भारतातील छोट्या व्यापाऱ्यांना आर्थिक व डिजिटल दृष्ट्या सक्षम बनवणार I Snapbizz I
भारतातील छोट्या व्यापाऱ्यांना आर्थिक व डिजिटल दृष्ट्या सक्षम बनवणार
स्नॅपबिझ, संहिता-सीजीएफ्स रिव्हाइव्ह अलायन्स व नेल्सन भारतातील छोट्या व्यापाऱ्यांना आर्थिक व डिजिटल दृष्ट्या सक्षम बनवणार
भारत, १२ मे २०२१: भारतातील छोट्या व्यापाऱ्यांच्या महत्त्वाकांक्षांना बळ देण्यासाठी आणि देशात सुरु असलेल्या डिजिटायझेशन अभियानाचे लाभ मिळवण्यात त्यांना मदत करण्यासाठी स्नॅपबिझ – भारतातील आघाडीची रिटेल डिजिटायझेशन कंपनी, संहिता-सीजीएफ्स रिव्हाइव्ह अलायन्स – कोविड-१९मुळे नुकसान सहन करावे लागत असलेल्या असंघटित कामगार व उद्योजकांना पुन्हा उभे करणारी संयुक्त आर्थिक संघटना, नेल्सन – जागतिक पातळीवरील संशोधन व माहिती विश्लेषक कंपनी आणि आघाडीच्या राष्ट्रीय बँका छोट्या किराणा व इतर रिटेलर्सचे डिजिटायझेशन करत आहेत. छोट्या किराणा व्यापाऱ्यांना आपल्या व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये व व्यवसायाच्या लाभदायिकतेमध्ये सुधारणा घडवून आणता यावी यासाठी डिजिटल उपकरणे व पद्धती यांचा स्वीकार करण्यात मदत व्हावी हा त्यांचा उद्देश आहे.
या संयुक्त उपक्रमाची सुरुवात एका चाचणीपासून करण्यात आली असून पुढे याचा महत्त्वाकांक्षी विस्तार करण्याची योजना आहे. नेल्सन, टर्रेन (ट्रस्ट फॉर रिटेलर्स अँड रिटेल असोसिएट्स ऑफ इंडिया), मायकेल अँड सुसान डेल फाऊंडेशन (एमएसडीएफ), युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट (युएसएआयडी), ब्रिटिश हाय कमिशन, नवी दिल्ली आणि युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रॅम (युएनडीपी) या लक्षणीय लोकोपकारी, विकास व कॉर्पोरेट संघटनांनी या उपक्रमाला समर्थन दर्शवले आहे.
दर महिन्याला २० ते २५ हजारांचे निव्वळ उत्पन्न असलेल्या अल्प उत्पन्न वर्गातील छोट्या व स्थानिक व्यापाऱ्यांना खेळते भांडवल सहजपणे उपलब्ध व्हावे व पुरवठा शृंखलेत भेडसावणारी आव्हाने दूर करता यावीत हे या उपक्रमाचे लक्ष्य आहे. दहा लाख छोट्या व्यापाऱ्यांचे डिजिटायझेशन करण्याचे उद्धिष्ट असलेली स्नॅपबिझ ही कंपनी स्थानिक व्यापाऱ्यांना डिजिटल सुविधा पुरवेल. युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट (युएसएआयडी), एमएसडीएफ, ओमिडयार नेटवर्क इंडिया, ब्रिटिश हाय कमिशन आणि युएनडीपी यांचे समर्थन असलेला संयुक्त आर्थिक मंच रिव्हाइव्ह अलायन्समार्फत संहिता-सीजीएफ छोट्या किराणा व्यापाऱ्यांना डिजिटल सुविधा व प्रशिक्षण मिळवता यावे यासाठी परतफेड करावयाची अनुदाने व प्रोत्सहक अनुदाने अशा स्वरूपात आर्थिक मदत देईल. या उपक्रमामध्ये आपले योगदान म्हणून टर्रेन व्यापाऱ्यांसाठी आधुनिक रिटेल पद्धतींबाबत स्वयं-सहायता व्हिडियोज् उपलब्ध करवून देईल. नेल्सन या उपक्रमामध्ये स्टोर अधिग्रहण व माहिती पडताळणी सहायता देईल. याशिवाय राष्ट्रीय बँका व स्नॅपबिझ या उपक्रमाच्या प्रसारामध्ये समन्वयपूर्वक काम करत असून या प्रोग्रामसाठी डिजिटल सुविधा सब्सिडाइज करत आहेत.
