क्राफ्ट्समन ऑटोमेशन लिमिटेड इनिशियल पब्लिक ऑफर १५ मार्च २०२१ पासून खुली

क्राफ्ट्समन ऑटोमेशन लिमिटेड

क्राफ्ट्समन ऑटोमेशन लिमिटेड इनिशियल पब्लिक ऑफर १५ मार्च २०२१ पासून खुली

• प्रति इक्विटी शेअर ₹1,488 ते ₹1,490 चा प्राइज बँड निश्चित
• ही ऑफर सोमवार 15 मार्च 2021 ते बुधवार 17 मार्च 2021 पर्यंत खुली राहणार
• एकगठ्ठा किमान 10 इक्विटी शेअर्स आणि त्यानंतर 10 च्या पटीत इक्विटी शेअर्सच्या खरेदीसाठी बोली लावता येईल.
• फ्लोअर प्राइज ही इक्विटी शेअर्सच्या दर्शनी मूल्याच्या 297.60 पट तर कॅप प्राइज ही इक्विटी मूल्याच्या 298.00 पट असेल.

मुंबई, 9 मार्च 2021: ऑटोमोटिव्ह क्षेत्रासाठीची पॉवरट्रेन व इतर उत्पादने ( ऑटोमेटिव्ह – पॉवरट्रेन अँड अदर्स), ऑटोमोटिव्ह क्षेत्रासाठी अ‍ॅल्युमिनियम उत्पादने (ऑटोमेटिव्ह – अ‍ॅल्युमिनियम प्रोडक्ट्स) आणि इंडस्ट्रीयल व इंजिनीअरिंग उत्पादन क्षेत्र (इंडस्ट्रीयल अँड इंडस्ट्रीयल) अशा तीन व्यापारी विभागांमध्ये कार्यरत असलेली व कार्यात्मक उतरंडीतील सर्व उत्पादन क्षमतांचा समन्वय साधणारी वैविध्यपूर्ण इंजिनीअरिंग कंपनी क्राफ्ट्समन ऑटोमेशन लिमिटेड (“कंपनी“) 15 मार्च 2021 रोजी प्रति ₹ 5 इतके दर्शनी मूल्य असलेल्या आपल्या शेअर्सची प्रारंभी समभाग विक्री योजना अर्थात इनिशियल पब्लिक ऑफर खुली करणार आहे. (“इक्विटी शेअर्स” आणि तत्सम इनिशियल पब्लिक ऑफर म्हणजे “ऑफर“). ही ऑफर 17 मार्च 2021 रोजी बंद होईल. ऑफरचा किंमतपट्टा प्रति इक्विटी शेअर ₹ 1,488 ते ₹ 1,490 इतका निर्धारित करण्यात आला आहे.

या इनिशियल पब्लिक ऑफरिंगमध्ये कंपनीच्या एकूण 1,500.00 दशलक्ष रुपयांच्या ताज्या इश्यूंचा (“फ्रेश इश्यू”) तसेच श्रीनिवासन रवी (प्रमोटर सेलिंग शेअरहोल्डर) यांचे 130,640 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, मरीना III (सिंगापूर) पीटीई लि. (मरीना) यांचे 1559,260 पर्यंतचे इक्विटी शेअर्स आणि इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशनचे (IFC) (मरीनासह IFC, “इन्व्हेस्टर सेलिंग शेअरहोल्डर) 1,414,050 पर्यंतचे इक्विटी शेअर्स आणि के. गोमटेश्वरन (इंडिव्हिज्युअल सेलिंग शेअरहोल्डर) यांचे 1,417,500 पर्यंतचे इक्विटी शेअर्स अशा एकूण 4,521,450 पर्यंतच्या इक्विटी शेअरच्या विक्रीसाठीच्या ऑफरचा समावेश आहे. (प्रमोटर सेलिंग शेअरहोल्डर आणि इंडिव्हिज्युअल सेलिंग शेअरहोल्डर यांना एकत्रितपणे सेलिंग शेअरहोल्डर्स असे म्हटले गेले आहे व या सेलिंग शेअरहोल्डर्सद्वारे विक्रीसाठी खुल्या झालेल्या इक्विटी शेअर्सना ऑफर्ड शेअर्स असे म्हटले गेले आहे.

या ऑफरमध्ये किमान 10 इक्विटी शेअर्सच्या एकगठ्ठा खरेदीसाठी व त्यानंतर 10 च्या पटीत इक्विटी शेअर्स विकत घेण्यासाठी बोली लावता येईल.

सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट्स (रेग्युलेशन) नियम 1957, मधील सुधारणांन्वये (SCRR) व त्याबरोबर SEBI ICDR रेग्युलेशन्समधील नियम 31 अन्वये या ऑफरमध्ये विक्रीसाठी खुल्या करण्यात आलेल्या इक्विटी शेअर्सची एकूण किंमत ही किमान कंपनीच्या ऑफर संपल्यानंतर कंपनीजवळ उरणा-या इक्विटी शेअर भांडवलाच्या गुणोत्तरात असेल. (हिशेबानुसार ऑफर प्राइज). ही ऑफर SEBI ICDR नियमावलीच्या नियम 6(1) चे पालन करत बुक बिल्डिंग प्रोसेसच्या माध्यमातून खुली करण्यात आली आहे, जिथे या ऑफरमधील 50% इक्विटी शेअर्सचे वाटप पात्र संस्थात्मक खरेदीदारांमध्ये (क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल बायर्स – QIBs) गुणोत्तर तत्त्वावर केले जाईल. (QIB कॅटेगरी), पण त्यासाठी कंपनी आणि इन्व्हेस्टर सेलिंग शेअरहोल्डर्सना BRLMsच्या सल्ल्याने QIB कॅटेगिरीतील 60 टक्क्यांपर्यंतचा हिस्सा हा अँकर इन्व्हेस्टर्सना स्वेच्छेने द्यावा लागेल (अँकर इन्व्हेस्टर पोर्शन) अँकर इन्व्हेस्टर पोर्शनमधील एक तृतीयांश भाग हा डोमेस्टिक म्युच्युअल फंड्ससाठी राखून ठेवला जाईल. उपरोक्त ज्या मूल्यास अँकर इन्व्हेस्टर्ससाठी इक्विटी शेअर्सचा हिस्सा राखून ठेवण्यात आला होता, त्याच किंवा त्याहून अधिक किंमतीली डोमेस्टिक म्युच्युअल फंडांकडूनही बोली लावली गेल्यास उपरोक्त मुद्दा लागू होईल. (अँकर इन्व्हेस्टर अलोकेशन प्राइज) पुरेशी नोंदणी न झाल्यास किंवा अँकर इन्व्हेस्टर पोर्शनसाठी हिस्सा राखून ठेवला न गेल्यास उरलेले इक्विटी शेअर्स QIB कॅटेगरीमध्ये जमा केले जायला हवेत. अँकर इन्व्हेस्टर्ससाठीचा हिस्सा बाजूला काढल्यानंतर QIB कॅटेगरीमधील इक्विटी शेअर्सच्या संख्येतून अँकर इन्व्हेस्टर्ससाठीच्या हिश्श्यातील इक्विटी शेअर्सची संख्या वजा केली जायला हवी. QIB कॅटेगरीतले 5% (अँकर इन्व्हेस्टर पोर्शन वगळून) इक्विटी शेअर्स हे गुणोत्तर पद्धतीने केवळ म्युच्युअल फंडांसाठी उपलब्ध असतील व QIB कॅटेगरीतील उर्वरीत शेअर्सचे वाटप हे म्युच्युअल फंडांसह सर्व QIB मध्ये प्रमाणित पद्धतीने केले जाईल. पण त्यांच्याकडून उपरोक्त ऑफर प्राइज किंवा त्याहून अधिक रकमेच्या वैध बोली लावल्या तरच असे वाटप होऊ शकेल. पण म्युच्युअल फंडांकडून आलेली एकूण मागणी ही QIB कॅटेगरीच्या 5 टक्क्यांहून कमी असेल (अँकर इन्व्हेस्टर पोर्शन वगळून) तर म्युच्युअल फंड पोर्शनमध्ये वाटपासाठी उपलब्ध असलेले उर्वरित इक्विटी शेअर्स हे उर्वरित QIB कॅटेगरीमध्ये (अँकर इन्व्हेस्टर पोर्शन वगळून) जमा केले जावेत, जेणेकरून QIBs मध्ये या इक्विटी शेअर्सची योग्य प्रमाणात विभागणी करता येईल.

तसेच, SEBI ICDR च्या नियमावलीनुसार ऑफरचा किमान 15% हिस्सा हा प्रमाणित पद्धतीने बिगर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असेल व ऑफरचा किमान 35% हिस्सा हा रिटेल इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर्सना देण्यासाठी उपलब्ध असेल. या खरेदीदारांकडून उपरोक्त किंवा त्याहून अधिक किंमतीची बोली वैध पद्धतीने लावली गेल्यास ही विभागणी लागू होईल. अँकर इन्व्हेस्टर्सव्यतिरिक्तच्या बोली लावणा-या सर्व खरेदीदारांना केवळ अॅप्लिकेशन सपोर्ट बाय ब्लॉक्ड अमाउंट (“ASBA”) प्रक्रियेच्या माध्यमातूनच या ऑफरमध्ये सहभागी होणे अनिवार्य असेल, ज्यात त्यांना आपापल्या बँकखात्यांचे तपशील (UPI यंत्रणा वापरणा-या किरकोळ वैयक्तिक गुंतवणूकदारांसाठी UPI ID सह) पुरवावे लागतील, जेणेकरून बोलीची किंमत SCSBs किंवा प्रायोजक बँकेकडून ब्लॉक केली जाईल.

अँकर इन्व्हेस्टर्सना ASBA प्रक्रियेच्या माध्यमातून अँकर इन्व्हेस्टर पोर्शनमध्ये सहभागी होण्याची परवानगी नाही. या फ्रेश इश्यूंमधून उभारल्या जाणारी निव्वळ रक्कम ही कंपनीकडून 1,200.00 दशलक्ष रुपयांपर्यंतच्या काही विशिष्ट देण्यांची पूर्णत: किंवा अंशत: परतफेड/मूदतपूर्व परतफेड करण्यासाठी वापरली जाईल आणि उर्वरित हिस्सा सर्वसाधारण कॉर्पोरेट हेतूंसाठी वापरला जाईल असा कंपनीचा प्रस्ताव आहे.

अँक्सिस कॅपिटल लिमिटेड आणि आयआयएफएल सिक्युरिटीज लिमेटेज हे या इश्युंचे व्यवस्थापक अर्थात बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत.

या ऑफरमध्ये विक्रीसाठी खुले करण्यात आलेले इक्विटी शेअर्स BSE लिमिटेड (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (NSE आणि BSE मिळून “ स्टॉक एक्स्चेंजेस“) अशा दोन्ही ठिकाणी सूचिबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे. या ऑफरसाठी BSE हे नियुक्त स्टॉक एक्स्चेंज आहे.

या दस्तऐवजाअंतर्गत वापरण्यात आलेल्या आणि विशिष्ट पद्धतीने व्याख्याबद्ध न करण्यात आलेल्या सर्व संज्ञांचा अर्थ हा 5 मार्च 2021 च्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (RHP) मध्ये त्यांच्यासाठी निर्धारित करण्यात आलेल्या अर्थांबरहुकुम असेल.

Craftsman Ipo
Craftsman Ipo

Disclaimer:

Craftsman Automation Limited is proposing, subject to, applicable statutory and regulatory requirements, receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to make an initial public offer of its Equity Shares and has filed the RHP with SEBI. The RHP shall be available on the websites of SEBI, BSE and NSE at www.sebi.gov.in, www.bseindia.com and www.nseindia.com, respectively, and is available on the websites of the BRLMs i.e. Axis Capital Limited and IIFL Securities Limited at www.axiscapital.co.in and www.iiflcap.com, respectively. Potential investors should note that investment in equity shares involves a high degree of risk and for details relating to the same, see the section titled “Risk Factors” on page 22 of the RHP, when available. Potential investors should not rely on the DRHP for any investment decision.

The Equity Shares have not been and will not be registered under the U.S. Securities Act of 1933, as amended (“Securities Act”) or any state securities laws in the United States and, unless so registered, may not be offered or sold within the United States, except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements of the Securities Act and in accordance with any and applicable U.S. state securities laws. The Equity Shares are being offered and sold outside the United States in offshore transactions in reliance on Regulation S under the Securities Act and the applicable laws of each jurisdiction where such offers and sales are made. There will be no public offering in the United States.

DISCLAIMER CLAUSE OF SEBI: SEBI only gives its observations on the offer documents and this does not constitute approval of either the issue or the specified securities stated in the offer document. The investors are advised to refer to page 334 of the RHP for the full text of the disclaimer clause of SEBI.

DISCLAIMER CLAUSE OF BSE: It is to be distinctly understood that the permission given by BSE Limited should not in any way be deemed or construed that the offer document has been cleared or approved by BSE Limited nor does it certify the correctness or completeness of any of the contents of the of the offer document. The investors are advised to refer to the page 336 of the RHP for the full text of the disclaimer clause of the BSE Limited.

DISCLAIMER CLAUSE OF NSE: It is to be distinctly understood that the permission given by NSE should not in any way be deemed or construed that the offer document has been cleared or approved by NSE nor does it certify the correctness or completeness of any of the contents of the offer document. The investors are advised to refer to page 337 of the RHP for the full text of the disclaimer clause of NSE.

शेअर मार्केटचे आकर्षण I Marathi Share Market I Avadhut Sathe Interview I

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *