पहिल्यावहिल्या व्हर्च्युअल फेव्हिक्रिएट आयडिया लॅब सायन्स स्पर्धा २०२१ चे विजेते जाहीर I

पहिल्यावहिल्या व्हर्च्युअल फेव्हिक्रिएट आयडिया लॅब सायन्स स्पर्धा २०२१ चे विजेते जाहीर

चेन्नईतील सना मॉडेल स्कूलमधील डी. सय्यद इब्राहीम,

पटियालातील बुद्ध दल पब्लिक शाळेतील गुरनाझ कौर आनंद आणि दिवाण- बल्लुभाई प्रायमरी स्कूलच्या अय्यान ए. अजमेरी यांनी विजेतेपद मिळवले

मुंबई, १९ मार्च २०२१ – पिडीलाइटने फेव्हिक्रिएटअंतर्गत पहिल्यावहिल्या व्हर्च्युअल फेव्हिक्रिएट आयडिया लॅब या सर्व शहरांत घेण्यात आलेल्या भारत विज्ञान स्पर्धेचे विजेते जाहीर केले. चेन्नईतील सना मॉडेल स्कूलमधील डी. सय्यद इब्राहीम पुनर्वापर आणि पुनर्नूतनीकरण या संकल्पनेवर आधारित प्रकल्पासाठी पहिले विजेतेपद मिळवले, तर पटियालातील बुद्ध दल पब्लिक शाळेतील गुरनाझ कौर आनंद आणि दिवाण- बल्लुभाई प्रायमरी स्कूलच्या अय्यान ए. अजमेरी यांना पुनर्वापर आणि पुनर्नूतनीकरणावर भर देणाऱ्या, शाश्वततेचा विचार करणाऱ्या भविष्यकालीन संकल्पनेवर आधारित प्रकल्पासाठी विजेते म्हणून जाहीर करण्यात आले.

गेले वर्ष सर्वांसाठीच असामान्य ठरले, विशेषतः लहान मुलांना आभासी जगाच्या आव्हानांना तोंड द्यावे लागले. वर्गात दिले जाणारे वैयक्तिक लक्ष ऑनलाइन शिक्षणात कायम राखणे अतिशय अवघड असते. ही दरी भरून काण्यासाठी फेव्हिक्रिएट आयडिया लॅबने आपल्या अखिल भारतीय विज्ञान ऑनलाइन स्पर्धेसह लहान मुलांना त्यांच्या क्षमतेला पूर्ण वाव देणारा प्लॅटफॉर्म उपलब्ध केला.

शाळेपासून दूर असतानाच्या या काळात या स्पर्धेमुळे भावी शास्त्रज्ञांना आपले शिक्षक, पालक आणि स्वतः केलेल्या संशोधनाच्या मदतीने चौकटीबाहेरचा विचार करण्याची, आपल्या कल्पनाशक्तीला पंख देण्याची संधी मिळाली. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी, निर्मिती करण्यासाठी आणि संशोधन करण्यासाठी आवश्यक प्रोत्साहन मिळाले. या स्पर्धेला ‘कृतीतून शिक्षण’ विचाराची जोड देण्यात आल्यामुळे लहान मुलांना थिअरी तसेच संकल्पना प्रत्यक्षात कशा कृतीत येतात हे जाणून घेण्याची संधी मिळाली.

पात्र 36 प्रवेशिकांना मार्च 2021 मधे झालेल्या महाअंतिम फेरीमधे सन्माननीय परीक्षक मंडळापुढे आपले प्रकल्प व्हर्च्युअल पद्धतीने सादर करण्याची संधी मिळाली. परीक्षकांमधे डॉ. श्रीमथी केसन (नासा, ईएसए आणि जीसीटीसी अवकाश शिबिरांच्या अम्बेसिडर) आणि श्री. विवेक अब्रोल (वरिष्ठ अध्यक्ष, सीपीएएसएफ, पिडीलाइट इंडस्ट्रीज) यांचा समावेश होता. प्रकल्पामागची विचार प्रक्रिया व त्याचे आकलन या निकशांच्या आधारे विजेत्यांची निवड करण्यात आली.

पिडीलाइट इंडस्ट्रीज लिमिटेडच्या आर्ट व स्टेशनरी फॅब्रिक विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. विवेक अब्रोल म्हणाले, ‘फेव्हिक्रिएटमधे आम्ही कृतीतून शिक्षणाच्या ताकदीवर विश्वास ठेवतो. पहिली फेव्हिक्रिएट आयडिया लॅब घरी अडकलेल्या मुलांना त्यांची सर्जनशीलता विकसित करण्यासाठी व त्यांच्या कल्पनाशक्तीच्या कक्षा रूंदावण्यासाठी आयोजित केली होती. या स्पर्धेमधे आम्हाला काही थक्क करून सोडणाऱ्या कल्पना तसेच प्रकल्प पाहायला मिळाले. सर्व विजेत्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी आम्ही त्यांना शुभेच्छा देतो.’

