संयुक्तिकपणे आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधन प्रकल्पासाठी निधी मिळवू शकतील. या सहकार्यामुळे दोन्ही संस्थांमधील प्राध्यापकांच्या संशोधन कार्याची गुणवत्ता वाढेल. त्यांच्या व्यावसायिक प्रगतीला चालना मिळेल.

शैक्षणिक वृद्धीसाठी जागतिक करार

कॉव्हेंन्ट्री विद्यापीठाने जागतिक धोरणाची व्यापकता वाढव्यासाठी हा शैक्षणिक करार केला आहे. भारतातील शैक्षणिक संस्थांसोबत करार व्हावे म्हणून कॉन्व्हेंट्री विद्यापीठाने गेल्या वर्षी दिल्ली येथे इंडिया ग्लोबल हब कार्यालयाची स्थापना केली. आफ्रिका, चीन, ब्रुसेल्स आणि सिंगापूरमध्येही कॉन्व्हेंट्री विद्यापीठाने ग्लोबल हब उभारले आहेत. या ग्लोबल हबच्या माध्यमातून विद्यापीठ जगभरातील संस्था, विविध देश तसेच उद्योग-व्यवसायासोबत व्यावसायिक आणि आर्थिक संबंध वृद्धिंगत करत आहेत.

गिटम संस्थेसोबतच्या शैक्षणिक करारा हा सौहार्दपूर्ण राहील, असा विश्वास कॉन्व्हेंट्री विद्यापीठाच्या संशोधन विभागाचे प्र-कुलगुरु आणि प्रोफेसर रिचर्ड डॅशवूड यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, ‘‘ आम्ही विद्यापीठातील विद्यार्थांना जागतिक स्तरावरील संशोधनात वाव मिळावा त्यांना ख-या जगाचा अनुभव मिळावा म्हणून प्रयत्नशील असतो. या हेतूखातर आम्ही गिटम संस्थेसोबत शैक्षणिक करार केला आहे. या करारातून आम्ही सोबतच्या संस्थेसोबतची ज्ञानाची देवाणघेवाण व्हावी म्हणून एकत्रित संशोधनावर भर देत आहोत. यातून दोन्ही संस्थांमधील प्राध्यापक एकमेकांच्या संस्थेला भेट देतील, तेथील विद्यार्थांना मार्गदर्शन करतील. यातून विद्यार्थ्यांमध्ये गतीशीलता तयार होईल. या करारातून विद्यार्थी तसेच संशोधकांना जागतिक समस्यांवर तोडगा काढण्याचे कौशल्य निर्माण करता येतील. हे योगदान संपूर्ण जगासाठी अर्थपूर्ण ठरेल. विद्यार्थ्यांनाही आंतरराष्ट्रीय शैक्षणिक अनुभवाचा लाभ घेता येईल.  ’’

संशोधन आणि नावीन्यतेवर भर देण्याचा मानस –

गिटम या संस्थेने आपल्या शैक्षणिक उपक्रमांमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक कमावला आहे. संस्थेत संशोधनावर आधारित उपक्रमांवर सातत्यता रहावी म्हणून गिटमने आंतरराष्ट्रीय करारात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. कॉन्व्हेंट्री विदयापीठासोबतचा हा करार गिटमसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण या भागीदारीमुळे दोन्ही संस्थाना एकत्रितपणे विविध क्षेत्रांत संशोधन करण्याची संधी मिळेल. कृषी आणि जलस्त्रोतांचा विकास, पाण्याचे व्यवस्थापन आणि शाश्वत विकास, भविष्यकालीन वाहतूक व्यवस्था, मानवी हस्तक्षेपाशिवाय कार्यान्वित प्रणाली विकसित करणे, अभियांत्रिकी आणि आरोग्य क्षेत्राचा विकास या आवश्यक क्षेत्रांसोबतच जीवनावश्यक विज्ञान, व्यवसाय आणि कला तसेच आभासी आणि संमिश्र वास्तवता या क्षेत्रात विद्यार्थ्यांना आपली चुणूक दाखवता येईल.

या कराराबद्दल गिटम संस्थेच्या भूमिकेबद्दल प्रोफेसर के.एन.एस. आचार्य यांनी माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘  सद्यस्थितीत सामाजिक समस्यांवर प्रभावी संशोधन व्हावे हे संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या उद्देशाखातर आम्ही जागतिक भागीदारीत सहभागी होत आहोत. कॉन्व्हेंट्री विद्यापीठासोबतचे हे सहकार्य केवळ प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांची देवाणघेवाण करत विकास साधणे एवढ्यापुरतेच मर्यादित नाही. दोन्ही संस्थांमधील संशोधन क्षमतेचा वापर करुन जागतिक समस्यांवरही तोडगा निघावा हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. या भागीदारीमुळे गिटम संस्थेतील संशोधक आणि प्राध्यापकांना आंतरराष्ट्रीय स्तराचे व्यासपीठ मिळेल. या समन्वयामुळे नवनवीन कल्पनांना चालना मिळेल. परिणामी, समाजात सकारात्मक बदल घडेल.  ’’

स्वाक्षरी करार सभारंभ

६ मार्च रोजी बंगळुरु येथे झालेल्या स्वाक्षरी करार सभारंभात दोन्ही संस्थांचे प्रमुख शैक्षणिक अधिकारी उपस्थित होते.

० डॉ. एरोल डिसूझा, कुलगुरु, गिटम

० प्रोफेसर रिचर्ड डॅशवूड, प्रकुलगुरु (संशोधन), कॉव्हेंट्री विद्यापीठ

० प्रोफेसर गुणसेकरन, कुलसचिव, गिटम

० प्रोफेसर के.एन.एस. आचार्य , प्र-कुलगुरु, गिटम बंगळुरु संकुल

० प्रोफेसर, एलेना गौरा, सहयोगी प्रकुलगुरु (संशोधन) कॉनव्हेंट्री विद्यापीठ

० प्रोफेसर रोहित भगत, केंद्र संचालक, सेंटर फॉर ई-मोबिलिटी एण्ड क्लीन ग्रोथ

० डॉ. मेघा माथुर, आंतरराष्ट्रीय संशोधन आणि नवोपक्रम व्यवस्थापक, कॉन्हेंट्री युनिव्हर्सिटी ग्रुप-इंडिया हब

युके-भारत संबंध दृढ करणे

हा करार एका परिवर्तनात्मक सहकार्याची सुरुवात आहे. या करारामुळे दोन्ही देशांतील विद्यार्थ्यांना जागतिक दर्ज्याचे शिक्षण, अत्याधुनिक संशोधनाच्या संधी उपलब्ध होतील. ख-या अर्थाने जागतिक शैक्षणिक अनुभव मिळेल.

अधिक माहितीसाठी, कॉव्हेंट्री विद्यापीठाच्या इंडिया हबच्या संकेतस्थळाला भेट द्या. गिटमबद्दल अधिक माहितीसाठी  www.GITAM .edu या लिंकवर क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *