जनसेवा पतसंस्थेचा ‘सर्वोत्कृष्ट पतसंस्था’ पुरस्काराने सन्मान I Jansewa Patsanstha I
जनसेवा पतसंस्थेचा ‘सर्वोत्कृष्ट पतसंस्था’ पुरस्काराने सन्मान I Jansewa Patsanstha I
अर्थसंकेत प्रस्तुत अर्थ साक्षर पुरस्कार २०२० सोहळा बुधवार २३ डिसेंबर २०२० रोजी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज येथे संपन्न झाला. कार्यक्रमात जनसेवा पतसंस्थेचा ‘सर्वोत्कृष्ट पतसंस्था’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. डॉ संदीप माळी, श्री विनायक राठोड व श्री अविनाश गडलिंग यांनी पुरस्कार स्वीकारला. बी एस ई इन्व्हेस्टमेंटचे व्यवस्थापकीय संचालक श्री शंकर जाधव, अर्थसंकेतचे डॉ अमित बागवे व सौ रचना बागवे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला
दिनांक १६ नोव्हेंबर २०२० रोजी जनसेवा नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना केली आणि आज फक्त ४६ दिवसात या संस्थेकडे ६ कोटी ठेवी जमा झाल्या आहेत. कर्जे ४ कोटीची आहेत.
अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र