तुम्ही साक्षर आहात ….पण अर्थ साक्षर आहात का ? – सौ रचना लचके बागवे
आज ८ सप्टेंबर “आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस”
सन्मान आणि मानवी हक्कांचा विषय म्हणून साक्षरतेचे महत्त्व याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी ८ सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस साजरा केला जातो.
भारतामध्ये साक्षरतेचा दर वाढत आहे. साक्षरता वाढते खरी पण ‘आर्थिक साक्षरतेचे काय?’ आर्थिक साक्षरता म्हणावी तशी वाढली नाही. साक्षर लोकं देखील आर्थिक असाक्षर असू शकतात.
आज e – money च्या काळात पैसे कमवणे, टिकवणे आणि वाढवणे ह्याचे संतुलन करणे कठीण झाले आहे. Credit Cards आणि crypto currency च्या जगात आजचा तरुण खरे पैश्याचे मोल कुठे तरी विसरू लागला आहे.
ऑनलाईन शॉपिंगच्या नावाखाली आपल्या बॅंकेतली जमापुंजी साफ होते आहे.
EMI भरू की गुंतवणूक करू? असा प्रश्न सर्व तरुण पिढीला पडला आहे.
Insurance जे रिस्क कव्हर आहे ते गुंतवणूक म्हणून विकले जात आहे.
Credit – Debit च्या दुनियेत retirement planning कूठे तरी राहून जातंय.
Provident fund तर फक्त नोकरी धारकांसाठी असतो असा गैरसमज आहे.
शेअर मार्केट मध्ये झटपट पैसे मिळतील अशी चुकीची अपेक्षा आहे.
Mediclaim आणि टर्म इन्शुरन्स दोन्ही हवेत का ?
रिटायरमेंटला किती रुपये लागतील ? महागाई दर काय – किती आहे ? सोन्याचे दागिने गुंतवणूक आहेत का ?
असे सर्व विषय आणि प्रश्न सर्वसामान्य लोकांना सतावत आहेत.
ह्यासाठीच आर्थिक साक्षरता आवश्यक आहे . आज फक्त साक्षरता न्हवे तर आर्थिक साक्षरतेची गरज आहे.
अर्थसंकेतच्या विविध कार्यक्रम, पुस्तकं, संकेतस्थळ, YouTube channel, Facebook page च्या माध्यमातून अर्थ साक्षरतेचे काम आम्ही सातत्याने गेली ८ वर्ष करत आहोत.
जर तुम्हाला तुमच्या विद्यालयात, महाविद्यालयात, ऑफिस, सोसायटी मध्ये अर्थ साक्षरता करायची असेल तर आम्हाला ८०८२३४९८२२ वर संपर्क करा.
तुम्ही साक्षर आहात ….पण अर्थ साक्षर आहात का ?
तुमची प्रतिक्रिया आणि मदत अपेक्षित.
- सौ रचना लचके बागवे
अर्थसंकेत
अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !
१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १५०/- फक्त
२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त
३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त
४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त
५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’ – रु १२०/- फक्त
एकूण किंमत रु. ७००/- फक्त (रु. ३०/- पोस्टेजसह)
अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !
शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R