कन्याकुमारी ते लेह दरम्यान ‘मंजिल का सफर’ या स्टॅलिन ड्राइव्हची सुरुवात I
अशोक लेलँडतर्फे ७५ वा वर्धापनदिन साजरा करण्यासाठी कन्याकुमारी ते लेह दरम्यान ‘मंजिल का सफर’ या स्टॅलिन ड्राइव्हची सुरुवात
चेन्नई, २६ जुलै २०२३ – अशोक लेलँड ही हिंदुजा समूहाच्या प्रमुख कंपनी आणि देशातील आघाडीची व्यावसायिक वाहन उत्पादक असून कंपनीने आज कन्याकुमारी ते लेह अशा ‘मंजिल का सफर’ स्टॅलिन ड्राइव्हची सुरुवात केली. कारगिल विजय दिनानिमित्त सुरू झालेली ही सफर कंपनीच्या ७५ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आली आहे.
‘मंजिल का सफर’ ही मोहीम अशोक लेलँडच्या प्रसिद्ध स्टॅलिन श्रेणीतली वाहने आणि भारतीय सैन्य दलाच्या सहकार्याने भारतातील दक्षिणेचे टोक – कन्याकुमारीपासून सुरू करण्यात आली. ही मोहीम वैविध्यपूर्ण प्रदेश, आव्हानात्मक डोंगराळ भाग, थक्क करणारे लँडस्केप्स इथून पुढे जात लेहच्या प्रदेशात समाप्त होईल. या मोहिमेत ४००० किलोमीटर्सचे अंतर पार करत अशोर लेलँड वाहनांची ओळख असलेली त्यांची ताकद, विश्वासार्हता आणि खंबीरता यांचे दर्शन घडवले जाणार आहे.
अशोक लेलँडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. शेनू अगरवाल म्हणाले, ‘७५ वा वर्धापनदिन साजरा करण्यासाठी आणि भारतीय सैन्यदलासह प्रदीर्घ नात्याच्या सन्मानार्थ आम्ही या मोहिमेचं आयोजन केलं आहे. कन्याकुमारी ते लेह हा प्रवास भारतीय सैन्यदलाप्रती आमच्या बांधिलकीचं दर्शन घडवणारा आहे. या सहकार्याचा आम्हाला अभिमान वाटतो आणि यापुढेही आम्ही रूढी तोडण्यासाठी, आव्हानांवर मात करण्यासाठी आणि विश्वासार्ह भागीदार बनण्यासाठी प्रयत्न करत राहू.’
अशोक लेलँडच्या इंटरनॅशनल ऑपरेशन्स, डिफेन्स आणि पॉवर सोल्यूशन्स विभागाचे अध्यक्ष एलसीव्ही श्री. अमनदीप सिंग म्हणाले, ‘कन्याकुमारी ते लेह हा प्रवास चिकाटी, ताकद आणि वचनबद्धतेचे प्रतीक आहे. अशोक लेलँड ‘मंजिल का सफर’ या स्टॅलिन ड्राइव्हची सुरुवात करत ७५ वर्षांचा आमचा प्रवास आणि भारतीय सैन्यदलाबरोबरचे दीर्घकालीन नाते आम्ही साजरे करत आहोत. ही मोहीम आम्ही आजवर केलेली प्रगती आणि राष्ट्र उभारणीसाठीची आमची बांधिलकी यांचे प्रतिबिंब आहे. ही मोहीम आमच्या एकत्रित वारसाचे प्रतीक असून दरम्यानचा रस्ता आमचा आजवरचा प्रवास आणि आम्हाला पुढे घेऊन जाणारी एकी दर्शवणारा आहे. ही सफर भारतीय सैन्य दलाप्रती आमच्या निष्ठेचे मानचिन्ह म्हणून प्रस्थापित होईल.’
आजपर्यंत अशोक लेलँडने भारतीय सैन्यदलाच्या वाहनविषयक गरजा पूर्ण करत त्यांना सर्व प्रकारच्या मोहिमांसाठी विश्वासार्ह वाहने पुरवली आहेत. संरक्षण क्षेत्राप्रती आमची अविरत बांधिलकी सैन्य दलाच्या खास गरजांप्रमाणे तयार केलेल्या खास वाहनांतून दिसून आली आहे.
अशोक लेलँड आणि भारतीय सैन्य दलाचे नाते खोलवर रूजलेले आणि एकमेकांप्रती समर्पित आहे. ही भागिदारी सैन्य दलाच्या वाहनविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी अशोक लेलँडने दर्शवलेल्या निष्ठेवर आधारित असून देशाच्या संरक्षण विभागाला आवश्यक सेवा देण्यासाठी आम्ही तत्पर आहोत.
या मोहिमेदरम्यान अशोक लेलँड सैन्यदलातील वरिष्ठ अधिकारी, वाहनप्रेमी, सर्वसामान्य जनता आणि इतर भागधारकांशी संवाद साधत त्यांच्याशी चिकाटी, नाविन्य आणि भारतीय सैन्यदलाशी असलेल्या यशस्वी भागिदारीचे किस्से शेयर करणार आहे.
ही मोहीम अविस्मरणीय आणि अशोक लेलँडचे स्पिरीट दाखवणारी असेल.
तीन स्टॅलिन ट्रक्स भारतीय सैन्य दलाने जिंकलेल्या तीन भूभागांचे – जंगले, वाळवंट आणि डोंगर यांचे प्रतिनिधीत्व करत ही सफर पूर्ण करतील. पहिला ट्रक अशोक लेलँड आणि भारतीय सैन्य दलाच्या आजपर्यंतचे नाते दर्शवणारा असेल, तर दुसरा ट्रक कारगीलच्या सैनिकांचे प्रतिनिधीत्व करणारा आणि तिसरा ट्रक सैन्यदलाच्या धाडसी वृत्तीला सलाम करणारा, त्यांच्या अतुलनीय शौर्याला वंदन करणारा असेल.
हे स्टॅलिन भारतीय सैन्य दलाच्या लॉजिस्टिक सुविधांचा कणा असून आतापर्यंत ७५,००० स्टॅलिन्स भारतीय सैन्यदलातर्फे वापरण्यात आले आहेत. १९९९ च्या कारगील युद्धात स्टॅलिन्सनी सैन्याच्या तुकड्यांना सुखरूपपणे फ्रंटलाइनपर्यंत पोहोचवत अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याशिवाय फ्रंटलाइनला खाद्यपदार्थ व शस्त्रास्त्रांचा पुरवठा करण्याची महत्त्वाची कामगिरी स्टॅलिन्सनी केली होती.
मंजिल का सफरची माहिती मिळवण्यासाठी अशोक लेलँडचे सोशल मीडिया हँडल्स जॉइन करा किंवा कंपनीच्या संकेतस्थळाला भेट द्या : www.ashokleyland.com.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- वुमन ऑफ इम्पॅक्ट – प्रभावशाली महिलांचा सन्मान
- Grand Success of Sydenham’s Management Conclave 2024
- गोदरेज अँड बॉयसचे मुंबईच्या भूमिगत मेट्रोमध्ये योगदान
- Sydenham College Management Conclave ’24
- आजचे मार्केट अपडेट – 23 ऑगस्ट 2024 – सेन्सेक्स 33 अंकांनी वाढला आणि 81,086 वर बंद झाला: निफ्टी देखील 11 अंकांनी वाढला|Share market news in marathi