युट्युबवर प्रादेशिक भाषेतील व्हिडीओ पाहण्याला पसंती – युट्युब चॅनेलमुळे लाखोंची कमाई
युट्युबवर प्रादेशिक भाषेतील व्हिडीओ पाहण्याला पसंती – युट्युब चॅनेलमुळे लाखोंची कमाई
मनोरंजनापासून ज्ञान मिळविण्यापर्यंत सर्व पर्याय सहज उपल्बध असल्यामुळे युट्युब पाहण्याचे प्रमाण दिवसें दिवस वाढत आहे.
तीन पैकी दोन वापरतकर्ते प्रादेशिक भाषेत व्हिडीओ पसंत करतात.
प्रादेशिक भाषांत अपलोड केल्या जाणाऱ्या चित्रफीती यूट्युबवर पाहण्याचे प्रमाण वाढले असल्याचे नोंदविण्यात आले आहे.
स्मार्टफोन व सहज उपलब्ध होणारे इंटरनेट यामुळे अनेकजण युट्युब चॅनेल सुरु करीत आहेत व त्यातून अर्थार्जन सुद्धा करीत आहेत. अनके युट्युब चॅनेल्स हजारो ते लाखो रुपये या चॅनेल च्या माध्यमातून कमवीत आहेत.
पर्यटन, तंत्रज्ञान, उद्योजकता, पाककला, कार्स, मोबाईल, चित्रपट तसेच गाणी व अशा विविध विषयांवर प्रादेशिक भाषेत युट्युब चॅनेल सुरु करून अनेक जण पैसे व प्रसिद्धी मिळवत आहेत.
युट्युब चॅनेलवरील व्हिडीओवर येणाऱ्या जाहिराती, अफिलिएट मार्केटिंग तसेच स्पॉन्सरशिप यामुळे महिना लाखो रुपये कमविण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
प्रादेशिक भाषांना मिळणारा प्रतिसाद पाहून यूट्युबने सहा प्रादेशिक भाषांत जाहिराती देण्यास सुरुवात केली आहे.