नोव्हेंबरमध्ये PFRDA ग्राहकांची संख्या २२% वाढून झाली ४.७५ कोटी I
नोव्हेंबरमध्ये PFRDA ग्राहकांची संख्या २२% वाढून झाली ४.७५ कोटी
PFRDA अंतर्गत दोन प्रमुख पेन्शन योजनांच्या ग्राहकांची संख्या या वर्षी नोव्हेंबरमध्ये २२% ने वाढून ४.७५ कोटी झाली आहे. असे पेन्शन फंड नियामक संस्थेने शुक्रवारी सांगितले. नॅशनल पेन्शन सिस्टीम (NPS) अंतर्गत विविध योजनांमधील सदस्यांची संख्या नोव्हेंबर २०२१ च्या अखेरीस ४७५.८७ लाख झाली आहे, जी नोव्हेंबर २०२० मध्ये ३८८.६२ लाख होती. जी वार्षिक २२.४५% ने वाढ दर्शवते, असे पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण ऑफ इंडिया (PFRDA) ने सांगितले.
३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत, व्यवस्थापनाखालील निवृत्ती वेतनाची एकूण मालमत्ता रु. ६,८७,४६८/- कोटी रुपये होती, जी वार्षिक २९.१३% ची वाढ दर्शवते.
राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) च्या केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या श्रेणीतील ग्राहकांची संख्या अनुक्रमे ४.७१% आणि ९.७४% ने वाढून २२.४४ लाख आणि ५४.४४ लाख झाली आहे.कॉर्पोरेट सेक्टर व इतर नागरिक श्रेणीत ग्राहक संख्या २३.७३% व ३३.८१% ने वाढली असून १३.१९ लाख व १८.८८ लाख झाली आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo