एल अँन्ड टी इन्फोटेकला रु.६३७/- कोटी नफा I Larson & Toubro Infotech profit of Rs. 637/- Crore I
एल अँन्ड टी इन्फोटेकला रु.६३७/- कोटी नफा
एल अँन्ड टी इन्फोटेकला तिसऱ्या तिमाहीत नफ्यात १७% ची वाढ
आयटी कंपनी लार्सन अँड टुब्रो ने दिलेल्या माहितीनुसार, मार्च अखेर तिमाहीत कंपनीला एकत्रित निव्वळ नफ्यात १६.८% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ६३७/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु. ५४५.२/- कोटीचा निव्वळ नफा झाला होता. ऑपरेटिंग महसुलात ३१.५७% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ४३०१.६/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ३२६९.४/- कोटी होती. ३१ मार्च २०२२ अखेर आर्थिक वर्षात एकूण नफ्यात १८.६३% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. २२९६.८/- कोटी आहे. मागील वर्षी हि रक्कम रु. १९३६.१/- कोटी होती. वार्षिक उत्पन्न २६.६६% ने वाढले असून रु.१५,६६८.७/- कोटी आहे. २०२०-२१ आर्थिक वर्षात कंपनीला रु. १२,३६९.८/- कोटीचे एकूण उत्पन्न मिळाले होते.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo