४ निफ्टी कंपन्या दुसऱ्या तिमाहीत नफ्यात १०० ते ८००% ची उसळी घेण्यास सज्ज I Nifty Shares to soar 100% to 800% I

४ निफ्टी कंपन्या दुसऱ्या तिमाहीत नफ्यात १०० ते ८००% ची उसळी घेण्यास सज्ज.

विविध ब्रोकरेज कंपन्यांनी दर्शवलेल्या अंदाजानुसार, सप्टेंबर तिमाहीत निफ्टी ५० मधील कंपन्या २५ ते ३७ टक्के नफा वाढ करतील . परंतु त्यातील किमान चार कंपन्या तिमाहीत दुप्पट नफा मिळवण्याची शक्यता आहे .

सिमेंट उत्पादक ग्रासिम इंडस्ट्रीज, स्टील उत्पादक जेएसडब्ल्यू स्टील आणि टाटा स्टील आणि ज्वेलरी उत्पादक टायटन कंपनी या त्या कंपन्यांपैकी आहेत जे दुसऱ्या तिमाहीत नफ्यात १०० ते ८०० टक्के वाढ नोंदवू शकतात, असे मोतीलाल ओसवाल सिक्युरिटीजने एका नोटमध्ये म्हटले आहे. ऍक्सिस बँक, इंडसइंड बँक, बजाज फायनान्स, हिंडाल्को आणि ओएनजीसी या काही इतर निफ्टी ५०कंपन्या आहेत ज्या सप्टेंबर तिमाहीच्या नफ्यात ५० टक्क्यांहून अधिक वाढ करू शकतात.

टायटनच्या बाबतीत, एम्के ग्लोबलला अपेक्षित आहे की ते रु. ५५०/-कोटी रुपयांचा नफा मिळवतील. मागील वर्षी हि रक्कम रु. १९९/- करोड होती. टाटा समूहाच्या फर्मने जुलै-सप्टेंबरच्या कालावधीत दागिन्यांच्या व्यवसायात ७८ टक्के वार्षिक वाढ आणि चष्मे आणि घड्याळे आणि इतर अशा दोन्ही विभागात ७४ टक्के वाढ झाल्याचे म्हटले आहे.

मोतीलाल ने दिलेल्या अंदाजनुसार ,टायटन ला ५२९/- करोड चा नफा अपेक्षित आहे. तर ग्रासिम कंपनीला रु.९६६/- करोड चा नफा होईल असा अंदाज वर्तवला आहे.

सप्टेंबरच्या तिमाहीत सिमेंटच्या किंमती क्रमश: मंदावल्या, परंतु वार्षिक आधारावर जास्त राहिल्या कारण कंपन्यांनी वाढत्या इनपुट खर्चाचा सामना करण्यासाठी मार्च अखेर व २०२२ च्या पहिल्या तिमाहीत किंमती वाढवल्या होत्या.

“सिमेंट कंपन्यांनी वाढत्या इनपुट खर्च कमी करण्यासाठी दुसऱ्या तिमाहीत किंमती आणखी वाढवण्याचा प्रयत्न केला पण मागणीत घट दिसली.” असे एक्सिस सिक्युरिटीजने सांगितले.

मोतीलालच्या अंदाजानुसार, मेटल कंपन्या सप्टेंबर तिमाहीत वाढत्या नफ्यात ६० टक्के, तंत्रज्ञान १९ टक्के आणि खासगी बँका १३ टक्के योगदान देतील.

“जेएसडब्ल्यू स्टील, टाटा स्टील, ओएनजीसी, रिलायन्स आणि एसबीआय दुसऱ्या तिमाहीत निफ्टीच्या वाढीव नफ्यात ८० टक्के योगदान देण्याची शक्यता आहे

nifty companies
nifty companies

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindlehttps://amzn.to/2ZL9m8R

Dr Amit Bagwe Share Market 7
Dr Amit Bagwe Share Market 7

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *