‘दीपक वर्ल्ड व्हेकेशन’ ठरला ‘मोस्ट पॉप्युलर ब्रँड’

‘दीपक वर्ल्ड व्हेकेशन’ ठरला ‘मोस्ट पॉप्युलर ब्रँड’

‘अर्थसंकेत’ ने आयोजित केलेल्या ‘महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड’ कार्यक्रमात ‘दीपक वर्ल्ड व्हेकेशन’ला प्रतिष्ठित ‘मोस्ट पॉप्युलर ब्रँड’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार श्री. एग्नेलोराजेश अथायडे अध्यक्ष ग्लोबल सेंट अँजेलोस ग्रुप, अर्थसंकेतचे संस्थापक डॉ. अमित बागवे आणि जेष्ठ लेखिका व अभिनेत्री सौ. अलका भुजबळ यांच्या हस्ते देण्यात आला.

ऑफिस बॉय म्हणून सुरुवात करून टूर लीडर पर्यंतचा प्रवास करणाऱ्या करणाऱ्या दीपक यांनी ‘दीपक वर्ल्ड व्हेकेशन’ची स्थापना 2011 साली केली. आज त्यांच्या मुंबई, नवी मुंबई, पुणे, नाशिक, रत्नागिरी, थायलंड, मौरीशस अशा विविध ठिकाणी शाखा आहेत. 2011 पासून कार रेंटलने सुरुवात करून हळूहळू टूर बिझनेसची सुरुवात झाली. ‘दीपक वर्ल्ड वेकेशन’ची खासियत म्हणजे बजेट पासून प्रीमियम पर्यत सर्व पॅकजेस त्यांच्याकडे उपलब्ध आहेत.

हिमाचलला पहिली टूर नेण्यापासून आज देश विदेशात विविध प्रकारच्या टूर्स ते करत आहेत. वर्षाला लाखो पर्यटक ‘दीपक वर्ल्ड वेकेशन’ बरोबर देश विदेशाची सफर करत असतात. डॉ. दीपक पावसकर यांनी स्वतः ६८ देशांची भ्रमंती केली आहे.

विविध पुरस्कारांनी दीपक यांना सन्मानित करण्यात आले आहे. ‘कोकण उद्योगरत्न’, ‘भारत प्रतिभा सन्मान’, ‘अर्थसंकेत नवं उद्योजक पुरस्कार’, ‘बेस्ट ट्रॅव्हल कंपनी – लंडन बुक ऑफ रेकॉर्ड’, ‘सॅटर्डे क्लब भारतीय रत्न सन्मान’, ‘मी उद्योजक होणारचं’, ‘स्वामी विवेकानंद प्रेरणा सन्मान’ व अशा अनेक पुरस्कारांनी त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.

दीपक वर्ल्ड वेकेशन’ संपर्क – ८८२८७२०४३२

Deepak World Vacations most popular brand
Deepak World Vacations most popular brand

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *