७६ टक्के कर्मचाऱ्यांचे आरोग्य व उत्पादकतेवर वर्क-रिलेटेड मस्कुलोस्केलेटल डिसऑर्डर्सचा (डबल्यूएमएसडी) परिणाम: गोदरेज इंटीरिओ संशोधन
७६ टक्के कर्मचाऱ्यांचे आरोग्य व उत्पादकतेवर वर्क-रिलेटेड मस्कुलोस्केलेटल डिसऑर्डर्सचा (डबल्यूएमएसडी) परिणाम: गोदरेज इंटीरिओ संशोधन
· ४६ टक्के कर्मचार्यांना एका केंद्रित भागात वेदना जाणवल्या आणि ५० टक्क्यांपेक्षा अधिक कर्मचार्यांना अनेक भागात वेदना जाणवल्या
· शारीरिक वेदनेमुळे मागील सहा महिन्यांत १५ टक्के कर्मचार्यांनी ३ ते ४ दिवस रजा घेतली
· वर्कस्पेस फर्निचर विभागामध्ये २०२५ पर्यंत १६ टक्के मार्केट शेअर मिळवण्याचा प्रयत्न
मुंबई, ऑक्टोबर ३१, २०२२: गोदरेज अॅण्ड बॉईस या गोदरेज ग्रुपच्या प्रमुख कंपनीने घोषणा केली की, त्यांचा व्यवसाय गोदरेज इंटीरिओ या भारतातील गृह व संस्थात्मक विभागांमध्ये अग्रगण्य फर्निचर सोल्यूशन्स ब्रॅण्डने विशेष संशोधन ‘वर्क-रिलेटेड मस्कुलोस्केलेटल डिसऑर्डर्स इन इम्प्लॉयीज’ (डब्ल्यूएमएसडी)’च्या निष्पत्तींना प्रकाशित केले आहे. हायब्रिड वर्क मॉडेलमधील कर्मचार्यांच्या अपेक्षा व चिंता समजून घेण्यासाठी गोदरेज इंटेरिओ येथील वर्कस्पेस अॅण्ड एर्गोनॉमिक्स रिसर्च सेलने देशव्यापी संशोधन केले. या संशोधनामध्ये विविध पैलूंचा समावेश होतो, जसे कर्मचार्यांच्या काम करताना शारीरिक वेदनेशी संबंधित चिंता, अयोग्य वर्क टूल इंटीगेशन आणि कार्यालयामध्ये दीर्घकाळ कामाचे तास व त्यामुळे स्नायूंवर येणार्या भाराबाबत मत. या संशोधनामध्ये सहभाग घेतलेले कार्यालयीन ५०० कर्मचारी २१ ते ४० वर्षे वयोगटातील होते. त्यांच्यापैकी बहुतेकजण एमएनसी व भारतीय कॉर्पोरेट्समध्ये काम करत आहेत.
संशोधनाच्या मते वर्क-रिलेटेड मस्कुलोस्केलेटल डिसऑर्डर्स (डब्ल्यूएमएसडी) कर्मचाऱ्यांची उत्पादकता व स्वास्थ्यावर होणाऱ्या परिणमामुळे वाढती चिंता बनले आहेत. सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अॅण्ड प्रीव्हेंशनच्या मते ‘मस्कुलोस्केलेटल डिसऑर्डर्स (एमएसडी) म्हणजे स्नायू, मज्जातंतू, स्नायूबंध, सांधे, उपास्थि आणि पाठीच्या कण्यांच्या दुखापती किंवा विकार’. पण डब्ल्यूएमएसडी या अशा स्थिती आहेत, ज्या विशेषत: दीर्घकाळापर्यंत राहिल्यास कामाचे वातावरण व कामाच्या ठिकाणी होणाऱ्या कामावर लक्षणीय प्रतिकूल परिणाम करतात.
९१ टक्के कर्मचार्यांना कामाच्या ठिकाणी असलेल्या घटकांबद्दल पूर्णपणे माहित नाही, ज्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते आणि डब्ल्यूएमएसडी (वर्क-रिलेटेड मस्कुलोस्केलेटल डिसऑर्डर्स)ची सुरुवात होऊ शकते, तर ८२ टक्के कर्मचार्यांनी घरून काम करताना शरीराच्या वेदनांशी संबंधित चिंता व्यक्त केली. संशोधनामधून निदर्शनास आले आहे की, बैठेकाम करण्याची जीवनशैली, एर्गोनॉमिक रिमोट वर्कस्पेसेसचा अभाव, पोस्चरल ब्रेकचा अभाव, अयोग्य वर्क-टूल परस्परसंवाद, अयोग्य फर्निचर आणि दीर्घ कामकाजाचे दिवस हे सर्व डब्ल्यूएमएसडींच्या वाढीस कारणीभूत ठरतात.
या संशोधनामधून निदर्शनास आलेली चिंताजनक बाब म्हणजे ६४ टक्के कर्मचारी बैठेकाम करण्याच्या जीवनशैलीमुळे दिवसातून ९ तासांपेक्षा जास्त वेळ बसून व्यतित करतात आणि ५० टक्के कर्मचारी किमान ६ ते ७ तास लॅपटॉप वापरतात, ज्यामुळे डोळ्यांवर ताण, बोट दुखणे, पाठदुखी, मान दुखणे आणि झोपेचा त्रास यांसारखे शारीरिक आरोग्य धोके निर्माण होतात. या सर्व चिंता असूनही ९५ टक्के कर्मचार्यांना स्थिर स्थिती राखण्याचे दुष्परिणाम माहित नाहीत.
गोदरेज इंटीरिओच्या विपणनाचे (बी२बी) सहयोगी उपाध्यक्ष समीर जोशी म्हणाले, ‘’हायब्रिड वर्क मॉडेलने मुलभूत बदल घडवून आणले आहेत, जसे मानसिक आरोग्याला प्राधान्य दिले जात आहे, कार्यक्षेत्रे ऑप्टिमाइझ केली गेली आहेत आणि तंत्रज्ञान अधिक व्यापक बनले आहे. पण तंत्रज्ञान किंवा अशा इतर कामाच्या साधनांचा चुकीचा वापर यामुळे कर्मचार्यांच्या कामकाजाच्या वेळेमध्ये वाढ झाली आहे. परिणामी वर्क-रिलेटेड मस्कुलोस्केलेटल डिसऑर्डर्स (डबल्यूएमएसडी) वाढले आहेत, जे कर्मचार्यांचे आरोग्य व उत्पादकतेसाठी प्रमुख प्रतिबंधक आहेत.
या संशोधनाच्या माध्यमातून गोदरेज इंटीरिओने एर्गोनॉमिक्स प्रशिक्षणासाठी एक पद्धतशीर आणि संरचित दृष्टीकोन सुचवला आहे, ज्यामुळे कार्यालयात जाणाऱ्यांमध्ये डब्ल्यूएमएसडींचा धोका कमी होऊ शकतो. त्यांचा प्रसार रोखण्यासाठी आणि कमी करण्यासाठी, प्रशिक्षण कार्यक्रमाची निवड करण्यापूर्वी कंपन्यांनी कर्मचारी वर्तन आणि कार्य साधन परस्परसंवाद यांसारख्या घटकांचेज्ञअकांे्यंत ा चुकीचा वापर – गंभीरपणे मूल्यांकन केले पाहिजे. याव्यतिरिक्त, त्यांनी पर्यावरणीय मापदंड जसे की प्रदीपन आणि थर्मल व ध्वनिक कम्फर्ट यांचा विचार केला पाहिजे, जे कर्मचार्यांच्या आरोग्यावर तितकेच परिणाम करतात. गोदरेज इंटीरिओमध्ये आम्हाला ऑफिस फर्निचर क्षेत्रात एर्गोनॉमिक फर्निचरची मागणी होताना दिसत आहे आणि या आर्थिक वर्षात आम्ही विभागामध्ये २५ टक्के वाढ करण्याचा प्रयत्न करत आहोत.”
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- डॉ. मारुती पवार यांना सन्माननीय डॉक्टरेट पदवी प्रदान – भारताच्या ‘स्टील व्हिजनरी’च्या प्रेरणादायी वाटचालीला सलाम
- गोदरेज फाउंडेशनतर्फे ‘ग्लोबल अॅक्सेस टू टॅलेंट फ्रॉम इंडिया (GATI) फाउंडेशन’चे सहसादरीकरण
- स्मार्ट होम कॅमेऱ्यांमुळे महिलांचा आत्मविश्वास वाढतो – गोदरेज सर्वेक्षण
- बास्किन रॉबिन्सने क्विक कॉमर्स व स्नॅकिंग ट्रेंडसाठी रिटेल विस्तार केला
- विचार ते अंमलबजावणी: डॉ. अमित बागवे घडवत आहेत महाराष्ट्र उद्योगजगतात क्रांती