क्लीन सायन्स अँड टेक्नोलॉजी लिमिटेडची इनिशियल पब्लिक ऑफर ७ जुलै २०२१ पासून खुली होणार I Clean Science IPO I
क्लीन सायन्स अँड टेक्नोलॉजी लिमिटेडची इनिशियल पब्लिक ऑफर ७ जुलै २०२१ पासून खुली होणार
• प्रति इक्विटी शेअर रु. १ दर्शनी मूल्य असलेल्या प्रत्येक इक्विटी रु. ८८० ते रु. ९०० चा प्राइस बॅण्ड
• बोली/ऑफर खुली होण्याची तारीख – ०७ जुलै २०२१ आणि बोली/ऑफर बंद होण्याची तारीख ०९ जुलै २०२१
• किमान १६ इक्विटी शेअर्ससाठी व त्यानंतर १६ च्या पटीतील शेअर्ससाठी बोली लावता येईल
मुंबई, ०२ जुलै २०२१: परफॉर्मन्स केमिकल्स (म्हणजे एमईएचक्यू, बीएचए आणि एपी), फार्मास्युटिकल इंटरमीडिएट्स (म्हणजे ग्वायाकोल आणि डीसीसी) आणि एफएमसीजी कंपन्यांना लागणारी केमिकल्स (म्हणजे ४-एमएपी आणि अॅनिसोल) अशा कार्यशीलतेच्या दृष्टीने महत्त्वाची स्पेश्यालिटी केमिकल्स उत्पादित करणारी कंपनीक्लीन सायन्स अँड टेक्नोलॉजी लिमिटेड ०७ जुलै २०२१ रोजी आपल्या इक्विटी शेअर्सच्या इनिशियल पब्लिक ऑफरिंगसाठी बोली/ऑफर खुली करणार आहे (“आयपीओ” / “ऑफर”). या ऑफरसाठीचा प्राइस बँण्ड प्रती इक्विटी शेअर रु. ८८० ते रु. ९०० यादरम्यान निश्चित कऱण्यात आला आहे. किमान १६ इक्विटी शेअर्स आणि त्यानंतर १६ च्या पटीतील संख्येइतक्या इक्विटी शेअर्ससाठी बोली लावता येईल.
हे इनिशियल पब्लिक ऑफरिंग १५,४६६.२२ दशलक्ष रुपयांपर्यंतच्या रकमेच्या समभागांच्या विक्रीसाठी असेल. यात अशोक रामनारायण बूब यांच्याजवळील २,४४०.१६ दशलक्ष रुपयांपर्यंत एकूण मूल्य असलेले शेअर्स, कृष्णकुमार रामनारायण बूब यांच्याजवळील १,९३०.५९ दशलक्ष रुपयांपर्यंत एकूण मूल्य असलेले शेअर्स, सिद्धार्थ अशोक सिकची यांच्याजवळील ४०५.०५ दशलक्ष रुपयांपर्यंतचे एकूण मूल्य असलेले शेअर्स, पार्थ अशोक महेश्वरी यांच्याजवळील ७५९.८३ दशलक्ष रुपयांपर्यंतचे एकूण मूल्य असलेले शेअर्स विक्रीसाठी खुले केले जाणार आहेत. या ऑफरमध्ये अशोक बूब यांच्याजवळील २,४४०.१६ दशलक्ष रुपयांपर्यंतच्या किंमतीचे शेअर्स, अशोककुमार रामकिशन सिकची एचयूएफ यांच्याकडील एकूण १,३६०.५१ दशलक्ष रुपयांपर्यंतच्या किंमतीचे शेअर्स, कृष्णकुमार रामनारायण बूब एचयूएफ यांच्याकडील एकूण ४१५.५१ दशलक्ष रुपयांपर्यंतच्या किंमतीचे शेअर्स, अशोक रामनारायण बूप एचयूएफ यांच्याकडील ७५२.६० दशलक्ष रुपयांपर्यंतच्या किंमतीचे शेअर्स, निधी मोहंता यांच्याजवळील ७५९.८३ दशलक्ष रुपयांपर्यंतच्या एकूण किंमतीचे शेअर्स, निलिमा कृष्णकुमार बूब यांच्याजवळी ८४०.७७ दशलक्ष रुपयांपर्यंतच्या एकूण किंमतीचे शेअर्स, श्रद्धा कृष्णकुमार बूब यांच्याजवळी ४४०.२८ दशलक्ष रुपयांपर्यंतच्या एकूण किंमतीचे शेअर्स, प्रसाद कृष्णकुमार बूब यांच्याजवळील ४४०.२८ दशलक्ष रुपयांपर्यंतच्या एकूण किंमतीचे शेअर्स, पूजा विवेक नवंदर यांच्याजवळील ४४०.२८ दशलक्ष रुपयांपर्यंतच्या एकूण किंमतीचे शेअर्स, आशा अशोक सिकची यांच्याजवळील १,१४१.३८ दशलक्ष रुपयांपर्यंतच्या एकूण किंमतीचे शेअर्स, कुणार अशोक सिकची यांच्याजवळील ३१०.५४ दशलक्ष रुपयांपर्यंतच्या एकूण किंमतीचे शेअर्स, अशोक सिकची यांच्याजवळील २८२.४३ दशलक्ष रुपयांपर्यंतच्या एकूण किंमतीचे शेअर्स, नंदिता सिकची यांच्याजवळील २७३.६० दशलक्ष रुपयांपर्यंतच्या एकूण किंमतीचे शेअर्स, गणपती दादासाहेब यादव यांच्याजवळील ३२.४२ दशलक्ष रुपयांपर्यंतच्या एकूण किंमतीचे शेअर्स यांचाही समावेश आहे. प्रत्येक इक्विटी शेअरचे दर्शनी मूल्य प्रती इक्विटी शेअर रु. १ इतके असणार आहे.