डॉ. श्रीमथी केसन (नासा, ईएसए आणि जीसीटीसी अवकाश शिबिरांच्या अम्बेसिडर) म्हणाल्या, ‘फेव्हिक्रिएट आयडिया लॅबशी जोडले जाताना मला अतिशय आनंद होत आहे. विज्ञान आणि संशोधनाप्रती मुलांना असलेली ओढ पाहाणं आशादायी होतं. ही स्पर्धा विज्ञान आणि कला यांचा मिलाफ साधणारी आहे. विजेत्यांचे माझ्यातर्फे अभिनंदन.’

ऑक्टोबर 2020 च्या मध्यावर सुरू झालेली ही स्पर्धा 10 जानेवारी 2021 पर्यंत चालू होती. त्यामधे 5 ते 9 आणि 9- 14 वर्ष वयोगटातील मुले सहभागी झाली होती व त्यांना प्रत्येकी दोन विषय देण्यात आले होते. ते म्हणजे पुनर्वापर आणि पुनर्नूतनीकरण, पहिल्या गटासाठी भारताचे त्यातील स्थान आणि दुसऱ्या गटासाठी उर्जेचे स्त्रोत आणि भविष्यातील शहरे. विशेष म्हणजे, परीक्षणाचे निकष वेगळे नव्हते. स्पर्धेच्या संकल्पनेमागे, विज्ञानातील संकल्पना समजावून घेण्यास प्रोत्साहन देणे आणि सर्वप्रकारच्या शिक्षणात सर्जनशीलता आणून त्याचवेळेस केवळ अभ्यासापुरते मर्यादित न राहाता आयुष्याशी संबंधित विषयांवर विचार करायला लावणे हा हेतू होता.

या स्पर्धेमधे 500 शहरांतील 20,000 विद्यार्थी सहभागी झाले होते. सहभागींनी फेव्हिक्रिएट संकेतस्थळावर आपले प्रकल्प जमा तेले आणि नंतर देशभरातील 10 तटस्थ तज्ज्ञांनी त्याचे मूल्यांकन केले. आलेल्या प्रवेशिकांपैकी 36 प्रवेशिका विषयाचे आकलन, वेगळेपण, संकल्पना मांडण्यातील सर्जनशीलता आणि प्रकल्पाचा नीटनेटकेपणा या निकषांच्या आधारे निवडण्यात आल्या.

विजेत्यांना ट्रॉफीजबरोबरच अपल मॅकबुक्स आणि आयपॅड देण्यात आले.

Fevicreate
Fevicreate

पिडीलाइट इंडस्ट्रीज लि. विषयी

पिडीलाइट इंडस्टीज लिमिटेड ही भारतातील अधेसिव्ह्ज, सिलिएंट्स, बांधकामासाठी लागणारी रसायने, क्राफ्ट्समन उत्पादने, डीआयवाय (डू इट युअरसेल्फ) उत्पादने आणि पॉलिमर इमल्शन्स बनवणारी आघाडीची कंपनी आहे. आमच्या उत्पादनांमध्ये पेंट रसायने, ऑटोमोटिव्ह रसायने, कला साहित्य आणि स्टेशनरी, फॅब्रिक केअर, मेंटेनन्स रसायने, इंडस्ट्रीयल अधेसिव्ह्ज, इंडस्ट्रीयल आणि टेक्साटाइल रेसिन्स आणि ऑर्गेनिक पिगमेंट्स अँड प्रिपरेशन यांचा समावेश होतो. बहुतांश उत्पादने कंपनीच्या संशोधन व विकास विभागात तयार करण्यात आली आहेत. भारतामध्ये लाखो लोकांसाठी आमचा ब्रँड फेव्हिकॉल अधेसिव्हसाठी समानार्थी झाला असून तो देशभरातील सर्वात विश्वासार्ह ब्रँड्सपैकी एक आहे. आमच्या काही प्रमुख ब्रँड्समध्ये एम सील, फेव्हिक्विक, फेव्हिस्टिक, रॉफ, डॉ. फिक्सिट,फेव्हिक्रिल, मोटोमॅक्स आणि हॉबी आयडियाजयांचा समावेश होतो.

01 marathi share market
01 marathi share market

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *