बास्किन रॉबिन्सने क्विक कॉमर्स व स्नॅकिंग ट्रेंडसाठी रिटेल विस्तार केला

भारतातील सर्वात प्रिय आईस्क्रीम ब्रँड बास्किन रॉबिन्स किरकोळ उत्पादनाच्या नवीन लाँचसह मजेची पुनर्परिभाषा करण्यास सज्ज आहे. वेगवान व्यापार ग्राहकांच्या सवयी घडवत असतात. स्नॅकिंग हा आता दिवसभराचा व्यवसाय बनतो आहे. असे असताना, ही वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी प्रमुख शहरांमध्ये स्नॅकिंग पोर्टफोलिओमध्ये ब्रँड धोरणात्मकरित्या विस्तार करत आहे.

जनरल ट्रेड स्टोअर्स, सुपरमार्केट आणि क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्मवर लक्ष केंद्रित करून नव्याने लाँच केलेल्या किरकोळ रेंजमध्ये स्नॅकिंग तसेच घरी चवीने खाण्यासाठी डिझाइन केलेले विविध फॉरमॅट्स आणि फ्लेवर्स आहेत. या कलेक्शनमध्ये चॉकलेटला प्राधान्य आहे. फळांच्या आधारे तयार करण्यात आलेले खास उन्हाळी फ्लेवर्स, देशातील विविध चवींनुसार तयार केलेले पारंपरिक भारतीय फ्लेवर्स आणि बेल्जियन चॉकलेट मिल्कशेक यांचा समावेश आहे. काही उत्कृष्ट ऑफरिंगमध्ये चॉकलेट कन्फेक्शनरी स्वर्ल आणि मिल्क चॉकलेट-चिप्ससह सुपर स्ट्रॉबेरी सरप्राईज कोन, सगळ्यांच्या आवडत्या चॉकलेटच्या अनुभवासाठी ओरिजिनल ट्रिपल चॉकलेट स्टिक, रिफ्रेशिंग व्हेरी ब्लूबेरी आइस पॉप, इराणी पिस्त्यांनी भरलेली पारंपरिक मलाई कुल्फी स्लाइस आणि पहिल्यांदाच – “मिनिज” मध्ये मिसिसिपी मड आणि बदाम अँड कॅरमेल फ्लेवर्सच्या 4 मिनी आइस्क्रीम स्टिक्सचा पॅक समाविष्ट आहे. याव्यतिरिक्त, या रेंजमध्ये क्रिमी बेल्जियन चॉकलेट मिल्कशेक तीन प्रकारे मिळतो, मिल्क, डार्क आणि हेझलनट – सर्व 30% कमी साखरेसह आणि कोणतेही रंग किंवा फ्लेवर्स जोडलेले नाहीत.

या विस्ताराबद्दल बोलताना, ग्रॅव्हिस फूड्स लिमिटेडचे सीईओ मोहित खट्टर यांनी ब्रँडच्या किरकोळ विक्री वाढीबद्दल सांगितले, “ग्राहक ज्या पद्धतीने आईस्क्रीमचा आनंद घेतात, त्यात सातत्याने बदल होतो आहे. आणि आमची नवीन किरकोळ विक्री श्रेणी याच बदलाचे प्रतिबिंब आहे. जेवणानंतर खाण्याचा पदार्थ ही आईस्क्रीमची असलेली ओळख बदलण्यासाठी गेल्या वर्षी आम्ही कधीही खाता येईल असा पदार्थ म्हणून स्थान देण्याच्या उद्देशाने नावीन्यपूर्ण उत्पादने  सादर केली. तर यंदा देखील वेगळा दृष्टिकोन स्वीकारत जलद व्यापारात वाढ आणि घरच्या घरीच प्रीमियम पदार्थांच्या वाढत्या मागणीसह, आम्ही आमच्या रिटेल उपस्थितीचा विस्तार करत आहोत. बास्किन रॉबिन्सचा हा अनुभव ग्राहकांना अधिक चांगल्या पद्धतीने उपलब्ध होईल, याची खात्री करणे हे आमचे ध्येय आहे, ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या आवडत्या चवींचा आनंद घेणे कधीही आणि कुठेही सोपे होईल.”

आर्थिक वर्ष 25 मध्ये जलद व्यापारासह सर्व रिटेल चॅनेलमध्ये प्रभावी वाढ आणि आर्थिक वर्ष 26 मध्ये अशाच प्रकारच्या वाढीच्या अपेक्षेसह, बास्किन रॉबिन्स सामान्य व्यापार, आधुनिक व्यापार तसेच आघाडीच्या जलद व्यापार प्लॅटफॉर्मसह भागीदारी वाढवत आहे, जेणेकरून भारतातील ग्राहकांसाठी त्यांच्या खास भेटवस्तू फक्त एका क्लिकच्या अंतरावर असतील याची खात्री केली जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *