विश्वासाने हरवले आणि जिंकविले देखील I सौ पूनम राणे यांच्या यशाची कथा – अर्थसंकेत यशोगाथा I Mrs Poonam Rane Success story I

“विश्वासाने हरवले आणि जिंकविले देखील”

सौ पूनम राणे यांच्या यशाची कथा – अर्थसंकेत यशोगाथा I

विश्वास हा एक छोटासा शब्द आहे, पण त्यामध्ये खूप जास्त ताकत आहे. विश्वासामुळे नाती टिकतात आणि विश्वासामुळेच आपण बरेच काही मिळवू शकतो.

ह्याच विश्वासाच्या दोन गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे.

पुरुषोत्तम राणे या सद्गृहस्थाने आपल्या मित्राच्या बोलण्यावर विश्वास ठेवून व्यवसाय सुरू करण्यासाठी स्वतःच्या नावावर २५ लाखाचे कर्ज घेतले आणि फ्लेक्स प्रिंटिंग मशीन घेतली. एकत्र व्यवसाय करण्याचे ठरविले. काही काळ व्यवसाय नीट चालला. मग अचानक एके दिवशी मित्राने विश्वास तोडला आणि पुरुषोत्तम यांच्या डोक्यावर कर्ज करून गेला. २००६ साली बँकेचा हफ्ता ४०,००० रुपये इतका होता आणि कामगारांचे पगार आणि इतर भांडवलाचा मिळून साधारण महिना १ लाख खर्च होत असे. पुरुषोत्तम हे इंडियन ऑईल कंपनी मध्ये काम करीत होते आणि त्यामुळेच त्यांना बँकेकडून इतके कर्ज घेता आले. त्यांच्या डोक्यावर कर्जाचे हफ्ते, कामगारांचा पगार आणि इतर खर्चाचा डोंगर रचला गेला. त्यांच्या पगारातून घर खर्च आणि व्यवसायाचा खर्च त्यांना पेलवेना. मानसिक त्रासाबरोबर त्यांना आर्थिक हानी देखील झाली होती.

आता पुढे काय करायचे असा मोठा प्रश्न त्यांच्या समोर होता. अशा वेळेस त्यांची पत्नी सौ पूनम राणे यांनी त्यांना मोलाची साथ दिली. इथे पुरुषोत्तम यांनी मित्रावर विश्वास ठेवून सर्व गमविले होते. पण त्यांची पत्नी ह्याच विश्वासाला आपले शस्त्र बनवून रणसंग्रामात उतरली. @अर्थसंकेत यशोगाथा

सौ पूनम राणे ह्यांचा जन्म २० डिसेंबर १९६८ साली मुंबई इथे झाला. पूनम यांना लहानपणापासूनच नवीन गोष्टी शिकण्याची हौस. म्हणून शिक्षणानंतर त्यांनी १० -१५ ठिकाणी नोकरी केली, त्याच बरोबर MPSC ची परीक्षा उत्तीर्ण करून सेशन कोर्टात कामाला लागल्या. चांगल्या सरकारी नोकरीत काम करीत होत्या पण मध्येच त्यांच्या आयुष्यात हा प्रसंग घडला आणि त्यांना आयुष्यातला मोठा निर्णय घ्यावा लागला. स्वतःवर आणि साईबाबांवर अतूट विश्वास ठेऊन त्यांनी सरकारी नोकरी सोडली. संपूर्ण वेळ प्रिंटिंगचा व्यवसाय करायचा असं त्यांनी ठरवलं. हा निर्णय घेत असताना अनेकांनी त्यांना वेड्यात काढलं, इतकी सोन्यासारखी नोकरी सोडून बुडालेला व्यवसाय करायचा म्हंटले, तर तो खरेच एक वेडेपणा होता. पण त्यांना स्वतच्या कुटुंबाला ह्या आर्थिक संकटातून बाहेर काढायचे होते. त्याकरीता त्या काहीही करायला तयार होत्या.

