भारतीय रेल्वेची डिसेंबरमध्ये ११ हजार ७८८ कोटींची कमाई
भारतीय रेल्वेची डिसेंबरमध्ये ११ हजार ७८८ कोटींची कमाई
डिसेंबर २०२० मध्ये भारतीय रेल्वेने ११८.१३ दशलक्ष टन मालवाहतूक केली आहे. या काळामध्ये रेल्वेने माल वाहतुकीतून ११७८८.११ कोटींचे उत्पन्न मिळवले.
मालवाहतुकीच्या भाडेवृद्धीसाठी संस्थात्मक सुधारणाही केल्या जात आहेत तसेच उद्योजकांना रेल्वेच्या मालवाहतुकीकडे आकर्षित करण्यासाठी सरकारकडून विविध सवलतीही दिल्या जात आहेत.
रेल्वे व्हिजननुसार २०२४ पर्यंत माल वाहतूक २०२४ दशलक्ष टनापर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. २०१९ मध्ये रेलवेकडून १२१० दशलक्ष टन मालाची वाहतूक करण्यात आली होती.
रेल्वे व्हिजन २०२४ साठी २.९ लाख कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
कोरोना लॉकडाउनच्या काळात भारतीय रेल्वेने मालवाहतुकीचे अनेक विक्रम मोडले आहेत.

रेल्वेने नव्या धोरणानुणार मुख्य शहरांना जोडणाऱ्या ११ हजार किलोमीटर लांबीच्या स्वतंत्र रेल्वे मार्गाच्या उभारणीला संमती दिली आहे. २ लाख २२ हजार वाघिणींची क्षमता वाढविण्यात आली आहे.
अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे ! मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र