रवीना टंडनला तिच्या कौटुंबिक सुट्ट्यांचे सुंदररित्या नियोजन करण्यात क्लब महिंद्राची मदत I
रवीना टंडनला तिच्या कौटुंबिक सुट्ट्यांचे सुंदररित्या नियोजन करण्यात क्लब महिंद्राची मदत!
मुंबई, ६ सप्टेंबर २०२२:महिंद्रा हॉलिडेज अँड रिसॉर्ट्स इंडिया लिमिटेडचा प्रमुख ब्रँड क्लब महिंद्राने ‘मस्त मस्त’ अभिनेत्री रवीना टंडन अभिनीत आपली नवीन डिजिटल मोहीम सुरू केली. ‘वुई कव्हर इंडिया, यू डिसकव्हर इंडिया’ मोहिमेचा विस्तार म्हणून या आठवड्यात फिल्म सादर करण्यात आली. एखादी सहल जर खूप आनंददायी झाली तर त्याचे गुपित एका आईने आपल्या कुटुंबासाठी आणि प्रियजनांसाठी सहलीची योजना आखताना छोट्या छोट्या गोष्टींची घेतलेली काळजी यात असते. या भावनेवर आधारित ही मोहीम आहे. सुट्टीचे मूड डीकोड करण्यापासून खवय्येगिरी जपण्यापर्यंत आमची # फॅमिलीकीसुपरवुमन कौटुंबिक सुट्ट्या मजेशीर असतील हे सुनिश्चित करण्यासाठी चाकोरी बाहेरच्या वेगळ्या मार्गांचा अवलंब करते.
रवीना टंडनसोबतच्या या मोहिमेबद्दल आपले विचार मांडताना महिंद्रा हॉलिडेज अँड रिसॉर्ट्स इंडिया लिमिटेडचे मुख्य विपणन अधिकारी प्रतीक मझुमदार म्हणतात, “क्लब महिंद्रा आमच्या सदस्य कुटुंबांना २५ वर्षांहून अधिक काळ संपूर्ण भारतभर सुट्टीचा खूप छान अनुभव देत आहे. यावर्षी, आम्हाला कुटुंबाला आणि त्यांच्या गरजांना समजून घेणाऱ्या “घरातली आई” पेक्षाही जास्त काळजी घेणाऱ्या कौटुंबिक ब्रँडचा हळुवार आणि भावनिक पैलू ठळकपणे सादर करण्याची इच्छा होती. सुट्टीचे ठिकाण ठरविण्याचा निर्णय घेताना कुटुंबातील सदस्यांच्या विविध गरजा संतुलित करण्यासाठी चाकोरी मोडणारी आई सुट्टीतील प्रत्येक गोष्ट आनंददायी बनवते. या मोहिमेद्वारे आम्हाला आपली # फॅमिलीकीसुपरवुमन स्वतःच्या कुटुंब आणि जीवलगांसाठी सहलीची योजना आखताना करत असलेल्या छोट्या छोट्या गोष्टींना दाद द्यायची आहे.”
रवीना टंडनची “क्लब महिंद्रा मेंबरशिप” तिच्या कुटुंबाच्या वेगवेगळ्या सुट्टीच्या गरजा कशा पूर्ण करते याचे दर्शन या फिल्म मधून होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे क्लब महिंद्राच्या १०० हून अधिक रिसॉर्ट्समधून आणि अद्वितीय वेगळा अनुभव देणारी अनपेक्षित स्थळे एक्सप्लोर करणे, नव्या वाटा शोधणे, तसेच साहसी उपक्रम, नुसतं घरात आत बसून शांतता आणि आराम करणे किंवा रिसॉर्टमध्ये फक्त स्वादिष्ट जेवणाचा आनंद घेणे यासारख्या गोष्टींचे सामर्थ्य किती आहे हे कळते.”
त्यामुळे ‘प्रत्येक क्षण जादुई बनवा’ कारण सर्व मॉम्स आणि क्लब महिंद्रा यांना सुट्टीचा सर्वोत्तम मार्ग माहित आहे!
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- ‘खवणे कयाक्स’ ठरला ‘मोस्ट पॉप्युलर ब्रँड’
- ‘ईशा टूर्स’ ठरला ‘मोस्ट इनोव्हेटिव्ह ब्रँड’
- मराठी माणूस जोखीम घेऊन मोठा व्यवसाय करू शकतो – डॉ. अविनाश फडके
- राजगुरू टूर्सचा ‘बेस्ट कस्टमर सर्व्हिस ब्रँड’ पुरस्काराने सन्मान
- उद्योग व्यवसायात येण्यासाठी मराठी माणसांची मानसिकता बदलणे गरजेचे