अर्थसंकेत उद्योजकांची दिवाळी पहाट २०२२ धावता आढावा I Walkthrough Arthsanket Diwali Biz Conclave I
अर्थसंकेत उद्योजकांची दिवाळी पहाट २०२२ धावता आढावा I Walkthrough Arthsanket Diwali Biz Conclave I
अर्थसंकेतची समृद्ध विचारांची दिवाळी
अर्थसंकेत उद्योजकांची दिवाळी पहाट कार्यक्रम संपन्न
शनिवार २९ ऑक्टोबर २०२२ रोजी “अर्थसंकेत उद्योजकांची दिवाळी पहाट” हा कार्यक्रम छत्रपती शिवाजी मंदीर नाट्यगृह, दादर पश्चिम, मुंबई येथे सकाळी ७ ते १० या वेळेत कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री शंतनू भडकमकर, विकोचे श्री संजीव पेंढारकर, अर्थसंकेतचे डॉ अमित बागवे व सौ रचना लचके बागवे उपस्थित होते.
संकल्पाला मेहनतीची जोड मिळाल्यास कार्य सिद्धीला पोहोचते असे मत विकोचे संचालक श्री संजीव पेंढारकर यांनी मांडले.
अपयशाला न घाबरता यशाची वाटचाल करणे आवश्यक. कोणतेही धोके घेताना कोणते संकेत मिळत आहेत ते लक्षात घेणे आवश्यक. – श्री शंतनू भडकमकर
अर्थसंकेतच्या सह संस्थापक सौ रचना लचके बागवे यांच्या ‘सप्तरंग उद्योजकतेचे’ या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. ‘सप्तरंग उद्योजकतेचे’ पुस्तकात श्री नितीन बोरसे (ठाणे वर्तमान), श्रीमती नीता पवाणी (ग्लोबल कॉम्प्युटर सर्व्हिसेस), श्री सचिन शिगवण (सोलारमॅन) , श्री महेंद्र देवळेकर (आकार क्नॉलेज वर्ल्ड), श्री दीपक हरिया (बिल्डर आणि डेव्हलपर), सौ कविता देशमुख (अर्श इन्फो सर्व्हिसेस) , श्री सुशील अगरवाल (अगरवाल ज्वेलर्स) यांनी परिस्थितीशी झगडून मिळविलेल्या यशाचे शब्दांकन केले आहे.
‘लालबागचा राजा’ व ‘मुंबईचा राजा, गणेशगल्ली’ मुंबईतील प्रसिद्ध ज्वेलर श्री प्रीतम वैद्य, हेडहंटर श्री गिरीश टिळक, श्री राजेश विनायक कदम व झोई फिनटेक यांचा महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
जेष्ठ मूर्तिकार श्री मनोहर बागवे यांच्या कार्याचा इंजि. डॉ. माधवराव भिडे जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
कोणतेही काम सुरु करण्या अगोदर आपण श्री गणेशाची पूजा करतो आणि म्हणूनच यंदा ‘प्रारंभ’ या थीम अंतर्गत आपण विविध गणेश उत्सव मंडळांचे व्यवस्थापन आणि त्यांचे समाजाप्रती केले जाणारे उपक्रम हा विषय घेण्यात आला होता. गणेश मंडळे गेली अनेक वर्ष कार्यरत आहेत. समाजाला एकत्रित आणणे आणि समाजाच्या प्रती सामाजिक काम करणे हे कार्य ते अविरतपणे करत असतात. गणपती मधील १० दिवस उत्सवाचे आणि इतर वर्षभर समाज उपयोगी उपक्रम चालू असतात. त्यासोबतच अनेक लोकांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होतात आणि अर्थांजन चालू राहते. गेली २ वर्षे कोरोनाच्या संकटामुळे हे कार्य बंद होते, पण या वर्षी मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा करण्यात आला. त्यांच्या ह्या कार्याचा सन्मान अर्थसंकेत दिवाळी पहाट या कार्यक्रमात करण्यात आला. मुंबईतील जवळपास १० गणेशमंडळांचा सत्कार यावेळी करण्यात आला.
माजघर या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
अर्थसंकेत प्रस्तुत ‘उद्योजकांची दिवाळी पहाट २०२२ – वर्ष सातवे’
सपोर्टेड बाय – पितांबरी – नाविन्यपूर्ण उत्पादने, डिव्हाईन विन्स्पायर फाऊंडेशन, फंड जीनी, फेम ऍट ब्युटी पार्लर
फूड पार्टनर – अंग्रेझी ढाबा
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- वुमन ऑफ इम्पॅक्ट – प्रभावशाली महिलांचा सन्मान
- Grand Success of Sydenham’s Management Conclave 2024
- गोदरेज अँड बॉयसचे मुंबईच्या भूमिगत मेट्रोमध्ये योगदान
- Sydenham College Management Conclave ’24
- आजचे मार्केट अपडेट – 23 ऑगस्ट 2024 – सेन्सेक्स 33 अंकांनी वाढला आणि 81,086 वर बंद झाला: निफ्टी देखील 11 अंकांनी वाढला|Share market news in marathi