एकल महिला संघटना संस्थेचा ‘अर्थसंकेत वूमन एक्सलन्स’ पुरस्काराने सन्मान

‘एकल महिला संघटना’ संस्थेचा ‘अर्थसंकेत वूमन एक्सलन्स’ पुरस्काराने सन्मान

अर्थसंकेत महाराष्ट्र ग्रोथ स्टोरी कॉन्क्लेव्ह कार्यक्रमात ‘एकल महिला संघटना’ संस्थेचा अर्थसंकेत बिझनेस एक्सलन्स पुरस्काराने सन्मान करण्यात आला. Bse Sme चे MD श्री. अजय ठाकूर, NICMAR विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ.सौ. सुषमा कुलकर्णी, अर्थसंकेतचे डॉ अमित बागवे व सौ रचना बागवे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

कोविड काळात ‘एकल महिला संघटना महाराष्ट्र’ने सुरू केलेली ‘स्वावलंबी महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या’. तिचा आत्ता पर्यंतचां प्रवास हा सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे. ‘आत्मभान-आत्मसन्मान-उपजिविका’ या त्रीसुत्रीना घेऊन मैत्रिणींनी आर्थिक सक्षमीकरणाचां हा पायंडा घातला आहे. ६,५०० एकल महिला सभासद असलेली हि पतसंस्था जवळपास ३.५ कोटी रुपयांची उलाढाल करते.

अर्थसंकेत ‘महाराष्ट्र ग्रोथ स्टोरी कॉनक्लेव्ह’

अर्थसंकेत संस्थेतर्फे ‘महाराष्ट्र ग्रोथ स्टोरी कॉनक्लेव्ह’ हा कार्यक्रम, एक राज्य म्हणून महाराष्ट्राच्या प्रगती आणि विकासावर चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आला होता. आय टी आणि उत्पादनापासून ते कृषी आणि पर्यटनापर्यंतच्या उद्योगांच्या दोलायमान मिश्रणासह, महाराष्ट्राने गेल्या काही वर्षांत उल्लेखनीय वाढ दर्शविली आहे. या यशात योगदान देणाऱ्या घटकांवर प्रकाश टाकणे, जसे की सरकारी उपक्रम, पायाभूत सुविधांचा विकास आणि गुंतवणुकीच्या संधी यावर प्रकाश टाकणे हा या परिषदेचा उद्देश होता.

Ekal Mahila
Ekal Mahila

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *