श्री आशिष संकपाळ यांचा ‘युवा उद्योजक’ पुरस्काराने सन्मान I Young Entrepreneur Mr Ashish Sankpal I
श्री आशिष संकपाळ यांचा ‘युवा उद्योजक’ पुरस्काराने सन्मान I Young Entrepreneur Mr Ashish Sankpal I
अर्थसंकेत प्रस्तुत अर्थ साक्षर पुरस्कार २०२० सोहळा बुधवार २३ डिसेंबर २०२० रोजी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज येथे संपन्न झाला. कार्यक्रमात श्री आशिष संकपाळ यांचा ‘युवा उद्योजक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बी एस ई इन्व्हेस्टमेंटचे व्यवस्थापकीय संचालक श्री शंकर जाधव, अर्थसंकेतचे डॉ अमित बागवे व सौ रचना बागवे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सामान्य माणसाला राहत्या घरात येणाऱ्या पाण्याच्या गळतीच्या समस्या ही आजकाल नित्याचीच बाब आहे. त्यांचा हा जटील प्रश्न अभ्यासपुर्वक, त्वरीत, कायमचा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सोडवण्यासाठी Waterproof Solutions या firm ची निर्मीती श्री. आशिष रामचंद्र संकपाळ ( B.E.civil ) यांनी केली. त्यांनी शिक्षण हे college of engineering, pune येथून पुर्ण करून waterproofing या विषयात सखोल अभ्यास केला.
गेली २० वर्षे या व्यवसायात त्यांनी उत्तरोत्तर प्रगती करून Waterproof Solutions ही संस्था पुणे जिल्ह्यात नावारुपाला आली आहे.
‘विश्वासाचे दुसरे नाव’ Waterproof Solutions हे ब्रीदवाक्य समोर ठेवून residential, commercial आणि इंडस्ट्रीयल क्षेत्रात भरपूर असे काम waterproof solutions ने केले आहे.
Under construction projects आणि maintenance या दोन्ही आघाड्यांवर त्यांची team कार्यरत आहे.
Waterproof solutions या संस्थेला Iso 9001 :20015 आणी 14001 : 2015 हा पुरस्कार २०१४ ला प्राप्त झाला आहे.
आजवर जवळजवळ १००० गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये त्यांनी waterproofing चे काम यशस्वीरित्या केले आहे.
पुणे शहरात ३ शाखा आहेत तेथून ते संबंधीत ग्राहकांपर्यंत त्वरीत पोहोचुन आपली सेवा देण्याचा अविरत प्रयत्न करतात .
अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे ! मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र