राष्ट्र उभारणीत महाराष्ट्र थीमवर पुण्यातील निकमार विद्यापीठात उद्योजकांचा भव्यदिव्य कार्यक्रम संपन्न
राष्ट्र उभारणीत महाराष्ट्र थीमवर पुण्यातील निकमार विद्यापीठात उद्योजकांचा भव्यदिव्य कार्यक्रम संपन्न
महाराष्ट्रातील सामाजिक समरसतेमुळेच महाराष्ट्राची प्रगती – श्री प्रदीप लोखंडे
देशाच्या प्रगतीमध्ये पायाभूत सुविधांची प्रमुख भूमिका – श्री एग्नेलोराजेश अथायडे
महाराष्ट्र ग्रोथ स्टोरी कॉन्क्लेव्ह हा एक राज्य म्हणून महाराष्ट्राच्या प्रगती आणि विकासावर चर्चा करण्यासाठी अर्थसंकेतने निकमार विद्यापीठाच्या सहयोगाने उद्योजकीय कार्यक्रम आयोजित केला होता.
बांधकाम, पायाभूत सुविधा, आयटी आणि उत्पादन ते कृषी आणि पर्यटन यासारख्या उद्योगांच्या दोलायमान मिश्रणासह, महाराष्ट्राने गेल्या काही वर्षांत उल्लेखनीय वाढ दर्शविली आहे. या यशात योगदान देणारे घटक जसे की सरकारी उपक्रम, पायाभूत सुविधांचा विकास आणि गुंतवणुकीच्या संधी, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी शेअर बाजारातून भांडवल उभारणे हे या परिषदेचे उद्दिष्ट होते. पुढील सहयोग आणि भविष्यातील वाढीच्या पुढाकारांसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देत भारताच्या अर्थव्यवस्थेतील एक पॉवरहाऊस बनण्याच्या दिशेने महाराष्ट्राचा प्रवास हा कॉन्क्लेव्ह साजरा करत आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून निकमार विद्यापीठाचे अध्यक्ष व कुलपती डॉ. अनिल कश्यप, डॉ. श्रीमती सुषमा कुलकर्णी – कुलगुरू निकमार विद्यापीठ, वास्तू रविराजचे डॉ. रविराज अहिरराव, श्री एग्नेलोराजेश अथायडे – अध्यक्ष ग्लोबल सेंट अँजेलो ग्रुप ऑफ कंपनीज, खांडवाला मर्चंट बँकरचे श्री. रिनव मानसेटा, डॉ. अमित बागवे – संस्थापक अर्थसंकेत, श्रीमती रचना बागवे – सहसंस्थापक अर्थसंकेत, राष्ट्रसंचारचे श्री अनिरुद्ध बडवे आणि रुरल रिलेशन्सचे श्री प्रदीप लोखंडे उपस्थित होते.
अर्थसंकेतचे संस्थपाक डॉ अमित बागवे यांनी राष्ट्राच्या उभारणीत महाराष्ट्राचा वाटा या विषयवार विवेचन केले. तसेच निकमार विद्यापीठाच्या कार्याचा गौरव केला.
निकमार विद्यापीठाचे अध्यक्ष व कुलपती डॉ. अनिल कश्यप यांनी उपस्थितांचे स्वागत केले व महाराष्ट्राच्या व भारताच्या प्रगतीत निकमार विद्यापीठ मोलाचा वाट नक्कीच उचलेल अशी आशा व्यक्त केली.
जगभरात जेव्हढे प्रगत देश आहेत, त्यांच्या प्रगतीमध्ये पायाभूत सुविधांचा मोठा वाटा आहे. पुढील काही वर्षांमध्ये भारतामधील पायाभूत सुविधा प्रचंड मोठ्या प्रमाणात सुधारतील व भारत सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रगती करेल असे मत श्री एग्नेलोराजेश अथायडे यांनी मांडले.
उद्योग व्यवसाय करताना भांडवल हा खूप महत्त्वाचा विषय असतो. खांडवाला सिक्युरिटीज लिमिटेडचे श्री रीनव मनसेटा यांनी लघु व मध्यम उद्योजकांना शेअर मार्केटमधून भांडवल कसे उभे करावे व त्यासाठी लागणारी माहिती दिली. शेअर बाजारात नोंदणीकृत लघु व मध्यम उद्योजकांचे बाजार भांडवल ९०,००० कोटी रुपये पार झाल्याची माहिती त्यांनी दिली.
वैयक्तिक तसेच उद्योजकीय प्रगतीत वास्तुशास्त्राचा उपयोग या विषयावर वास्तू रविराजचे डॉ. रविराज अहिरराव यांनी मार्गदर्शन केले.
पितांबरी एग्रो टुरिझमचे श्री. अजय महाजन यांनी पितांबरीच्या दापोली व राजापूर येथील पर्यटन उद्योगाबद्दल माहिती दिली.
निकमार विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. सुषमा कुलकर्णी यांनी निकमारच्या कार्याचा आढावा घेतला तसेच उद्योजकीय यशोगाथा उपस्थितांसमोर मांडल्या.

राष्ट्रसंचारचे श्री अनिरुद्ध बडवे यांनी वारकरी संप्रदाय हा जगाचं तत्वज्ञान सांगणारा संप्रदाय आहे असे मत मांडले व असे उद्योजकीय कार्यक्रम महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात व्हावे अशी सदिच्छा व्यक्त केली.
महाराष्ट्राच्या प्रगतीत सहकार चळवळीचा व महाराष्ट्रातील कुशल मनुष्यबळाचा मोठा वाटा आहे तसेच महाराष्ट्रातील सामाजिक समरसतेमुळेच महाराष्ट्राची प्रगती झाली आहे असे मत रूरल रिलेशन्सचे श्री प्रदीप लोखंडे यांनी मांडले.
अर्थसंकेतच्या सह संस्थापक सौ रचना लचके बागवे यांनी सर्वांचे आभार मांडले.
अर्थसंकेत महाराष्ट्र बिझनेझ अचिव्हर्स पुरस्काराने सौ. सोनाली गंद्रे, श्री. सुरेश भागडे, श्री. धवल शेठ, नीता पाताडे, डॉ आशा जयकर, श्री वैभव मोदी, सौ. दीपा कुलकर्णी, श्री. राहुल गोळे व सौ शीतल जोशी यांचा सत्कार करण्यात आला.
बुधवारी ११ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी २.०० ते संध्याकाळी ५.०० दरम्यान निकमार विद्यापीठ सभागृह, बालेवाडी, पुणे येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला ५०० हुन अधिक उद्योजक व विद्यार्थांनी हजेरी लावली होती.
महाराष्ट्र ग्रोथ स्टोरी कॉनक्लेव्ह हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये होणार असून अधिक माहितीसाठी संपर्क -8082349822
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- ‘शिवांजली हॉलिडे होम’ ठरला ‘बेस्ट कस्टमर सर्व्हिस ब्रँड’ !
- ‘बेस्ट कस्टमर सर्व्हिस ब्रँड’ पुरस्काराने ‘जोगळेकर कॉटेज’चा सन्मान !
- ‘खवणे कयाक्स’ ठरला ‘मोस्ट पॉप्युलर ब्रँड’
- ‘ईशा टूर्स’ ठरला ‘मोस्ट इनोव्हेटिव्ह ब्रँड’
- मराठी माणूस जोखीम घेऊन मोठा व्यवसाय करू शकतो – डॉ. अविनाश फडके