क्लब महिंद्राची व्हिएतनाम आणि इंडोनेशियामधील उत्कृष्ट रिसॉर्ट्सशी भागीदारी I
क्लब महिंद्राची व्हिएतनाम आणि इंडोनेशियामधील उत्कृष्ट रिसॉर्ट्सशी भागीदारी
क्लब महिंद्राने आग्नेय आशियातील स्थान केले अधिक बळकट
~ सदस्यांनारूमऑफरकरण्यासाठीव्हिएतनामआणिइंडोनेशियामधीलउत्कृष्टरिसॉर्ट्सशीकेलीभागीदारी ~
मुंबई, ९जानेवारी२०२४ : क्लब महिंद्रा हा महिंद्रा हॉलिडेज अँड रिसॉर्ट्स इंडिया लिमिटेडचा (MHRIL) प्रमुख ब्रँड असून, या ब्रँडने व्हिएतनाम आणि इंडोनेशियामधील रिसॉर्ट्ससह भागीदारी करून आपल्या सदस्यांना रुम्स ऑफर करत आग्नेय आशियामध्ये आपले स्थान आणखी बळकट केले आहे. या भागीदारीमुळे सदस्यांना व्हिएतनाममधील Citadines Pearl Hoi An आणि Citadines Bayfront यादोन उत्कृष्ट रिसॉर्ट्समध्ये तसेच बालीच्या AyodyaResort मध्ये राहता येईल. सदस्यांना सुट्टीचे अविस्मरणीय आनंद देण्यासाठी क्लब महिंद्रा वचनबद्ध आहे. आग्नेय आशियातील अतुलनीय अनुभव घेऊ इच्छिणार्या प्रवाशांसाठी हे धोरणात्मक पाऊल आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये, समूहाने कंबोडिया, इंडोनेशिया, मलेशिया, सिंगापूर, थायलंड आणि व्हिएतनामसह दक्षिणपूर्व आशियातील रिसॉर्ट्सचा यशस्वीपणे विस्तार केला आहे. या नवीन भागीदारीसह, क्लब महिंद्रा आता आग्नेय आशियातील १२+ रिसॉर्ट्स आणि एकूणच आंतरराष्ट्रीय स्तरावर ६०+ ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देत आहे.

Citadines Pearl Hoi An हे विलोभनीय अॅन बँग बीचवर वसलेले आहे. येथील वातावरण आल्हाददायक आहे. शास्त्रीय वास्तुकला समकालीन सुखसोयींसह येथे अखंडपणे मिळतात. यूनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या होई एन एन्शियंट टाउनपासून फक्त १० मिनिटांच्या अंतरावर असून, पर्यटकांना बोट टूर, रात्रीचा फेरफटका, ट्रॅक्यू व्हिलेज एक्सप्लोरेशन आणि आनंददायक वॉटर स्पोर्ट्स यांचा आनंद लुटता येतो. उत्कृष्ट सुविधांनी सुशोभित असेले हे रिसॉर्ट, एक विस्तीर्ण मैदानी जलतरण तलाव, समुद्रकिनार्यावरील खेळ आणि टेनिस कोर्टने सज्ज आहे. १३ जानेवारी २०२४ पासून सदस्य चेक-इनसाठी वेब आणि अॅपद्वारे रिसॉर्ट बुक करू शकतात.

Citadines Bayfront मध्येव्हिएतनामचा अस्सल आनंद घेता येतो. येथील मॅन्यू स्पा आणि एन्गॉन गॅलरी सीफूड बफेटमधील सीफूड एक वेगळाच आनंद देतात. कॅम रान्ह आंतरराष्ट्रीय विमानतळापासून ३५ किमी अंतरावर हे ठिकाण आहे. हा रिसॉर्ट लाँग सोन पॅगोडाच्या शांततेने आणि विनपर्ल अॅम्युझमेंट पार्कच्या उत्साहाने वेढलेल्या किनारपट्टीपासून ४० मिनिटांवर आहे. पर्यटक सदस्य १४ जानेवारी २०२४ पासून चेक-इनसाठी Citadines Pearl Hoi An साठी Web आणि App च्या माध्यमातून बुकिंग करू शकतात.

बालीमधील Ayodya Resort हा बालीनीज वॉटर पॅलेस-प्रेरित ठिकाण आहे. हे रेसॉर्ट २९ एकरमध्ये पसरलेले आहे. लँडस्केप गार्डन्स आणि अतुलनीय बीचचा अनुभव येथे येणाऱ्यांना मोहित करते. हे रिसॉर्ट उलुवातु मंदिर आणि गरुड विष्णू केनकाना (GWK – Garuda Wisnu Kencana ) सांस्कृतिक उद्यानाजवळ आहे. त्यामुळे येथे येणाऱ्यांना सांस्कृतिक अनुभूती आणि मोकळा श्वास घेण्याचा आनंद मिळतो. १३ जानेवारी २०२४ पासून चेक-इनसाठी बुकिंग वेब आणि अॅपवर खुली आहे.

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- ‘खवणे कयाक्स’ ठरला ‘मोस्ट पॉप्युलर ब्रँड’
- ‘ईशा टूर्स’ ठरला ‘मोस्ट इनोव्हेटिव्ह ब्रँड’
- मराठी माणूस जोखीम घेऊन मोठा व्यवसाय करू शकतो – डॉ. अविनाश फडके
- राजगुरू टूर्सचा ‘बेस्ट कस्टमर सर्व्हिस ब्रँड’ पुरस्काराने सन्मान
- उद्योग व्यवसायात येण्यासाठी मराठी माणसांची मानसिकता बदलणे गरजेचे