तुमचा व्यवसाय रिलेव्हंट आहे का ? श्री कुंदन गुरव

तुमचा व्यवसाय रिलेव्हंट आहे का ? श्री कुंदन गुरव

कोरोना नंतर तुमच्या ग्राहकांचा दृष्टिकोन कसा असणार आहे. त्यांच्या अपेक्षा काय असणार आहेत. त्या अनुषंगाने मी व माझ्या व्यवसायाने स्वतःमध्ये काय बदल केले पाहिजेत याविषयी आज आपण बोलू.

‘ग्रोथ इस बायप्रॉडकट ऑफ सस्टेनेबिलिटी’ व हि ग्रोथ तेव्हा मिळते जेव्हा आपण स्वतःच्या ऑर्गनायझेशन ला सक्षम बनवतो. पण आपण हे कसे साध्य करू शकतो.

आज ज्या पद्धतीने जग बदलत आहेत त्यापद्धतीने स्वतःला आपण बदलतो, पण याकरिता बदल आवश्यक नाही. असे जर मी म्हणालो तर ते धाडसी वक्तव्य होईल. पण मागील ५-१० वर्षात आपण हे पहिले आहे कि बदल करून आपण काहीही मिळवू शकत नाही. यामागे कारणे आहेत. आपण काही उदाहरणे पाहू.

प्रीमिअर पद्मिनी हि कार आपल्याला माहीतच आहे. मी हा प्रश्न बऱ्याच मिलेनिअलना विचारला. पण त्यांना या कारचे नाव देखील माहित नाही. पण १५ वर्षांपूर्वी हिंदुस्थान मोटरच्या या कारचा हिंदुस्तानात मोठा मार्केट शेअर होता. पण आज १५ वर्षानंतर या कारचे व कंपनीचे नाव देखील आपल्याला माहित नाही.

मार्केट पेस मध्ये या गाड्यांचे अस्तित्व इर्रिलेव्हंट झाले आहे. तसेच नोकिया फोन बाबतीत झाले . ५-७ वर्षांपूर्वी नोकिया कंपनीचे फोन अधिक प्रमाणात विकले जात. पण आज या कंपनीचे फोन मार्केट मध्ये दिसत देखील नाहीत.

प्रीमिअर पद्मिनीला मार्केट मधून इर्रिलेव्हंट होण्यास १५ वर्ष लागली. तर नोकिया ला ५-७ वर्ष लागली. जर ब्लॅकबेरी चे उदाहरण घेतले तर त्यांचा मार्केट मध्ये येण्याचा व जाण्याचा काळ हा केवळ ६ महिने तर १ वर्ष राहिला. ब्लॅकबेरी मार्केट मधून इर्रिलेव्हंट झाला. आता हि तिन्ही उदाहरणे पहिली तर प्रॉडक्ट किंवा कंपनी मार्केट मधून  इर्रिलेव्हंट होण्याचा काळ कमी होत आला आहे.

आज असे कित्येक प्रॉडक्ट आहेत जे १५ दिवसांपूर्वी मार्केट मध्ये होते पण तंत्रज्ञान बदलल्याने आता मार्केट मध्ये दिसत नाहीत. बदलाचा पेस वाढत आहे. मग या बदलाला पेस ने कसे फाईट करणार. यात एक अल्बर्ट आईन्स्टाईन चे वाक्य आहे. , ते म्हणजे, ‘द सिग्निफिकन्ट प्रॉब्लेम दॅट वुई आर फेसिन्ग टुडे इस रिझल्ट ऑफ शॉर्ट टर्म सोल्युशन वुई केम अक्रोस यस्टरडे’. प्रॉब्लेमचा  पेस जितका आहे त्या लेव्हलने चेंजने मी त्याला फाईट केले तर रिझल्ट झिरो आहे. पण माझा रिस्पॉन्स हा जास्त इंटेन्सिटीचा असावा. यालाच ट्रान्सफॉर्मेशन म्हणतात.

चेंज व ट्रान्सफॉर्मेशन या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हे आपल्या लक्षात आले तर आपण मार्केटच्या अनुषंगाने स्वतःला ट्रान्सफॉर्म केले पाहिजे.

Kundan Gurav relevant business
Kundan Gurav relevant business

अर्थसंकेत – मराठी उद्योजकांचे हक्काचे व्यासपीठ !

अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *