गोदरेज अँड बॉयसतर्फे गोदरेज लॉकिम मोटर्सच्या मेडिकल कॅलिब्रेशन सेवांच्या माध्यमातून भारताच्या आरोग्यसेवा क्षेत्रांचे संरक्षण I
गोदरेज अँड बॉयसतर्फे गोदरेज लॉकिम मोटर्सच्या मेडिकल कॅलिब्रेशन सेवांच्या माध्यमातून भारताच्या आरोग्यसेवा क्षेत्रांचे संरक्षण
~ गोदरेज लॉकिम मोटर्सचे आर्थिक वर्ष २५ पर्यंत एकंदर कॅलिब्रेशन सेवा उत्पन्न ९० टक्क्यांनी वाढवण्याचे उद्दिष्ट
~ वैद्यकीय उपकरणांसाठी कॅलिब्रेशन सुविधा पुरवण्यासाठी मान्यता मिळवणारी गोदरेज लॉकिम मोटर्स ही पहिली भारतीय कॅलिब्रेशन पुरवठादार कंपनी
मुंबई ११ ऑक्टोबर २०२२ – गोदरेज अँड बॉयस या गोदरेज समूहाच्या प्रमुख कंपनीने गोदरेज लॉकिम मोटर्स या आपल्या व्यवसाय विभागाने आर्थिक वर्ष २५ पर्यंत उत्पन्नात ९० टक्के वाढ करण्याचे उद्दिष्ट ठेवल्याचे जाहीर केले. वैद्यकीय उपकरणांसाठी कॅलिब्रेशन सेवा पुरवून गोदरेज लॉकिम मोटर्स भारताच्या आरोग्यसेवा क्षेत्राचे संरक्षण करत आहे. उपकरणे अयोग्य प्रकारे कॅलिब्रेट केली गेल्यास रुग्णाचे निदान चुकू शकते. ते टाळण्यासाठी या सेवेद्वारे वैद्यकीय उपकरणांच्या कार्यक्षमतेचे निकष आंतरराष्ट्रीय मानकांनुसार आहेत की नाही हे तपासले जाते. वैद्यकीय उपकरणांसाठी प्रमाणित उपकरणाची व्यवस्था केल्याबद्दल एनएबीएल मान्यता मिळवणारी ही पहिलीच कंपनी आहे.
वैद्यकीय उपकरणे अयोग्य निष्कर्ष, चुकीच्या देय तारखा दर्शवत असेल किंवा ठिकाण चुकीचे दाखवत असेल, तर ते कॅलिब्रेशनसाठी पाठवले जाणे आवश्यक आहे. कॅलिब्रेशन न करण्यात आलेले उपकरण चुकीचे निदान करू शकते आणि त्यावरून दिले जाणारे उपचार रुग्णासाठी धोकादायक ठरू शकतात. त्यातून पुढे खटले, दंड, उपकरणांच्या देखभाल खर्चात वाढ असे प्रकार उद्भवू शकतात. म्हणूनच प्रमाणित कॅलिब्रेशनच्या मदतीने हॉस्पिटलमधील उपकरणे इन्स्टॉल करणे अतिशय आवश्यक आहे. गोदरेज लॉकिम मोटर्सद्वारे रुग्णांचे सुरक्षित निदान करण्यासाठी आवश्यक उपकरण श्रेणींचे कॅलिब्रेशन केले जाते. त्यामध्ये ईसीजी मशिन्स, रुग्णांसाठी मॉनिटर्स, रेडिओलॉजी सर्जिकल उपकरणे, बीपी मॉनिटर्स, ऑक्सिमीटर्स आणि इतर विविध उपकरणांचा समावेश होतो.
गोदरेज लॉकिम मोटर्सचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि व्यवसाय प्रमुख झिर्क्सिस मार्कर म्हणाले, ‘आरोग्यसेवा आणि फार्मा क्षेत्रातील वैद्यकीय उपकरणांची अचूकता राखण्यासाठी आम्ही कॅलिब्रेशन सेवा देतो. मोजमापातील चुकांचे प्रमाण शक्य तितके कमी करण्याचे आणि अचूक निदान शक्य करण्याचे आमचे ध्येय आहे. आम्ही आतापर्यंत पहिल्या व दुसऱ्या श्रेणीतील शहरे तसेच मेट्रो शहरांतील मिळून ३२ हजारांपेक्षा जास्त वैद्यकीय उपकरणांचे कॅलिब्रेशन केले आहे. आर्थिक वर्ष २५ पर्यंत वैद्यकीय उपकरण कॅलिब्रेशनमध्ये ७० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.’
वैद्यकीय उपकरणांच्या कॅलिब्रेशन प्रक्रियेमध्ये प्रमाणित कॅलिब्रेटर किंवा अनालायझरद्वारे कॅलिब्रेटिंग केले जाते. त्याचे निष्कर्ष उपकरणाने मोजलेले मूल्य आणि ज्ञात असलेले प्रमाणित मूल्य यांच्यातील नाते प्रस्थापित करते. ही उपकरणे लागू होणारे पात्रता निकष आणि ग्राहकांच्या गरजांप्रमाणे इन- हाउस किंवा दुसऱ्या ठिकाणीही कॅलिब्रेट करता येतात. गोदरेज लॉकिम मोटर्सद्वारे वैद्यकीय उपकरणांचे कॅलिब्रेशन करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मास्टर किंवा प्रमाणित उपकरणाचेही कॅलिब्रेशन केले जाते.
About Godrej & Boyce
Godrej & Boyce (‘G&B’), a Godrej Group Company, was founded in 1897 and has contributed to India’s journey of self-reliance through manufacturing. G&B patented the world’s first springless lock and since then, has diversified into 14 businesses across various sectors from Security, Furniture, and Aerospace to Infrastructure and Defence. Godrej is one of India’s most trusted brands serving over 1.1bn customers worldwide daily.
To learn more visit: www.godrej.com
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- वुमन ऑफ इम्पॅक्ट – प्रभावशाली महिलांचा सन्मान
- Grand Success of Sydenham’s Management Conclave 2024
- गोदरेज अँड बॉयसचे मुंबईच्या भूमिगत मेट्रोमध्ये योगदान
- Sydenham College Management Conclave ’24
- आजचे मार्केट अपडेट – 23 ऑगस्ट 2024 – सेन्सेक्स 33 अंकांनी वाढला आणि 81,086 वर बंद झाला: निफ्टी देखील 11 अंकांनी वाढला|Share market news in marathi