भारतीय स्टार्ट अप गोक्विक ने फेडएक्स एक्सप्रेस एएमइए लघु उद्योग अनुदान स्पर्धा २०२२ जिंकली I
भारत, नोव्हेंबर २८,२०२२: जगातील सर्वात मोठी वाहतूक कंपनी फेडएक्स कॉर्प. (NYSE: FDX) ची उपकंपनी फेडएक्स एक्सप्रेस (FedEx) ने एशिया पॅसिफिक, मिडल ईस्ट आणि आफ्रिका (AMEA) या भागातील लघु उद्योग अनुदान स्पर्धा २०२२ (एस.बी.जी.सी) च्या विजेत्याची घोषणा केली. या स्पर्धेचे विजेते GoKwik या ई-कॉमर्स कंपनी चे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. चिराग तनेजा हे आहेत. डायरेक्ट टु कनस्यूमर ब्रॅंड (डी टु सी) आणि ई- बाजारपेठांना आपल्या आर्टिफिशियल इंटेलिजेंस आणि मशीन लर्निंग सॉफ्टवेअर च्या माध्यमातून मदत करण्याचे या कंपनीचे ध्येय आहे. या कंपनी ला $३०,००० अमेरिकन डॉलर एवढे अनुदान मिळाले.
खालील तीन लघु उद्योगांना विशेष उल्लेखासह रोख $१३,००० अमेरिकन डॉलर प्रत्येकी असे बक्षीस मिळाले:
• इंडोनेशिया: टायगर फॅंग (Tiger Fang), सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीइओ), कार्गो टेक्नॉलॉजीस् (Kargo Technologies) – रिकाम्या ट्रक ची वाहतूक कमी करून आणि मध्यस्थांना काढून खर्च कमी करण्यासाठी माल वाहतूक जहाज आणि ट्रक यांना जोडणारे एक वाहतूक विषयी व्यासपीठ (प्लॅटफॉर्म).
• चीन: स्यू पो-लीन (Hsu Po-Lin), संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीइओ), मॅग एसिस्ट (magAssist) – एक वैद्यकीय तंत्रज्ञानाची (मेडटेक) कंपनी जी गंभीर आणि तीव्र हृदयविकार आणि फुफ्फुस बंद पडले तर त्यावेळी रक्ताभिसरणला मदत करणाऱ्या उपकरणांना बनवते.
• सिंगापुर: गिलियन टी (Gillian Tee), संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीइओ), होमेज (Homage) – आरोग्य सेवा पुरविणारे व्यासपीठ जे प्रौढ आणि वृद्धांना
सेवा पुरविते आणि परवानाधारक परिचारिका थेरपिस्ट, डॉक्टरस् आणि काळजी घेणाऱ्यांना त्यांच्या बरोबर आणि त्यांच्या कुटुंबियांबरोबर जोडते.
FedEx आणि Forbes Asia मधील जजेस् च्या पॅनल ने एशिया पॅसिफिक, मिडल ईस्ट आणि आफ्रिका (AMEA) या भागातील व्यापक उद्योगांमधून सर्वात उत्कृष्ट स्टार्ट अप आणि लघु उद्योगांना विजेते म्हणून निवडले आहे. चार कंपन्या त्यांच्या उल्लेखनीय दृष्टी आणि वाढीव व्यवसाय कल्पनांसह वेगळ्या ठरल्या.
FedEx Express च्या एशिया पॅसिफिक, मिडल ईस्ट आणि आफ्रिका (AMEA) या भागाचे आधींक श्री. कवलप्रीत म्हणाले की, “हे असे उद्योजक उद्याचे व्यवसाय क्षेत्र घडवतात. आर्टिफिशियल इंटेलिजेंस ने सक्षम असलेल्या कंपनी पासून ते हृदय विकाराने ग्रस्त रुग्णांना मदत करणाऱ्या कंपनींपर्यंत या वेगवेगळ्या विजेत्या कंपन्या डिजिटल परिवर्तन कसे होत आहे आणि त्याचा जीवनावर कसा परिणाम होत आहे हेच दाखवतात. आम्ही आमच्या पूर्वीच्या विजेत्यांनी FedEx अनुदानाच्या मदतीने त्यांचे व्यवसाय अधिक वरच्या स्तरावर नेल्याचे पाहिले आहे. लघु उद्योगांना जागतिक स्तरावर त्यांच्या व्यवसायाला गती देण्यासाठी व त्यांना मदत करण्यासाठी एक विश्वासू सल्लागार बनून आणि त्यांना आवश्यक असलेली संसाधने, साधने आणि उपाय पुरविणे यासाठीच FedEx अत्यंत प्रयत्नशील आहे.”
FedEx Express India च्या आंतरराष्ट्रीय ऑपरेशन्स चे व्यवस्थापकीय संचालक श्री. सुवेंदू चौधरी म्हणाले की, “FedEx मध्ये आमचा असा ठाम विश्वास आहे की आपल्या सामाजिक – आर्थिक विकासाचे भवितव्य लघु उद्योगांवर अवलंबून आहे आणि अनेक दशकांपासून आम्ही उद्योजकांना अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याचे आणि त्यांना त्यांच्या उद्दिष्टांच्या एक पाऊल जवळ आणण्याचे मार्ग शोधत आहोत. एक भारतीय कंपनीने हा अत्यंत स्पर्धात्मक पुरस्कार जिंकला आणि अन्य लहान व्यवसायांना मोठी स्वप्ने पाहण्यासाठी प्रेरणा दिल्याने मी खूप उत्साहित आहे.”
‘Forbes Asia 100 to Watch list’ मधील नव्याने उदयास येणाऱ्या स्टार्ट अप कंपन्यांना शोधून त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी Forbes Asia बरोबर FedEx सहयोग करत असल्याचे हे दुसरे वर्ष आहे. २०१२ मध्ये सर्वात आधी यू. एस. ए मध्ये सुरू झालेल्या FedEx ने लघु उद्योग अनुदान स्पर्धेचा (Small Business Grant Contest- SBGC) विस्तार यूरोप सह संपूर्ण एशिया पॅसिफिक, मिडल ईस्ट आणि आफ्रिका (AMEA) मधील ३१ बाजारपेठांमध्ये केला.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- वुमन ऑफ इम्पॅक्ट – प्रभावशाली महिलांचा सन्मान
- Grand Success of Sydenham’s Management Conclave 2024
- गोदरेज अँड बॉयसचे मुंबईच्या भूमिगत मेट्रोमध्ये योगदान
- Sydenham College Management Conclave ’24
- आजचे मार्केट अपडेट – 23 ऑगस्ट 2024 – सेन्सेक्स 33 अंकांनी वाढला आणि 81,086 वर बंद झाला: निफ्टी देखील 11 अंकांनी वाढला|Share market news in marathi