नवीन कामगार कायद्यांतर्गत कामाचे तास, रजा,पगार यामध्ये होणार बदल I
नवीन कामगार कायद्यांतर्गत कामाचे तास, रजा,पगार यामध्ये होणार बदल
१ जुलै पासून लागू होणाऱ्या युनिअन गव्हर्नमेंट च्या नव्या कामगार कायद्यांतर्गत दर दिवसाचे कामाचे तास ८ ते १२ असून आठवड्याचे तास ४८ करण्यात आले आहेत.
कंपन्या ४ दिवसांचा कामाचा आठवडा ठरवू शकतील परंतु दर दिवशी ८ ऐवजी १२ तास काम करण्याची वेळ ते वाढवू शकतील. तसेच ओव्हरटाईम चे तास देखील ५०( फॅक्टरी ऍक्ट ) ते १२५ तास ( नवीन कामगार कायदा ) असे ठेवू शकतील.
कामाचे तास वाढवून आठवड्यात चारच दिवस काम केल्यास कामगारांना जास्त वेळ रजा घेता येणार असली तरीही त्यांना जास्त वेळ काम देखील करावे लागणार आहे.यामुळे त्यांना आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागेल व ओव्हरटाईम मुळे त्यांना जास्त पैसे मिळणार असले तरीही त्यांना वीकएंड ला काम करावे लागेल.
युनिअन लेबर मिनिस्ट्री ने सांगितल्यानुसार, भत्ता कायदा, सामाजिक सुरक्षा कायदा, इंडस्ट्री रिलेशन कायदा, कामाच्या ठिकाणी सुरक्षा कायदा असे चार कायदे अमलात येतील
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo