मराठी माणूस जोखीम घेऊन मोठा व्यवसाय करू शकतो – डॉ. अविनाश फडके
मराठी माणूस जोखीम घेऊन मोठा व्यवसाय करू शकतो – डॉ. अविनाश फडके
एजिलस डायग्नोस्टीक्सचे संस्थापक डॉ. अविनाश फडके ‘अर्थसंकेत महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड’ कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मराठी माणूस खूप उत्तमरीत्या व्यवसाय करू शकतो हे त्यांनी उदाहरणासह उपस्थितांना सांगितले. मराठी माणसाने देशावर राज्य केले आहे. युद्ध लढण्याची जोखीम घेतली आहे. मराठी माणूस जोखीम घेऊ शकतो व त्याने उद्योग व्यवसायात जोखीम घेऊन पुढे गेले पाहिजे. लघु व मध्यम उद्योग शेअर बाजारात लिस्ट करून भांडवल उभे करून व्यवसाय मोठे केले पाहिजेत, असे ते म्हणाले.