फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स क्षेत्रात मोठे बदल अपेक्षित I
फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स क्षेत्रात मोठे बदल अपेक्षित
बिस्कीट , स्नॅक्स, शांपू. कोल्ड ड्रिंक सारख्या फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स क्षेत्रात फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान एकूण उलाढालीत मोठी वाढ झाली आहे. परंतु वार्षिक अहवाल पाहता, एडिबल ऑइल, आटा ,हेअर ऑइल ,डिटर्जेंट विभागात १% ची घट दिसून आली आहे. शाम्पू विभाग १३.६% ,नूडल ३०% ,बिस्कीट १३.३% , स्नॅक्स १४.७% , कोल्ड ड्रिंक ६७% ने वाढले आहेत. सध्या वाढत्या स्पर्धेमुळे कंपन्या किमतीत कमी न करता पॅक साईझ कमी करीत आहेत. याचा परिणाम ग्राहकांना प्रति किलो एफएमसीजी प्रॉडक्ट मागे १०.१% जास्त किंमत द्यावी लागत आहे. आटा व इडिबल ऑइल चे एकूण प्रमाण FMCG क्षेत्रात ४५% आहे. व दोन्ही विभागात महागाई दिसून येत आहे. ITC ,अदानी विल्यम, टाटा कन्झ्युमर यांनी आपला मार्केट शेअर वाढवला आहे. तेलाच्या किमतीत वाढ झाल्याने मागणीत घट झाली असल्याचे या कंपन्यांनी सांगितले.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo