लिजंड हिप्नोटिस्ट द ग्रेट मनोहर नाईक सर – संमोहन शास्त्रातील बादशहा I Legend Hypnotist Manohar Naik Sir I
लिजंड हिप्नोटिस्ट द ग्रेट मनोहर नाईक सर – संमोहन शास्त्रातील बादशहा
महाराष्ट्रात किंवा तसे पाहायला गेले तर भारतामध्ये” हिप्नॉटिझम ” किंवा संमोहनशास्त्र म्हटले की एक नाव पुढे येतेच येते..ते म्हणजे संमोहन शास्त्रातील बादशहा.. लिजंड हिप्नोटिस्ट द ग्रेट मनोहर नाईक सर.. सरांबद्दल बोलायचं तर 10 मार्च 1949 ला कोकणात वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा या गावी सरांचा जन्म झाला…
घरची गरिबी असल्यामुळे सतत काम व नोकरी करून त्यांनी आपले एम ए पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले… त्यानंतर सुरुवातीला गोरेगाव मुंबई येथील नंदादीप शाळेत क्लार्क म्हणून त्यांनी नोकरी केली. पुढे शिक्षण पूर्ण झाल्यावर ते एस एन डि टी विद्यापीठ व पिंगेज क्लासेस मुंबई.. येथे मानसशास्त्राचे प्राध्यापक म्हणून ते रुजू झाले….
लहानपणापासूनच त्यांना अध्यात्म , मानसशास्त्र जादू व संमोहन या कलांची आवड होती.. त्यांनी १४ व्या वर्षापासून संमोहन शास्त्र शिकण्यास सुरुवात केली व त्या साठी वेगवेगळे गुरू हि केले..
ते वयाच्या 18 व्या वर्षापासून स्वतः संमोहन शास्त्राचे स्टेज शो करू लागले… १९९० मध्ये त्यांनी नोकरीतून वोलेंटरी रिटायरमेंट घेतली व पूर्णवेळ संमोहन शास्त्राच्या प्रसारासाठी संमोहन शिबिर , हिप्नॉटिझम प्रशिक्षण वर्ग , तसेच हिप्नॉटिझम स्टेज शो यांचे आयोजन सुरू लागले,, त्याला लोकांचा उस्फुर्त व भरपूर प्रतिसाद मिळू लागला,,,
1966 मध्ये त्यांनी पहिला स्टेज शो केला व फेब्रुवारी 2020 मध्ये वयाच्या एकत्तराव्या वर्षी कोरोना लॉक डाऊन च्या अगोदर.. फाईन आर्ट चेंबूर हॉलमध्ये त्यांनी आपल्या आयुष्यातील शेवटचा स्टेज शो केला… या पंचावन्न वर्षात त्यांनी सहा हजार पेक्षा जास्त स्टेज शो ( सम्मोहन कार्यक्रम ) सादर केले.. 2200 पेक्षा जास्त स्टेज शोज. रीतसर तिकीट विक्री करून हॉल मध्ये सादर केले..
कार्यक्रम ,स्टेज शो शिबिराच्या निमित्ताने त्यांनी अमेरिका,,थायलंड,सिंगापूर, दुबई,शारजा,मलेशिया,येथे परदेश दौरे केले.. तसेच भारतातील जवळजवळ सगळ्या मोठ्या शहरात व राज्यात.. व महाराष्ट्रातील जवळजवळ प्रत्येक तालुक्यात व गाव पातळीवरही त्यांनी संमोहन शो सादर केले…
शिवाय देशात व देशाबाहेरही त्यांनी संमोहन प्रशिक्षण वर्ग घेतले.. त्यांचे हजारो संमोहन शिष्य संपूर्ण भारतभर पसरलेले आहेत….. त्यांनी संमोहन शास्त्र, मानसशास्त्र, अध्यात्म व योगशास्त्र या विषयावर पंचेचाळीस पुस्तक लिहिली.. यातील काही पुस्तके बेस्टसेलर असून त्याच्या एक लाखापेक्षा जास्त प्रती विकल्या किंवा वितरित केल्या गेल्या.. तसेच त्यांच्याकडे संमोहन शास्त्र शिकलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांना संमोहन शास्त्रात आलेल्या अनुभूती वर सात पुस्तके प्रकाशित केलीत अशा हे थोर व अवलिया व्यक्तिमत्त्व.. १९ ऑक्टोबर २०२० रोजी स्वर्गवासी झाले
श्री विकास मनोहर नाईक संपर्क – 7021536949
शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R