पुरुषप्राधन असलेल्या ह्या शेत्रात त्यांना जम बसवण्यासाठी स्वतः वर बरीच मेहनत घेतली. त्यांचा पेहराव, बोलचाल त्यांनी बदल्ली. कंपनी हातात घेतल्यावर त्यांच्या मेहनतीमुळे अवघ्या २ वर्षातच सर्व कर्ज फेडून टाकले. हे काम करत असताना त्यांना बरेच चांगले वाईट अनुभव आले.

एक मराठी स्त्री ह्या शेत्रात काम करते म्हणून काही लोकांनी त्यांच्या कामावर अविश्वास दाखविला. तर काही लोकांनी त्या काम करत आहेत म्हणून त्यांचे कौतुक केले आणि प्रोत्साहन दिलं. २००९ साली साम टीव्ही वर त्यांची मुलाखत झाली तेव्हा त्यांना त्या मुलाखतीचा खूप फायदा झाला. अनेक लोकांचे फोन- मेसेज त्यांना आले आणि त्यातून व्यवसाय वाढला. @अर्थसंकेत यशोगाथा

गेल्या १५ वर्षात त्यांनी अनेक कामं केली आहेत, मोठमोठ्या कंपनीचे टेंडर्स त्यांनी मिळविले. हिंदुस्थान पेट्रोलियम, इंडियन ऑइल आणि एअर इंडिया सारख्या मोठ्या कंपनीचे ते व्हेंडर आहेत. प्रिंटिंग क्षेत्रातल्या तांत्रिक गोष्टी त्या शिकल्या. ह्या सगळ्या संकटांना त्या अगदी विश्वासाने सामोरे गेल्या आणि ह्याच विश्वासाने आज त्या करोडो रुपयांचा व्यवसाय करत आहेत. सध्या त्यांच्याकडे एच पी लॅटेक्स मशीन आहे ज्यात इकोफ्रेंडली आणि वॉशेबल कार्टेज आहेत. संपूर्ण दुकानाचे ब्रॅंडिंग करण्यासाठी यातील प्रिंटचा वापर करता येतो. ३६० मिडिया प्रिंट केले जातात. कॅनव्हास, विनायल विथ सनबोर्ड, स्टारफ्लेक्स, सॅटिन क्लॉथ, रेगझिन्स, ग्लास फिल्म्स असे विविध प्रकारचे प्रिंटिंग करण्याचे काम त्या करीत आहेत.

ह्या कामात त्यांना चांगली साथ मिळाली ती त्यांच्या पती आणि मुलाची. त्यांचा २५ वर्षाचा तरुण मुलगा सुयश राणे गेली ६ वर्षे त्यांच्या बरोबरीने काम करतोय. तो मेकॅनिकल इंजिनिअर असून त्याला नवीन तंत्रज्ञानाची आवड आहे. सुयश हा त्याच्या आईप्रमाणेच बोलका आहे आणि त्याच्या प्रेमळ बोलण्यामुळे तो सर्व ग्राहकांचे मने जिकंतो. एक्रेलिक बोर्ड करण्यामध्ये सुयश राणे मातब्बर आहे.

आज ‘प्रद्युम्न डिजिटल वर्ल्ड’ला १५ वर्ष पूर्ण झाली आहेत आणि त्यांच्या उत्तम दर्जाच्या कामामुळे त्यांनी त्यांच्या ग्राहकांचा विश्वास कमावला आहे. याच विश्वासाने सौ पुनम पुरुषोत्तम राणे यांना आज एक यशस्वी उद्योजिका बनवलं आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क – +919820722406

Website – http://www.pradyumnadigitalworld.com/

Email id – pradyumnadw@gmail.com

Facebook – https://www.facebook.com/pradyumnadw2025/

Instagram – @pradyumna_dw

शब्दांकन – सौ रचना लचके बागवे (८०८२३४९८२२)

Success Story of Poonam Rane
Success Story of Poonam Rane

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R

Sarjerao Yadav
Sarjerao Yadav
Avadhut sathe youtube
Avadhut sathe youtube

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *