युनिअन बँकेला रु. १४४०/- कोटींचा नफा I Union Bank profit of Rs. 1440/- Crore I
युनिअन बँकेला रु. १४४०/- कोटींचा नफा
युनिअन बँकेला निव्वळ नफ्यात ८% ची वाढ
सरकारी मालकीच्या युनिअन बँक ऑफ इंडिया ने दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०२२ अखेर तिमाहीत बँकेला रु. १४४०/- कोटींचा निव्वळ नफा झाला असून त्यात ८.३% ची वाढ झाली आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १३३०/- कोटी होती.निव्वळ व्याज मार्जिन ३७ बेसिस पॉईंट ने वाढले असून २.७५% आहे. निव्वळ व्याज उत्पन्न २५.३% ने वाढले असून रु. ६७६९/- कोटी आहे. ऑपरेटिंग नफा ११.३% ने वाढला असून रु. ५५३०/- कोटी आहे. तरतुदीत १२.४% ची वाढ झाली असून रु. ४०८१/- कोटी आहे. लोन बुक मध्ये ९.६% ची वाढ झाली असून रु. ७.१६/- लाख कोटी आहेत.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo