युनायटेड ब्रुवरीजला रु. १६३/- कोटी नफा I United Breweries profit of Rs. 163/- Crore I
युनायटेड ब्रुवरीजला रु. १६३/- कोटी नफा
युनायटेड ब्रुवरीजला चौथ्या तिमाहीत निव्वळ नफ्यात ६७.९% ची वाढ
बिअर निर्माण करणारी कंपनी युनायटेड ब्रुवरीज ने दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०२२ अखेर चौथ्या तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात ६७.९२% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. १६३.७८/- कोटी आहे. मागील वर्षी जानेवारी- मार्च तिमाहीत कंपनीला रु.९७.५३/- कोटी चा निव्वळ नफा झाला होता. ऑपरेटिंग महसुलात १.२८% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ३६६४.७१/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ३६१८.०९/- कोटी होती. माल्ट, पॅकेजिंग मटेरियल , क्रूड ऑइल च्या महागाईमुळे एकूण मार्जिन मध्ये मागील वर्षीचे तिमाहीचे तुलनेत ३३० बेसिस पॉईंट ने घट झाली आहे. प्रॉडक्ट किमतीत वाढ करण्याच्या विचारात असल्याचे कंपनीने सांगितले. कंपनीला एकूण खर्चात १.०७% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ३४५८.९८/- कोटी आहे. मार्च २०२२ अखेर आर्थिक वर्षात कंपनीला एकत्रित निव्वळ नफ्यात तिपटीने वाढ झाली असून हि रक्कम रु. ३६६.०८/- कोटी आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo