आर्थिक नियोजन न करण्याची कारणे ! – डॉ अमित बागवे
आर्थिक नियोजन न करण्याची कारणे ! – डॉ अमित बागवे
१. आर्थिक नियोजन कळत नाही !
प्रसार माध्यमे व इंटरनेट सर्वत्र आर्थिक नियोजनाचा बोलबाला असताना, तुम्ही अजूनही आर्थिक नियोजनापासून दूरच आहात का ?
उशिरा का होईना आर्थिक नियोजनाला सुरुवात करणे आवश्यक आहे !
आर्थिक नियोजनात खालील प्रकार येतात.
१. गुंतवणूकीचे नियोजन
२. निवृत्तीचे नियोजन
३. मुलांचे भविष्य नियोजन
४. कर नियोजन
५. जोखीम व विमा नियोजन
६. संपत्ती नियोजन
२. कळते पण वळत नाही !
आर्थिक नियोजनाची गरज मला काय ? असा प्रश्न नेहमीच सगळ्याना पडत असतो.
आर्थिक नियोजनाचा उपयोग काय आहे ? हे समजून घेणे आवश्यक आहे !
३. आर्थिक नियोजन हि श्रीमंतांची मक्तेदारी !
ज्यांच्याकडे भरपुर पैसे आहेत, त्यांनीच आर्थिक नियोजन करावे, असा एक गैरसमज आहे.
मुळात “ भरपुर पैसे कमविण्यासाठी आर्थिक नियोजन करावे लागते ”, हेच आपल्याला कळत नाही.
श्रीमंत व्यक्ती आर्थिक नियोजन करूनच श्रीमंत झालेली असते व आर्थिक नियोजनाच्या माध्यमातूनच आपली श्रीमंती टिकवून असते !
४. आर्थिक नियोजन केले आहे !
बँकेत मुदत ठेव किंवा एखादा विमा काढणे म्हणजे आपले आर्थिक नियोजन झाले असे आपल्याला वाटते !
“ आर्थिक नियोजन म्हणजे संपूर्ण आयुष्याचे नियोजन असते ”
आर्थिक नियोजन हे वर्तमान काळापासून भविष्य काळापर्यंत करावे लागते, तसेच आर्थिक नियोजनात जोखिमेपासुन सुरक्षितता या सर्वांचे व्यवस्थापन करावे लागते !
५. गुंतवणूक म्हणजे आर्थिक नियोजन !
फक्त गुंतवणूक करणे म्हणजे आर्थिक नियोजन नव्हे , आर्थिक नियोजनात भविष्य काळाची तरतूद तसेच जोखमीचे व्यवस्थापनही करावे लागते !
“ गुंतवणूक करणे व योग्य वेळी गुंतवणूक सोडविणे महत्वाचे असते ”
६. आपत्कालीन परिस्थिती हाताळणे सोप्पे !
कधीच वाईट परिस्थितीला सामोरे जावे लागणार नाही, असे नेहमीच आपल्याला वाटत असते ! त्यामुळे आपण कधीही जोखमीचे व्यवस्थापन करीत नाही
व आपला असा एक “ दुराग्रह ” असतो की, आपण आपत्कालीन परिस्थिती सहज हाताळू शकतो !
आपत्कालीन परिस्थिती ही वेगवेगळ्या प्रकारची असू शकते, जसे की, नोकरी जाणे, व्यवसायात नुकसान होणे, खुप मोठा आजार अचानक उद्भवणे, मृत्यू !
त्यामुळे, प्रत्येक परिस्थितीला वेगवेगळ्या पद्धतीने हाताळावे लागते !
७. आजचे मरण उद्यावर !
“ उद्या पासून सुरुवात करू ” , असे म्हणत आपण कधीच सुरुवात करत नाही !
गुंतवणूक हि नेहमी जितक्या लवकर सुरु करता येईल तितक्या लवकर सुरु करणे आवश्यक आहे !
लवकर सुरुवात करण्याचा फायदा म्हणजे आपल्याला जास्त वेळ मिळतो. तहान लागल्यावर विहीर खणणे हा मूर्खपणा आहे !
कृपया आपल्या प्रतिक्रिया खाली नक्की नोंदवा. धन्यवाद.