अर्थसंकेत प्रस्तुत डिजिटल इंडिया २०२२ पुरस्कार सोहळा संपन्न I Digital India 2022 Award Ceremony I
अर्थसंकेत प्रस्तुत डिजिटल इंडिया २०२२ पुरस्कार सोहळा संपन्न
अर्थसंकेत प्रस्तुत डिजिटल इंडिया २०२२ चर्चासत्र आणि पुरस्कार सोहळा शुक्रवार २९ एप्रिल २०२२ रोजी मादाम कामा सभागृह, स्वातंत्रवीर सावरकर स्मारक, शिवाजी पार्क, दादर येथे संपन्न झाला.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डी सी बी बँकेचे डिजिटल व टेक्नॉलॉजी विभागाचे प्रमुख श्री प्रसन्न लोहार, एम ई पी एल समूहाचे सर्वेसर्वा श्री सुधीर म्हात्रे उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे माहिती आणि जनसंपर्क विभागाचे माजी संचालक देवेंद्र भुजबळ, डिजिटल बिझनेस कोच श्री जोतिराम सपकाळ व सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे माजी सेक्रेटरी जनरल श्री प्रदीप मांजरेकर उपस्थित होते. अर्थसंकेतचे संस्थापक डॉ अमित बागवे व सह संस्थापक सौ रचना बागवे यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाची निर्मिती झाली आहे.
बेस्ट ऑनलाईन न्यूज पोर्टल ‘हिंदुस्थान पोस्ट’ न्यूज पोर्टल – सल्लागार संपादिका सौ मंजिरी मराठे
बेस्ट डिजिटल न्यूज चॅनेल, ‘कोकण नाऊ’ चॅनल – श्री विकास गावकर
बेस्ट ऑनलाईन इनिशिएटिव्ह इन आंत्रप्रेनरशिप, ‘ऑनलाईन स्वराज्य’ – श्री केतन गावंड
बेस्ट आंत्रप्रेनअर युट्युब चॅनल, ‘प्रोग्रेसिव्ह इंडिया वेब टीव्ही’ – श्री मनीष दळवी
बेस्ट डिजिटल शेअर मार्केट अकॅडेमी, ‘शंभूराज खामकर ट्रेडिंग अकॅडेमी’ – श्री शंभूराज खामकर
बेस्ट बिझनेस कोच पुरस्कार – श्री दिनेश सिंघल
बेस्ट क्रिएटिव्ह मार्केटिंग एजेन्सी, मैत्र एंटरटेनमेंट – श्री विनय शिंदे
बेस्ट डिजिटल न्यूजपेपर, समृद्ध व्यापार – श्री दत्तात्रय परळकर यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
अर्थसंकेतचे संस्थापक डॉ अमित बागवे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली व बदलत्या तंत्रज्ञानाची कास धरून आयुष्यात पुढे जाण्याची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी मांडले. अर्थसंकेत हे मराठीतील पहिले व एकमेव व्यावसायिक वर्तमानपत्र आहे व त्याच्या अंतर्गत आम्ही गेली ८ वर्षे विविध कार्यक्रम करीत असतो. मराठी उद्योजकांना हक्काचे व्यासपीठ देण्याचे काम अर्थसंकेत प्रामाणिकपणे करीत आहे. आम्ही कर्जबाजारी होऊन समाजासाठी हे कार्य करीत आहोत. उद्दिष्ट हेच आहे कि समाजाची प्रगती व्हावी असेही ते म्हणाले
इंडस्ट्री ४.० व नवनवीन तंत्रज्ञान याबद्दलचे मार्गदर्शन प्रमुख पाहुणे डी सी बी बँकेचे डिजिटल व टेक्नॉलॉजी विभागाचे प्रमुख श्री प्रसन्न लोहार यांनी केले.
प्रमुख पाहुणे एम ई पी एल समूहाचे श्री सुधीर म्हात्रे यांनी तंत्रज्ञानाशी मैत्री न केल्यामूळे उद्धवस्त झालेल्या उद्योगांची उदाहरणे दिली व पुढील आयुष्यात सतत बदलत राहणाऱ्या तंत्रज्ञानासोबत बदलत राहण्याची गरज व्यक्त केली.
आजवर वर्तमान पत्र आणि वृत्तवाहिन्या यांनाच शासकीय मान्यता मिळत आहेे, त्याअनुषंगाने त्यांना विविध सवलती दिल्या जातात, मात्र सध्याच्या डिजिटल युगात अनेक डिजिटल माध्यमे सक्षमपणे कार्यरत आहेत. त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शासनाची मान्यता मिळाली तर त्यांची ताकद आणखी वाढेल, शासकीय जाहिराती मिळाल्याने त्यांचा विकास होईल. त्यामुळे अशा प्रकारे विविध डिजिटल माध्यमांचे आता संघटन होणे गरजेचे आहे, असा विचार महाराष्ट्र राज्याचे माहिती आणि जनसंपर्क विभागाचे माजी संचालक देवेंद्र भुजबळ यांनी मांडले.
तुमच्याकडे असलेले कोणत्याही विषयाचे ज्ञान तुम्ही सोशल मीडियाच्या व्यासपीठावर प्रसारित केले तरी तुम्ही पैसे कमवू शकता, असे जोतिराम सपकाळ म्हणाले.
सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे माजी सेक्रेटरी जनरल श्री प्रदीप मांजरेकर यांनी ‘कोस्टल कोकण’ या त्यांच्या नवीन डिजिटल व्हेंचरची माहिती उपस्थितांना दिली.
अर्थसंकेतच्या सह संस्थापक सौ रचना बागवे यांनी आभार प्रदर्शन केले.
प्रत्येक व्यवसाय तसेच प्रत्येक सेवा ई कॉमर्स या नव्या पद्धतीत बदलता येऊ शकते. सोशिअल मीडियाच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचता येते अगदी मोफत. इंडस्ट्री ४.० म्हणजे काय ? डिजिटल इंडिया म्हणजे नक्की काय ? तंत्रज्ञानात झपाट्याने होत असलेले बदल काय आहेत ? सध्या आपण करीत असलेल्या नोकरी व व्यवसायावर बदलत्या तंत्रज्ञानामुळे काय परिमाण होणार आहे ? अशा विविध विषयांवर यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo