एल अँड टी ने आर्थिक वर्ष २३ मध्ये ३,००० हून अधिक नवीन अभियंत्यांना घेतले ऑनबोर्ड I

एल अँड टी ने आर्थिक वर्ष २३ मध्ये ३,००० हून अधिक नवीन अभियंत्यांना घेतले ऑनबोर्ड

मुंबई: ईपीसी प्रकल्प, उच्च तंत्रज्ञान उत्पादन आणि सेवा यामध्ये गुंतलेली भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी लार्सन अँड टुब्रोने आर्थिक वर्ष २२ च्या तुलनेत आर्थिक वर्ष २३ साठी नवीन अभियंत्यांच्या  नियुक्तीत दुपटीने वाढ केली आहे. आर्थिक वर्ष २३ मध्ये ३,००० हून अधिक पदवीधर आणि पदव्युत्तर अभियांत्रिकी प्रशिक्षणार्थींचे (GETS आणि PGETS) ऑनबोर्डिंग गेल्या आर्थिक वर्षातील १,०६७ या आकडेवारीपेक्षा तिप्पटीहून अधिक वाढले आहे.

विकासावर बोलताना लार्सन टुब्रोच्या कॉर्पोरेट मनुष्यबळ विकास विभागाचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि प्रमुख डॉ. सी. जयकुमार म्हणाले, “एक कंपनी म्हणून एल अँड टी वेगाने विस्तारत आहे आणि सध्या कंपनीकडे विक्रमी ऑर्डर बुक आहे. यासाठी सध्याच्या आणि भविष्यातील व्यवसाय/ग्राहकांच्या गरजा प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी प्रशिक्षित तांत्रिक व्यावसायिकांची स्थिर कौशल्य व्यवस्था तयार ठेवणे आवश्यक आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत नवीन अभियंत्यांची भरती दुप्पटीहून अधिक करण्याच्या व्यवस्थापनाच्या निर्णयाच्या हे केंद्रस्थानी होते. आमच्या अतिरिक्त व्यावसायिक गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही बाजारपेठेत गेलो आणि नवीन अभियंत्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संपूर्ण भारतातून ८०,००० हून अधिक अर्ज आले आणि ब्रँड एल अँड टी चे महत्त्वाकांक्षी मूल्य तरुण अभियंत्यांमध्ये वाढत आहे हे लक्षात घेणे खरोखरच आनंददायी आहे. याचे श्रेय एल अँड टी च्या तरुण प्रतिभेला चालना देण्याच्या  आणि त्यांना उद्योगातील सर्वोत्तम अभियांत्रिकी प्रतिभा बनवण्यासाठी विशेष आणि सानुकूलित प्रशिक्षण पुरविण्याच्या समृद्ध संस्कृतीला दिले जाऊ शकते.”

विविधता आणि समावेशन रेकॉर्डमध्ये लक्षणीय सुधारणा करण्याच्या कंपनीच्या धोरणाशी सुसंगत नियुक्त केलेल्या महिला अभियंत्यांची संख्या आर्थिक वर्ष २२ मधील २४८ वरून आर्थिक वर्ष २३ मध्ये १,००९ पर्यंत चौपट झाली आहे. ७५% नवीन अभियंते मेकॅनिकल, सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल शाखांमधून नियुक्त केले जातात. या शाखांमध्ये महिलांचे प्रमाण कमी असते. त्यामुळे नवीन अभियंत्यांच्या सध्याच्या तुकडीमध्ये ३०% महिला आहेत हे लक्षणीय आहे. सध्या एल अँड टी मधील एकूण कर्मचार्‍यांमध्ये ७.६% महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे आणि त्यांनी पुरूषांचे वर्चस्व मानल्या जाणार्‍या क्षेत्रात आधीच यशस्वीपणे प्रवेश केला आहे. एल अँड टी चा उपक्रम, WINSPIRE, एल अँड टी विश्वात महिलांच्या वाढत्या सहभागाच्या प्रवृत्तीला प्रोत्साहन देत आहे.

एल अँड टी ही एक समान संधी देणारी कंपनी असून ती लोकांना त्यांची सर्जनशील प्रवृत्ती व्यक्त करण्यासाठी आणि सर्व स्तरांवर त्यांची क्षमता ओळखण्यासाठी संधी प्रदान करण्याकरता कटिबद्ध आहे.

Larsen & Toubro
Larsen & Toubro

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *