सार्वभौम सुवर्ण रोख्यांची बारावी मालिका १ मार्चला खुली होणार I Gold Bond Series XII will be open for Investment on 1st March 2021 I

सार्वभौम सुवर्ण रोख्यांची बारावी मालिका १ मार्चला खुली होणार

सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी

सार्वभौम सुवर्ण रोख्यांची बारावी मालिका १ मार्चला खुली होणार असून ५ मार्च पर्यंत गुंतवणूक करण्याची संधी उपलब्ध आहे. सुवर्णरोख्यां मध्ये गुंतवणुकीचा एकूण कालावधी आठ वर्षांचा असून पाचव्या वर्षापासून रोख्यांची विक्री करता येते. हे सुवर्णरोखे शेअर बाजारात सूचिबद्ध असणार आहेत.

रोख्यांमध्ये गुंतवणुकीसाठी प्रती ग्रॅम ४६६२ रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. तसेच सुवर्ण रोख्यांसाठी जर गुंतवणूकदार ऑनलाईन अर्ज करतील तसेच जे गुंतवणूकदार डिजिटल माध्यमातून खरेदी करतील त्यांना प्रती ग्राम ५० रुपये सवलत देण्यात येणार आहे. डिजिटल माध्यमातून खरेदी वर्ण रोख्यांची किंमत ४६१२ रुपये प्रति ग्राम सोने अशी ठेवण्यात आली आहे.

सार्वभौम सुवर्णरोखे योजनेच्या विक्री किमंतीवर दर वर्षी २.५० टक्के दराने निश्चित व्याज मिळते. व्याजाची रक्कम दर सहा महिन्यांनी गुंतवणूकदाराच्या खात्यात जमा केली जाते.

नॅशनल स्टॉक एक्स्चेंज व बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज तसेच जवळपास सर्व राष्ट्रीयकृत बँकांतून व पोस्ट ऑफिस मधून हे सुवर्ण रोखे खरेदी करता येतील. किमान एक ग्रॅम सोन्याच्या युनिटमध्ये तर कमाल चार किलो सोन्याच्या युनिटमध्ये गुंतवणूक करता येईल.

Gold bond series XII
Gold bond series XII 2021 on 1st march

मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने रायगडावर पुस्तक प्रकाशन I लोकप्रिय ब्रँड कसा बनवावा भाग २ I

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *