बर्गर किंग इंडियाचे भारतीय चवीचा तडका असलेले व्हॉपर I
बर्गर किंग इंडियाचे भारतीय चवीचा तडका असलेले व्हॉपर I
सांस्कृतिक वैविध्यता, भाषा आणि सर्वांत उल्लेखनीय म्हणजे खाद्यसंस्कृतीसाठी असलेली पारंपरिक आवड यासाठी भारताची चांगली ओळख आहे. त्यामुळे लोकांमध्ये पाककलेचे भंडार आहे. चवीसाठी आणि चमचमीतपणाबद्दल असलेले प्रेम लक्षात घेऊन बर्गर किंग यां भारतातील सर्वांत वेगाने वाढणाऱ्या क्विक सर्विस रेस्टॉरंट ब्रँडने नवे टीव्हीसी कॅम्पेन सुरू केले आहे. भारतीयांना आवडेल अशा प्रकारचे व्हॉपर तयार करून ते सर्वापर्यंत जाहिरातीतून पोहोचवले जाणार आहे. व्हॉपर : स्वाद ऐसा, इंडिया जैसा असे हे कॅम्पेन आहे.
बर्गर किंगने देशातील विविध भागांसाठी व्हॉपरच्या विविध प्रकारचे कॅम्पेन तयार केले आहे. या फिल्ममध्ये एक प्रमुख पात्र असे दाखवण्यात आले आहे की ज्याचे इतरांसारखेच म्हणणे असते की पश्चिमी क्यूएसआर ब्रँडला भारतीय स्वादचा अर्थच कळत नाही आणि त्यामुळे त्यांच्या पदार्थांमध्ये एक प्रकारचा गोडवा असतो. या टीव्हीसीच्या सुरुवातीला फिल्मच्या नायकाला व्हॉपरच्या टेस्टबद्दल शंका असते आणि आणि अखेर तो सगळे आणि त्यातून चवीबद्दलची प्रतिक्रिया दाखवण्यात आली आहे.
भारतातील सांस्कृतिक वैविधतेमुळे ही टीव्हीसी हिंदी, गुजराती, कन्नडा, मराठी, बंगाली आणि तेलगू अशा विविध भाषांमध्ये प्रसारित करण्यात येणार आहे. टीव्हीवरील जाहिरातींसह हे कॅम्पेन डिजिटल प्लॅटफॉर्म, सोशल मीडिया, डिजिटल इन्फ्ल्यूएंन्सर्स, आउट ऑफ होम अॅडव्हर्टायझिंग आणि रेस्टॉरंटमध्ये दाखवण्यात येणार आहे.
या कॅम्पेनसह बर्गर किंग व्हॉपर रेंजमध्ये ग्लेझ असलेले प्रिमीयम बन्सही वापरण्यात येणार आहे. सतत काहीतरी सुधारणा करण्याच्या कंपनीच्या धोरणाचा भाग म्हणून देण्यात येत असलेले ग्लेझ असलेले प्रिमीयम बन्सही केवळ चवीत सुधारणा करणार नाही तर ते आणखी फ्रेशही दिसणार आहे. अधिकाधिक चाहत्यांना या व्हॉपरचा आनंद लुटता यावा यासाठी काही काळासाठी एक ऑफरही आणली आहे. एक्स्ट्रॉ क्रंची व्हेज व्हॉपर १७९ रुपयांऐवजी १२९ रुपयांना मिळणार आहे आणि फ्लेम ग्रिलड चिकन व्हॉपर १९९ रुपयांऐवजी १४९ रुपयांना देण्यात येत आहे. ही ऑफर डाईन ईन/टेकअवेसाठी आहे.
या कॅम्पेनबद्दल मुख्य विपणन अधिकारी कपिल ग्रोव्हर म्हणाले की, भारतात दिले जाणारे हे व्हॉपर वेगळे आहे आणि जगात असे व्हॉपर कुठेही मिळते नाही. त्यात भारतीय चवीचा तडका देण्यात आला आहे. आमचे नवीन कॅम्पेन, व्हॉपर – स्वाद ऐसा, इंडिया जैसा हे विविध रिजननुसार तयार करण्यात आले असून त्यातून आलेल्या ग्राहकांना त्यांच्या अपेक्षेनुसार चवीष्ट पदार्थ देण्याची आमची कटिबद्धता स्पष्टपणे दिसून येते. ग्लेझ असलेले प्रीमियम बन्स लाँच करण्यात आले असून त्यामुळे आमच्या पाहुण्यांना व्हॉपरचा उत्तम आनंद घेता येणार आहे. याशिवाय यासाठी नवीन ऑफर देण्यात येत आहे. व्हेज आणि नॉनव्हेज व्हॉपर ग्राहकांनी खाऊन पाहावे यासाठी ही ऑफर देण्यात येत आहे.
ब्लॅक पेन्सिचे क्रेएटिव्ह हेड प्रविण सुतार म्हणाले की, आपल्याला सर्वांना एक गोष्ट माहितेय की, चविने खाण्यासाठी भारतीयांची ओळख आहे. त्यांना केवळ चांगली चवच नको तर त्यांना परफेक्ट मॅचही हवे आहे. देसी मसाला त्यांना प्रचंड आवडतो. त्या मसाल्याची चव प्रत्येक घासात योग्य प्रमाणात यावी अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. हेच बर्गर किंगच्या व्हॉपरमधून दिले जाणार आहे. आमच्या फिल्ममध्ये प्रत्येक भारतीयाची चवींबद्दल असलेली अपेक्षाच दाखवण्यात आली आहे आणि बर्गर किंगचे व्हॉपर भारतीय पद्धतीने या अपेक्षा कशा पूर्ण करते, हेही यातून दिसून येते. यात वापरलेले संगीत हे केवळ जाहिरातीचा घटक नाही तर त्यामुळे प्रत्येक भागातील संगीताचा वापर करण्यात आला आहे आणि त्यामुळे व्हॉपरला त्यांचे देसी फ्लेवर मिळणार आहे. व्हाईब, ट्रिटमेंड, स्वाद हे सगळेच भारतीयांसाठी भारतीयांप्रमाणेच आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- वुमन ऑफ इम्पॅक्ट – प्रभावशाली महिलांचा सन्मान
- Grand Success of Sydenham’s Management Conclave 2024
- गोदरेज अँड बॉयसचे मुंबईच्या भूमिगत मेट्रोमध्ये योगदान
- Sydenham College Management Conclave ’24
- आजचे मार्केट अपडेट – 23 ऑगस्ट 2024 – सेन्सेक्स 33 अंकांनी वाढला आणि 81,086 वर बंद झाला: निफ्टी देखील 11 अंकांनी वाढला|Share market news in marathi