ही ऑफर सिक्युरिटी कॉन्ट्रॅक्ट्स (रेग्युलेशन) नियम १९५७ मधील सुधारणा (”एससीआरआर”) व त्यासोबत सेबी आयसीडीआर रेग्युलेशसन्सच्या नियम ३१ अन्वये आणि सेबी आयसीडीआरच्या नियम ६(१) चे पालन करत बुक बिल्डिंग प्रक्रियेच्या माध्यमातून देण्यात आली आहे, ज्यात ऑफरमधील ५० टक्क्यांहून अधिक भाग समानुपाती पद्धतीने क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल बायर्स (“क्यूआयबी”, “क्यूआयबी पोर्शन”)कडे गुंतवला जाणार नाहीत, मात्र कंपनी बुक रनिंग लीड मॅनेजर्सच्या सल्ल्याने क्यूआयबी भागातील ६० टक्क्यांपर्यंतचा हिस्सा स्वमर्जीने अँकर इन्व्हेस्टर्सकडे गुंतवू शकते ज्याला सेबी आयसीडीआर नियमांअंतर्गत (“अँकर इन्व्हेस्टर पोर्शन”) परवानगी आहे.या हिश्श्यापैकी एक-तृतियांश हिस्सा डोमेस्टिक म्युच्युअल फंड्ससाठी राखून ठेवला जाईल. मात्र त्यासाठी डोमेस्टिक म्युच्युअल फंड्सकडून अँकर इन्व्हेस्टर अलोकेशन प्राइसइतकी किंवा त्याहून अधिक किंमतीची अधिकृत बोली लावली जायला हवी.
त्याचप्रमाणे, या ऑफरमधील निव्वळ क्यूआयबी हिश्श्यातील ५ टक्के भाग समानुपातील पद्धतीने केवळ म्युच्युअल फंडांतील गुंतवणुकीसाठी उपलब्ध असेल आणि निव्वळ क्यूआयबी हिश्श्यातील उर्वरित भाग समानुपाती पद्धतीने म्युच्युअल फंडांसहित सर्व क्यूआयबींसाठी उपलब्ध असेल, मात्र त्यासाठी ऑफर प्राइसइतकी किंवा त्याहून अधिक किंमतीची बोली मिळायला हवी.
तसेच, सेबी आयसीडीआर नियमांबरहुकुम ऑफरमधील किमान १५ टक्के भाग हा समानुपाती पद्धतीने नॉन-इन्स्टिट्यूशनल बीडर्सकडील गुंतवणूकीसाठी उपलब्ध असेल व ऑफरमधील किमान ३५ टक्के भाग हा रिटेल इंडिव्हिज्युअल बीडर्स (“आरआयबी”) साठी उपलब्ध असेल, मात्र त्यासाठी ऑफर प्राइसइतकी किंवा त्याहून अधिक किंमतीची बोली मिळायला हवी.
या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसच्या माध्यमातून ऑफर करण्यात येत असलेले हे इक्विटी शेअर्स बीएसई आणि एनएसईच्या सूचीत अंतर्भूत होणे प्रस्तावित आहे.
अँक्सिस कॅपिटल लिमिटेड, जे एम फायनान्शियल लिमिटेड आणि कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लि. हे या ऑफरचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स (“बीआरएलएम”) आहेत.
Disclaimer:
The Equity Shares have not been and will not be registered under the U.S. Securities Act of 1933, as amended (the “Securities Act”) or any other applicable law of the United States and, unless so registered, may not be offered or sold within the United States, except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements of the Securities Act and applicable U.S. state securities laws. Accordingly, the Equity Shares are being offered and sold (i) within the United States only to persons reasonably believed to be “qualified institutional buyers” (as defined in Rule 144A and referred to in the Red Herring Prospectus as “U.S. QIBs” (for the avoidance of doubt, the term “U.S. QIBs” does not refer to a category of institutional investor defined under applicable Indian regulations and referred to in the Red Herring Prospectus as “QIBs”)) in transactions exempt from, or not subject to, the registration requirements of the Securities Act, and (ii) outside the United States in offshore transactions in reliance on Regulation S and pursuant to the applicable laws of the jurisdictions where those offers and sales are made.
Clean Science and Technology Limited is proposing, subject to receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to make an initial public offer of its equity shares and has filed a red herring prospectus (“RHP”) with the Registrar of Companies, Maharashtra at Pune. The RHPis available on the website of the SEBI at www.sebi.gov.in as well as on the websites of the book running lead managers, Axis Capital Limited, JM Financial Limited and Kotak Mahindra Capital Company Limited, at www.axiscapital.co.in, www.jmfl.com and www.investmentbank.kotak.com, respectively, and the websites of the stock exchange(s) at www.nseindia.com and www.bseindia.com, respectively. Any potential investor should note that investment in equity shares involves a high degree of risk and for details relating to such risk, see “Risk Factors” of the RHP, when available.
Please refer to the attached price band advertisement for complete details.
शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R