ही सुविधा व्यापाऱ्यांना सर्वसमावेशक साहाय्य पुरवेल, त्यांना आपल्या दुकानांचे व्यवस्थापन सक्षमतेने आणि प्रभावीपणे करता यावे, स्वतःच्या स्टोरफ्रंटसह ऑनलाईन स्थान निर्माण करण्यात त्यांना मदत करणे, वस्तू व खेळत्या भांडवलासाठी आर्थिक साहाय्य देऊ शकतील अशा पुरवठादारांपर्यंत त्यांना पोहोचता यावे अशा अनेक बाबींचा यामध्ये समावेश असेल. या सुविधेमुळे व्यापाऱ्यांना विक्री वाढवता येईल व ऑनलाईन स्थान निर्माण करून नवे ग्राहक जोडता येतील, वस्तू घरपोच करता येतील, स्टोर बिलिंग, मालाचा साठा, हिशेब आणि विविध नियम, कायदे यांचे पालन करणे, जास्तीत जास्त वस्तू व आर्थिक सेवा उपलब्ध व्हाव्यात यासाठी देखील ही सुविधा त्यांना उपयुक्त ठरेल. यामध्ये त्यांच्यासाठी काही प्रोत्साहनपर आर्थिक लाभ देखील असणार आहेत, जसे, चार महिने पूर्ण झाल्यानंतर संहिता-सीजीएफ व रिव्हाइव्ह अलायन्स यांच्याकडून १००० रुपयांचे डिजिटल अडॉप्शन रिवॉर्ड, बँका व ब्रॅंड्सकडून विशिष्ट कामगिरी केल्याबद्दल बक्षिसे, प्रोत्साहनपर रकमा व प्रमोशन्स यांचे देखील लाभ त्यांना मिळणार आहेत. एफएमसीजी ब्रॅंड्सना स्थानिक व्यापाऱ्यांसोबत मिळून विशिष्ट ग्राहकवर्गासाठी खास प्रमोशन्स देता येतील आणि इन-स्टोर प्रमोशन्सच्या नवनवीन संधी खुल्या होतील.
संहिता-सीजीएफ्स रिव्हाइव्ह अलायन्स यांनी उपलब्ध करवून दिलेली सुविधा रिटर्नबल ग्रांट हे शून्य व्याजावर कर्ज देत असून सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यापाऱ्याला तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यात मदत व्हावी यासाठी ही सुविधा उपयुक्त ठरणार आहे. तंत्रज्ञानाचा यशस्वीपणे स्वीकार करू लागल्यानंतर व्यापाऱ्यांनी हफ्त्याहफ्त्याने या कर्जाची परतफेड करावयाची आहे. व्यापाऱ्यांनी परतफेड केल्यानंतर ही रक्कम नव्या व्यापाऱ्यांसाठी वापरली जाईल. फंड्सचा वापर, पुनःवापर याची एक यंत्रणा तयार होईल व अशाप्रकारे गुंतवण्यात आलेल्या फंड्सचा उपयोग कितीतरी लोकांना घेता येईल.
स्नॅपबिझचे संस्थापक व सीईओ श्री. प्रेम कुमार यांनी सांगितले, “हल्लीच्या काही महिन्यांमध्ये अनेक किराणा दुकानांनी ऑनलाईन खरेदी सुविधा उपलब्ध करवून दिली आहे. ऑनलाईन पेमेंट्स स्वीकारणे, दुकानाला लागणाऱ्या वस्तू ऑनलाईन मागवणे, मालाच्या साठ्याचे व्यवस्थापन इत्यादी ही किराणा दुकाने करू लागली आहेत. पण आजही लाखो किराणा दुकाने अशी आहेत जी कोणत्याही डिजिटायझेशन किंवा तंत्रज्ञान मदतीशिवाय काम करत आहेत ज्यामुळे त्यांना बऱ्याच अडचणी व नुकसान सहन करावे लागत आहे, त्यांच्या वाढीवर प्रचंड विपरीत परिणाम होत आहे. संहिता-सीजीएफ आणि राष्ट्रीय बँका यांच्यासोबत सहयोगामार्फत देशातील प्रत्येक किराणा दुकानदाराला ई-कॉमर्स आणि ऑनलाईन मार्केटींगच्या वेगाने वाढत असलेल्या जगामध्ये आपले स्थान निर्माण करता यावे यासाठी संधी मिळवून देणे हा आमचा उद्देश आहे. या संघटनांसोबत भागीदारी केल्याबद्दल आम्हाला अतिशय आनंद व अभिमान वाटत आहे कारण त्यामुळे आम्हाला समावेशी विकासाला वेग देण्याचे आणि छोट्या व्यापाऱ्यांना खूप मोठ्या इकोसिस्टिममध्ये सामावून घेण्याचे आमचे उद्धिष्ट पूर्ण करता येणार आहे. समाजाच्या सर्व स्तरांमध्ये डिजिटलदृष्ट्या सक्षम भारत निर्माण व्हावा यासाठी आम्ही एकजुटीने काम करत आहोत.”
संहिताच्या सीईओ आणि संस्थापिका श्रीमती प्रिया नाईक यांनी सांगितले, “छोटे किराणा व्यापारी हे आपल्या रिटेल व्यवसायक्षेत्राचा कणा आहेत, संपूर्ण कोविड-१९ कालावधीत लॉकडाउनमध्ये व्यवसाय आणि आरोग्य यांची जोखीम स्वीकारत, दुकाने सुरु ठेवून, आजूबाजूच्या रहिवाशांना गरजेच्या वस्तू पुरवून या छोट्या किराणा व्यापाऱ्यांनी खूप मोलाची भूमिका बजावली आहे.
छोट्या किराणा व्यापाऱ्यांना रिटर्नबल ग्रान्टस पुरवून त्यांचे डिजिटायझेशन आणि व्यवसाय विकासाला वेग देण्यासाठी व त्यांना प्रोत्साहन देण्यात मदत म्हणून स्नॅपबिझ व आघाडीच्या राष्ट्रीय बँकांसोबत भागीदारी करताना रिव्हाइव्ह अलायन्सला अभिमान वाटत आहे.
ही भागीदारी छोट्या किराणा व्यापाऱ्यांना कोणत्याही विपरीत परिस्थितीचा सामना करण्याचे, आधुनिक व्यापारक्षेत्राशी स्पर्धा करण्याचे आणि कोविड-१९ नंतरच्या काळासाठी स्वतःला अनुकूल बनवण्यासाठी सामर्थ्य प्रदान करेल, जेणेकरून स्थानिक अर्थव्यवस्था व रोजगार सक्षम राहील.”
नेल्सनकडून नोंदवण्यात आलेली प्रतिक्रिया –
“छोट्या व्यापाऱ्यांच्या डिजिटायझेशनला वेग देण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या उपक्रमामध्ये सहभागी होताना नेल्सनआयक्यू अभिमान वाटत आहे. बाजारपेठेचा अभ्यास आणि माहिती विश्लेषण या क्षेत्रातील आमच्या क्षमता आणि कौशल्ये यांचा वापर करून समाजाला लाभ मिळवून देण्याची संधी आम्हाला मिळत आहे याचा आम्हाला आनंद आहे.”
कोविड-१९च्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अधिक जास्त नुकसानकारक ठरेल अशी चिन्हे दिसत आहेत, खासकरून २०२० मधील लॉकडाउन आणि आरोग्याला निर्माण झालेल्या धोक्यांपासून अद्याप पुरते सावरले न गेलेल्या छोट्या व्यवसायांसाठी ही दुसरी लाट फारच संहारक ठरू शकते. लाखो छोट्या किराणा व्यापाऱ्यांना अत्याधुनिक डिजिटल उपकरणे आणि निकडीच्या वेळी आर्थिक मदत देऊन सक्षम बनवणे जेणेकरून त्यांना या संकटकाळात टिकून राहता येईल, वर्तमान काळात व भविष्यात ग्राहकांच्या बदलत्या मागण्या पूर्ण करताना स्वतःचा विकास घडवून आणता येईल हा या संयुक्त उपक्रमाचा उद्देश आहे.
About SnapBizz
Headquartered in Bengaluru, SnapBizz provides new age solutions to convert the neighbourhood Kirana stores into smart stores and enable them to leverage their current strengths to gain competitive edge and increase store profitability and growth.
शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R
अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी
अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !
१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १२५/- फक्त
२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त
३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त
४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त
५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’ – रु १२०/- फक्त
एकूण किंमत रु. ६४५/- फक्त (पोस्टेजसह)
अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !
संपर्क : अर्थसंकेत – ८०८२३४९८२२