पेटंटसाठी पर्यावरणपूरक पॅकेजिंग, फायलींचा अवलंब करून गोदरेज अप्लायन्सेसने जपली वसुंधरेच्या रक्षणाप्रती असलेली आपली वचनबद्धता
शाश्वत पॅकेजिंगच्या वापराने रेफ्रिजरेटर पॅकेजिंगमधून कार्बन फूटप्रिंट 50% कमी करते
~ २०२३-२४ पर्यंत स्वदेशी उत्पादित उपकरणांसाठी १००% हरित पॅकेजिंगचे लक्ष्य
मुंबई, २७ जून २०२२: गोदरेज समूहाची प्रमुख कंपनी असलेल्या गोदरेज आणि बॉयसची व्यवसाय शाखा गोदरेज अप्लायन्सेसने सर्वसामान्यपणे थर्मोकोल या नावाने ओळखल्या जाणार्या एक्सपांडेड पॉलिस्टीरिन फोम (ईपीएस)च्या जागी कागदावर आधारित हनीकोम्ब (एचसी) पॅकेजिंग सोल्यूशन्सच्या वापराला सुरुवात करून वसुंधरेच्या रक्षणाप्रती असलेली आपली वचनबद्धता जपली आहे.
ईपीएस पेट्रोलियम-आधारित प्लास्टिक कंपाऊंड पॉलिस्टीरिनपासून बनवलेले असते. ते जैवविघटनशील नाही आणि वातावरणात त्याचे पूर्णपणे विघटन होण्यास अनेक दशके लागतात. एक पदार्थ म्हणून कागदाला खूप नाजूक मानले जाते परंतु योग्य प्रक्रिया केल्यावर ते वजन धारण करण्याची क्षमता आणि कुशनिंगच्या दृष्टीने ईपीएस आधारित पॅकेजिंगला सर्वोत्तम पर्याय देते. तसेच एचसी पुनर्वापर करण्यायोग्य आणि पर्यावरणास अनुकूल आहे कारण प्रति उत्पादन ४.२ किलोग्रॅम कार्बन डाय ऑक्साईड निर्माण करणाऱ्या ईपीएसच्या तुलनेत एचसी प्रति उत्पादन १ किलोग्रॅम पेक्षा कमी कार्बन डाय ऑक्साईड निर्माण करते. कागदावर आधारित पॅकेजिंगचा उपाय स्वीकारल्याने पॅकेजिंगच्या गुणवत्तेवर परिणाम न करता पर्यावरणावर परिणाम करणाऱ्या ईपीएस रिसायकलिंग आणि पुनर्वापराच्या चिंता दूर होतात.
दोन पॅकेजिंग मटेरियलच्या पर्यावरणीय प्रभावातील फरक दर्शविण्यासाठी गोदरेज अप्लायन्सेसने १०० रेफ्रिजरेटर्सच्या पेपर पॅकेजिंगसह एक प्रयोग केला. ईपीएस च्या विरूद्ध एचसी पेपर पॅकेजिंगमध्ये ग्लोबल वॉर्मिंग ८१ टक्क्यांनी कमी करण्याची क्षमता असल्याचे या अभ्यासातून समोर आले आहे.
यावर भाष्य करताना गोदरेज अँड बॉयसचा एक भाग असलेल्या गोदरेज अप्लायन्सेसचे व्यवसाय प्रमुख आणि कार्यकारी उपाध्यक्ष कमल नंदी म्हणाले, “थर्मोकोलच्या वापरावर आळा घालण्यासाठी सरकारने नियम करण्याआधीच आम्ही २०१९ मध्ये कागदावर आधारित पॅकेजिंग लागू करण्यात आघाडी घेतली होती. कल्पक पर्यावरणपूरक पॅकेजिंग सोल्यूशनचा वापर करण्याबद्दलच्या पेटंटसाठी देखील आम्ही अलीकडेच अर्ज केला आहे. त्याच्या वापरामुळे आम्ही २०२१-२२ मध्ये रेफ्रिजरेटर्समध्ये १००० हून अधिक टनांपासून ५००+ टनांपर्यंत पॅकेजिंग मुळे होणाऱ्या कार्बन फूटप्रिंटमध्ये ५०% पर्यंत घट साध्य करू शकलो आहोत. २०२३-२४ पर्यंत आम्ही आमच्या कारखान्यांमध्ये उत्पादित केल्या जाणार्या रेफ्रिजरेटर्स, वॉशिंग मशीन आणि एअर कंडिशनर्सवर जवळपास १००% हरित पॅकेजिंग अंमलबजावणीचे लक्ष्य ठेवत आहोत.”
गोदरेज अप्लायन्सेसचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान प्रमुख बुर्झिन वाडिया म्हणाले, “गोदरेज अप्लायन्सेस हा व्हाईट गुड्स उद्योगातील पहिला ब्रँड होता ज्याने २०१९ पासून हनीकोम्ब स्ट्रक्चर्ड पेपर पॅकेजिंगचा वापर सुरू केला. प्रति युनिट सर्वाधिक ईपीएसचा वापर होणाऱ्या रेफ्रिजरेटर्स सारख्या मोठ्या आकारातील उपकरणाच्या पॅकेजिंगपासून आम्ही हा प्रवास सुरू केला. झाला. नवीन उपाय बळकट आणि पर्यावरणास अनुकूल अशा दोन्ही गुणांनी युक्त असल्याचे आढळले आहे. ईपीएस (थर्मोकोल) पॅकेजिंगद्वारे निर्माण होणारा कार्बनडाय ऑक्साईड ऑफसेट करण्यासाठी सरासरी २० झाडे आवश्यक आहेत तर केवळ चार झाडे कागदी पॅकेजिंगद्वारे कार्बनडाय ऑक्साईड निर्मितीची भरपाई करतात. त्यामुळे पर्यावरणाशी मैत्र स्थापित होते.”
याव्यतिरिक्त पर्यावरणाप्रती असलेल्या ब्रँडच्या दीर्घकालीन बांधिलकीमुळे २००१ (R600A) मध्येच १००% CFC, HCFC आणि HFC-मुक्त रेफ्रिजरेटर्स तयार करणारी गोदरेज अप्लायन्सेस ही भारतातील पहिली आणि एकमेव कंपनी बनली. हा ब्रँड हरित वायू असलेले एसी बनवणारा भारतातील पहिला ब्रँड बनला ज्यात ओझोन कमी होण्याची शक्यता शून्य असून उद्योगातील सर्वात कमी ग्लोबल वॉर्मिंग संभाव्यता आहे (R290, वर्ष 2012). उत्पादनांच्या पलीकडे वचनबद्धतेचा विस्तार करताना त्यांची दोन्ही उत्पादन युनिट (मोहाली आणि शिरवळ) प्रतिष्ठेच्या सीआयआय द्वारे प्लॅटिनम प्लस ग्रीन को रेटिंग मिळविणारी भारतातील पहिली होती. शिवाय ब्रँड आपले हरित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अथक परिश्रम करत आहे. त्यामध्ये विशिष्ट ऊर्जा वापरामध्ये ६० टक्के घट, ग्लोबल वॉर्मिंगचा सामना करण्यासाठी R290 रेफ्रिजरंटचा वापर, लँडफिलमध्ये शून्य कचरा साध्य करणे, अक्षय ऊर्जा वापरामध्ये ३० टक्के वाढ आणि त्याच्या उत्पादनात पाणी बचत यांचा समावेश आहे.
- वुमन ऑफ इम्पॅक्ट – प्रभावशाली महिलांचा सन्मान
- Grand Success of Sydenham’s Management Conclave 2024
- गोदरेज अँड बॉयसचे मुंबईच्या भूमिगत मेट्रोमध्ये योगदान
- Sydenham College Management Conclave ’24
- आजचे मार्केट अपडेट – 23 ऑगस्ट 2024 – सेन्सेक्स 33 अंकांनी वाढला आणि 81,086 वर बंद झाला: निफ्टी देखील 11 अंकांनी वाढला|Share market news in marathi