बंधन बँकेला रु. १९०२/- कोटींचा नफा I Bandhan Bank profit of Rs. 1902/- Crore I
बंधन बँकेला रु. १९०२/- कोटींचा नफा
बंधन बँकेला चौथ्या तिमाहीत रु. १९०२/- कोटींचा निव्वळ नफा
खाजगी क्षेत्रातील बंधन बँकेने दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०२२ अखेर तिमाहीत निव्वळ नफ्यात मोठी वाढ झाली असून हि रक्कम रु. १९०२.३०/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत बँकेला रु. १०३/- कोटींचा निव्वळ नफा झाला होता. एकूण उत्पन्न ४३% ने वाढले असून हि रक्कम रु. ३५०४.२/- कोटी आहे. मार्च २०२१ अखेर तिमाहीत हि रक्कम रु. २४५७.४/- कोटी होती. निव्वळ व्याज उत्पन्न ४५% ने वाढले असून रु. २५३९.८/- कोटी आहे. इतर उत्पन्न ३८% ने वाढले असून हि रक्कम रु. ९६४.४/- कोटी आहे. तरतुदीत मोठी घट झाली असून हि रक्कम रु. ४.७/- कोटी आहे, मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १५०७.७०/- कोटी होती.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo